विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे तत्कालीन मराठे प्रतिस्पर्धी ##



## छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे तत्कालीन मराठे प्रतिस्पर्धी ##
postsaambhar: Udaykumar Jagtap

शिवाजी महाराजांना तत्कालीन मराठ्यांचा कसा विरोध झाला व तत्कालीन परिस्थितीवर चर्चा करू .
मोरे -------मोरे यांच्या बद्दल ग्रँड डफ लिहितो . चंद्रराव मोरे यांचे मूळ कर्नाटकात कोणी एक मोरे आडनावाचा नाईक नावाचा होता. त्यास विजापूरचा बादशहा युसूफखान याने वारणा नदीचा परिसर घेण्यास सांगितले, सोबत १२००० हिंदू पायदळ दिले तो प्रदेश अवघड होता व अडचणींचा होता . त्यावेळेस त्याठिकाणी शिर्के यांचे मूळ पुरुष राहत होते ., ,त्यांच्या बरोबर गुजर ,मामूलकर ,महाडिक ,मोहिते होते. मोरे यांनी जावून मुलूख जिंकून घेतला. हे काम केल्या बद्दल बादशाने त्याच्या नावास चंद्रराव पद लावले . व जावळीचा राजा केला . चंद्ररावानी मुलुख बसता केला. पुढे ७ पिढ्या" चंद्रराव "हे बादशहाने ठेवलेले नाव तेच ठेवले व तेथेच राहत होते . बादशाह थोडाफर मुलुख वसूल घेत असे . मोरे स्वतःला विजापूरकरांचा एकनिष्ठ सरदार व जावळीचे राजे म्हणवित .मोरे आणि शिवाजी महाराज यांचा विरोध निरनिराळ्या कारणांनी वाढत गेला. ज्या चंद्ररावाच्या गादीवर एकदा शिवाजी महाराजांच्या साहाय्याने त्यांचा दत्तक पुत्र अधिष्ठित झाला. तोच चंद्रराव पुढे स्वतंत्र होऊन शिवाजी राज्यांच्या विरोधकात सामील झाला. हि गोष्ट महाराजांना लागून राहिली . महाराजांनी मोरे यांचा खून केला. हा दोषारोप बरोबर नाही. मराठ्यांच्या इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन केल्यास मराठ्यांचे दोन गुण दृष्टीस पडतात . एक त्यांचे "शौर्य" व दुसरा" इमानीपणा" ज्या धान्याची चाकरी करायची त्याच्याशी कधीही बेईमानी व्हायचे नाहीत व त्यांच्या करीता जीवावर उदार होऊन लढत. . मोरे याना शिवाजी राजे यांनी कपटाने मारले नाही. महाराजांना विरोध करण्यात व त्यांचा पाडाव करण्याचे वर्तन करण्यात मोरे यांनी देशद्रोह केला असेही म्हणता येत नाही . .जावळी घेतली ती सांगून सवरून शिवाजी महाराज ,चंद्रराव कृष्णाजीराव राजे यास सांगून पाठवितात ,"तुम्ही मुस्तफद राजे म्हणावीता , राजे आम्ही .आम्हा श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे" . "यावर चंद्रराव याने पुढील उत्तर दिले , ."तुम्ही राजे काल जाहला ,तुम्हास राज्य कोणी दिधले ?तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला ,तर उदईक याल,तर आजच यावे " यात कोणासही दोष देता येत नाही. मोरे शेवट पर्यंत विजापूरकरांशी एकनिष्ठ राहिले .
मोहिते -------दादोजी कोंडदेव वारल्यानंतर १६४७ शहाजी राज्यांच्या जहागिरीची व्यवस्था महाराजांकडे आली . सुपे परगाण्यावर देखरेख करण्यासाठी "संभाजी मोहिते" याची शहाजीराजे यांचेकडून हवालदार म्हणून नेमणूक झाली होती. शेवटी विजापूरकरांचा नोकर . तो त्यांना दाद देईना . महाराजांनी सामोपचाराने पुष्कळ खटाटोप केली . हा मोहिते आपणास बधत नाही हे पाहुन त्यानी एका रात्रीत सुप्यावर छापा घातला . सुपे घेतले व मोहित्यांची सर्व खजिना व पागा वगैरे आपल्या ताब्यात घेऊन त्याला कैद करून शहाजीराजे कडे पाठवले . मोहिते हा शहाजीराजे चा गुमास्ता तेंव्हा शहाजीराजे च्या मनाप्रमाणे वागणे हे त्याचे कर्तव्य व तो त्याप्रमाणे वागला ह्यात काही गैर नाही.
