postsaambhar :Udaykumar Jagtap
शिर्के हे महाराष्ट्रातील अति प्राचीन क्षत्रिय कुळातील मराठे आहेत . १३ व्या शतकाच्या मध्यंतरी सिघंण राज्याने पन्हाळ्याच्या राज्याचे राज्य पादाक्रांत केले. त्यावेळी कृष्णेच्या उगमाजवळील प्रदेश घेतला त्यांचे वंशज हे शिर्के होत .
मुसलमान इतिहासकार "फेरिस्ता" व" बुऱ्हान -इमाआसिद" ह्या ग्रंथाचा कर्ता अली बिन अझीझ आलीं ह्या दोन जणांनी राज्याची जी हकीकत लिहून ठेवली होती
त्यात शिर्के नामक सरदाराने संगमेश्वराच्या आसमंतातील निबिड अरण्यात मलिक उल तीजार ह्या सरदारास सन १४५४ मध्ये भूल दाखवून गारद केले अशी माहिती आहे .
कोकण प्रांतात शिर्के मराठे हे डोंगरी किल्यांच्या आश्रयाने फार प्रबल झाले होते . मलिक उल तिजार हा ३०-४० हजार सैन्यानिशी त्यावर चालून गेला होता .
त्याने शिर्के याना मोठ्या युक्तीने पकडले व त्यास" मुसलमान होतोस का ? शिरच्छेद करू" असा प्रश्न विचारला .
त्यामुळे बाह्यत्कारें त्यास मुस्लिम धर्म स्वीकारणे भाग पडले . परंतु शिर्के यांनी गोडीगुलाबीने व नम्रपणे वागून त्याची मर्जी संपादन केली व गुप्त रीतीने आपल्या मराठे सैन्यास इशरत करून त्या सरदारास शासन करण्याचा संकल्प केला .
हा परिसर जेंव्हा तिजार सरदाराला जिंकता येईना त्यावेळेस शिर्केनी संधी साधून संगमेश्वराच्या डोंगरातील अरण्यात मला सर्व गुप्ता वाट माहित आहेत .
तेंव्हा मी तुम्हास कोकण प्रांतावर विजय मिळवून देतो . अशी थाप मारली तिजार याने या गोष्टीवर विश्वास ठेवून सर्व सैन्यानिशी दाट अरण्यात दर्या खोऱ्यात मराठे लपले आहेत असे सांगून त्यास माराच्या टप्प्यात येऊ दिले
नंतर आपल्या जातभाईस इशारा करून तिजोरीच्या सैन्याची दाणादाण उडवली . पुढे सुमारे एक शतक तरी कोकणावर शिर्के घराण्याचे प्राबल्य असावे असे दिसते .
शिर्के घराण्यातील" वाघोजी शिर्के "नावाचा पुरुष निजामशाहीत उदयास आलेला दिसतो . त्याचे कर्तृत्व पाहून निजामशहाने त्यास रायगड ह्या प्रांताची बारा महिलांची देशमुखी करून दिली
. पुढे वाघोजी राजे व त्यांचे चिरंजीव तान्हाजी राजे हे निजामशाहीत चाकरीने राहिले . विजापूरच्या बादशहाने जवळीकर मोरे याना १५७८ मध्ये शिर्क्यांवर चाल करून जाण्यास सांगितले .
मोरेंनी रायरी जिंकली परंतु शिर्क्यांचे शृंगारपूरचे सूर्याजी राजे सुर्वे यांच्याशी शरीर संबंध झाल्यामुळे सुर्वे राजे यांची कन्या वाघोजी राजे शिर्के यांचे धाकटे पुत्र पिलाजी राजे शिर्के याना दिल्यामुळे त्याने विजापूरच्या बादशहाकडून त्यांना दाभोळची सरदेशमुखी मिळवून दिली .
बलिष्ठ शिर्के राजे याना आपणास अनकूल करून घ्यावे यासाठी शिवाजी राज्यांनी पिलाजीराव यांचे पुत्र गणोजीराव याना आपली कन्या राजकुंवरबाई दिली . व पिलाजीराव यांची कन्या येसूबाई संभाजी महाराजांना करून घेतली .
कोकणामध्ये वाडीचा सावंत फसला करून वसाहत होऊनये म्हणून पिलाजी राज्यांनी सावंतास आणून शिवाजी महाराजांचा व त्याचा तह करून दिला . त्यावेळेस शिवाजी महाराजांनी राजकुवारबाईस जो पुत्र होईल त्यास दाभोळचे वतन देऊ असे वचन दिले .
पुढे शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराज मराठी साम्राज्याचे अधिकारी झाले . मराठी राज्याचे रक्षण व्हावे म्हणून संभाजी महाराजांचे पुत्र शिवाजी (शाहू ) याना गादीवर बसवून सर्व राजकारभार हा पूर्वीच्या जुन्या अनभवी मुत्सद्दी मंडळींकडून चालवावा .
असे वाटून पिलाजीराजे शिर्के ,गणोजीराजे शिर्के ,तान्हाजीराजे शिर्के यांनी अशी गुप्त मसलत केली . परंतु हि मसलत कोणीतरी संभाजी महाराजांना कळवली .
त्यामुळे संभाजी महाराजांच्या क्रोधाची परमावधी होऊन त्यांनी सर्व शिर्क्यांचा समूळ उच्छेद करावा असा हुकूम केला . त्याप्रमाणे शिर्क्यांचे झालेले शिरकाण सर्वाना माहित आहेच .
जेंव्हा शिर्क्यांचे शिरकाण झाले त्यावेक्स काही दोनचार शिर्के मंडळी पळून हशाबांच्या मुलखात राहिले . त्यांनी मोगलांची चाकरी पत्करली . शिवाजी महाराजांचे जावई गणोजीराजे शिर्के या शिरकाणा तुन जिवंत राहिले
त्यांनी राजाराम महाराजांना चंदीच्या संकट प्रसंगी साहाय्य करून झुल्फीकाराच्या वेढ्यामधून ताराबाई राजसबाई व राजकुंवरबाई या राजस्त्रियांची एका रात्रीत सुटका केली . व त्यांना आरणी किल्यात आणून ठेवले . व त्यांचे प्राण रक्षण केले.
या उपकाराबद्दल छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना दाभोळच्या सरदेशमुखीच्या सनदा लिहून दिल्या . शिर्के घराण्याने स्वराज्यासाठी केलेली हि उत्कृष्ठ मदत होय .
यांचे वंशज आजही कोकणात आहेत . या घराण्याचे पुढे सातारच्या छत्रपतींच्या घराण्याशी पुढे अनेकवेळा शरीर संबंध झालेला असून ते छत्रपतींच्या दरबारात वरिष्ठ प्रतीचे गणले गेले .
No comments:
Post a Comment