विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 19 July 2020

## *माने *##




## *माने *##
postsaambhar :Udaykumar Jagtap
ह्यांचा मूळ पुरुष पाठकोजी म्हणून होता . तो म्हसवड येथे देशमुखी करत होता . दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता . तो बरीच वर्ष चालला दुष्काळ संपल्यानंतर बेरड ,पाळेगार, रामोशी वगैरे लोकांची पुंडाई माजली. त्या पुंडखोर लोकांचे बंड मोडण्यात तो असल्याचा पुरावा मिळतो. पुंडव्याचा बिमोड बिमोड करताना त्याचा अंत झाला ,त्यास" सिदोजी "नावाचा एक मुलगा होता . त्याने आपल्या बापाचा सूड घेण्याचे ठरवले . म्हसवड महालावर त्यावेळेस बादशहाने सुजातमिया नावाचा एक बाद्शाही अमलदार तमाम ठाणी बसवण्यासाठी पाठवण्यात आला होता. त्यास अनुकूल करून विजापूरच्या बादशाहीत प्रवेश मिळवला. हा प्रदेश मिळवण्याकरिता बेदरचे बादशहाचा सुभेदार आला असताना सदोजी मानेने तुंबळ युद्ध केले . बादशहास विजय मिळवून दिला सुजातमियाने सदोजी मानेची मोठी तारीफ लिहून बादशहास कळवली. "सदोजी माने महाप्रतापी आहे. त्याने एकांगी करून ४-५ लढाया जिंकल्या आपल्या प्रांतावरील परचक्र नाहीसे केले . त्याची देशगत त्यास देऊन त्याची हुकूमत वाढवावी ." त्यावरून बादशहाने त्यास बोलावले त्यास ३०० होनांची तैनात दरमहा सुरु केली . बेदरचे बादशहाने भीमा उतरून पुन्हा विजापूरकरांवर चालून आली . त्यावेळेस सदोजीने अतुलनीय केला शौर्याबद्दल त्यास" बाजी " 'किताबत मिळाली. त्याने बदामीच्या किल्ला जिंकला . मान्यांचे कुलदैवत " श्रीसिद्धनाथ". ह्यांचा पादुका व बटवा तो स्वारीत जवळ बाळगीत असे व लढाईत जात असे . त्यांना चिलोजी व नरसिंहराव असे पुत्र होते . या पैकी नरसिंहरावास सिदोजी ,चामोजी ,अगनोजी, खेत्रजी व रथाजी असे पाच पुत्र होते . पैकी "रथाजी माने" हे पुढे प्रसिद्धीस पावलेले दिसतात . पुढे रथाजी माने औरंजेबास जाऊन मिळाले . त्यांना" नागोजी माने "हा पुत्र झाला . राजे जयसिंग यांनी औरंगजेबाकडे रथाजी माने यांची खूप तारीफ केली मदत केल्यामुळे दक्षिणेत बादशहाला सैन्य आणून साम्राज्य पसरवता आले . बादशहाने मेहेरबान होऊन म्हसवड ,दहिगाव ,अकलूज, भालवणी, कासेगाव ,ब्रम्हपुरी सांगोले ,आटपाडी, नाझरे, बेलापूर या गावाची देशमुखी दिली . औरंगजेबास आपले कर्तृत्व दाखवून, त्याजकडून"" राजा "" हा 'किताब व मोर्चल मिळवले . औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या वधानंतर महाराष्ट्र काबीज केला व छत्रपती राजाराम ह्यांचा पाठलाग करण्यासाठी झुल्फिकारखान यास नागोजी माने बरोबर पाठवले . हा प्रबळ मराठा सरदार मोगलांच्या बाजूने लढतो त्यामुळे मराठ्यांमध्ये चिंता उत्पन्न झाली . त्यामुळे महाराष्ट धर्म बुडणार अशी चिंता व चिन्हे वाटू लागली .
चदी येथे राजाराम महाराजांनी नागोजी माने याशी मराठा सर दारांच्या मदतीने संधान बांधले व विनंती केली " मराठी धर्म राखल्यास नीट . नाहीतर आज बुडतो . तुम्ही मराठा धर्माचे अगत्यवादी त्यापक्षी तुम्ही आम्हाकडे यावे. तुम्ही आम्ही एक जाहल्यास हि फौज मोडून हिंदू धर्म जातं करू ".
या प्रमाणे विनंती करताच नागोजी माने याच्या हृदयात स्वधर्माभिमान प्रज्वलित झाला . त्यांनी मराठ्यांच्या बाजूने येऊन कार्य सिद्धीस नेले .
. त्यामुळे छत्रपतींना संतोष झाला महाराज म्हणाले "नागोजीने आज राज्य जतन केले . एकनिष्ठ सेवक,चांगला माणूस" अशी तारीफ करून ५००० फौजेनिशी ठेवले . त्यावेळेस परांडे, हवेली वगैरे २७ महालांची सरदेशमुखीची वतनपत्रे व इनामगावे दोनचार करून दिली . . नागोजी माने यांनी चदीच्या बिकट प्रसंगी मराठयांना उत्कृष्ट साहाय्य केले यात शंका नाही

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...