घोरपडे ----------घोरपड्यांचा उदय आदिलशाहीत झाला . बाजी घोरपडे व भोसले यांचा संबंध एकमेकांशी दोनदा आला . प्रथम शाहजी विजापूरकरांतर्फे जिंजीच्या वेड्यात गुंतला असता (१६४८)वजीर मुस्तफाखानने शहाजीस पकडले व बाजी घोरपडे याचे बरोबर विजापुरास पाठवले . दुसरी वेळ म्हणजे शहाजीच्या मृत्यूनंतर (२३जानेवारी १६६४)विजापूरकरांचा व महाराजांचा बेनाबाब होऊन जविजापूरकरांनी महाराजांवर स्वारी केली ती वेळ. मुधोळचे बाजी घोरपडे व वाडीचे सावंत यांनी खवासखानाच्या मदतीस येण्याचे ठरवले. हे महाराजांना समजताच महाराजांनी मुधोळांस जाऊन बाजी घोरपड्यांचा पराभव केला . ह्या वेळेस बाजी मारले गेले. बाजी घोरपडे हा विजापूरकरांचा नोकर . त्याने शहाजीराजेस विजापुरास नेले ते मुस्तफाखानाच्या सांगण्यावरून. खुद्द महाराजांनी मालोजी घोरपडे याना जे पत्र लिहिले आहे, त्यात ते म्हणतात "जेंव्हा काही मुस्तफाखान याने महाराजास दस्त करविले." पुढे विजापूरकरांच्या स्वारीत मदत केली ती बादशहाच्या सांगण्यावरून . सारांश त्यांनी जे जे काही केले ते विजापूरकरांचा नोकर म्हणून केले.
वाडीचे सावंत --------आदिलशाहीत यांचा उदय झाला. त्यांना विजापूरकरांकडून त्यांना कुडाळ प्रांताची मिळाली त्यांनी तेथील देसाई व नाईक यांचा मोड करून . त्यांनी आपणास सरदेसाई पदवी घेतली खेम सावंत यांचा संबंध आला . पाहिल्याने महाराजांबरोबर आपला निभाव लागणार नाही हे पाहून तह केला. (एप्रिल १६५९)परंतु नंतर विजापूरकरांशी संगनमत करून खवासखानाचे मदतीने शिवाजी महाराजांशी युद्ध करण्याचा चग बांधला . हे पाहून महाराजांनी त्यांचा पराभव केला व कुडाळ प्रांत घेतला . तो काळ असा धामधुमीचा होता . आपला फायदा जेणे करून होईल अशा मार्गानेच जावयाचे असेच सरदार देशमुख यांचे साधारण धोरण ठरलेले होते . स्वराज्याची कल्पना लोकांमध्ये मुरली न्हवती. तेंव्हा सरदारांची अशीच भावना होती कि शिवाजीचा हा पोरखेळ दोन दिवसाचा आहे. उद्या त्याला बादशाह चिरडून टाकेल. आपण सर्वगोष्टीचा विचार करूनच वागणे इष्ट आहे . हा व्यावहारिक मार्ग त्यांनी स्वीकारला . यात त्यांचा दोष आहे असे वाटत नाही.
सुर्वे --------------आदिलशाहीच्या अंकित असलेले हे सरदार .महाराजांचे मोरे यांच्या बरोबर युद्धात त्यांनी मोरे याना मदत केली . जावळी घेतल्यानंतर महाराजांना मी तुमचा "क्रीत पुत्र "असा निरोप पाठवला . महाराजांनी सुर्वे याना क्षमा केली . नंतर आपणाकडे महाराजांचे दुर्लक्ष आहे असे पाहून व आपला जुना धनी विजापूरकर याच्या भिडेस बळी पडून एके रात्री संगमेश्वर येथे महाराजांचे सैन्य असताना अचानक छापा टाकला . तो तानाजी मालुसरे यांनी तो परतवला. महाराज त्यावेळी कोकणपट्टी सर करण्यात गुंतले होते . वरील हकीकत ऐकून महाराजांनी सूर्यरावास बोलावणे केले . तो त्यावेळी आला नाही. हे पाहून महाराजांनी तेथे जाऊन शृंगारपुर घेतले. सूर्यराव पळून गेला (१६५६).
महाराज ज्यावेळेस जन्मास आले त्यावेळी सर्वत्र यावनी अंमल सुरु होता . महाराष्ट्रात आदिलशाही,कुतुबशाही,व मोगल हे मालक होऊन बसले होते या यावनी राज्यात मराठे सरदार आपापली असणे स्थिर करून बसले होते . . जो तो आपापली जहागिरी सांभाळून होता . स्वराज्याची संकल्पना शककर्ते शिवाजी महाराज यांच्यामुळे आली . अशावेळेस महाराजांनी डोके वर काढले व स्वराज्य स्थापले. तत्कालीन परिस्थिती बघता . शहाजीराजे स्वतः अनेक शाह्यांचा कारभार बघून शेवटी विजापूरकरांकडे आले . महाराजांचा चुलतभाऊ मंबाजी भोसले हा विजापूरचा नोकर असून तो त्यांच्या वतीने महाराजांबरोबर लढून मेला. महाराजांचे चुलते मोगलांचे नोकर . ,महाराजांचे आप्त फलटण चे निंबाळकर व शिंदखेडचे जाधव हेही आदिलशाहीचे व मोगलांचे सरदार होते . हि झाली खुद्द वडिलांची व आप्तेष्टांची स्थिती होती त्यामुळे शिवाजी महाराजांना तत्कालीन मराठे सरदारांचा विरोध स्वाभाविक वाटतो.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...