विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यावर धनगर लोकगीते

पुण्यश्लोक अहिल्याबाई
यांच्यावर धनगर लोकगीते सुंदर आहेत .
त्या लोकगीतातून जीवन उभे राहते .
........................................

सुंबरान मांडीलं
सुंबरान मांडीलं
सुंबरान कुणाचं
ज्ञातीबहिण अहिल्याच

पाथरडी या खेड्यात
नगर त्याहो जिल्ह्यात
धनगर कोणी राहत
आनंद शिंदे म्हणत
निर्वाह त्याचा शेतावरी
स्वभाव जात्या परोपकारी

पत्नी लाभे त्याचे सम
वर्ष गेली पुत्रविना
घोर पडला बाईला
चिंता पडली स्त्रीला
हट्ट धरला बाईने
पुर्ण केला आनंदान

कल्पकथा म्हणतात
खरी गोष्ट सांगतात

आनंदराव शेतात
दुपारच्या हो वेळात
वेळ टळली जेवनाला
माऊली बसली धरनीला

लांब जटा मस्तकाला
भगवी कफनी अंगाला
बैरागी आला भिक्षेला
जय शंकर बोलला
मना विचार आला
परमेशाने धाडीला

गोसावी बोलू लागला
गोसावी सांगू लागला
आत्मा तृप्त होईल
कैलास संभा पावेल

भोळ्या त्याही मावलीन
परोपकारी बाईने
पती जेवण असुन
कारण दिले लावुन

संतोष बैरागी होऊन
अंगारा झोळी काढुन
कपाळा दोघा लावावे
कोल्हापूरला जावावे
काही दिवस राहावावे
अंबादेवीला भजावे
प्रसन्न खचित होईल
मनोरथ पुर्ण करील

शकुन तो समजून
प्रसाद त्योही घेवुन
कोल्हापूर नगरीला
लांब दुर पल्ल्याला
निघुन हो चालली
निघुन हो चालली
अंबामातेच्या सेवेला
जगदंबाच्या आसर्याला

देवी पावली नवसाला
आनंद झाला वेळेला
नवमास गर्भाला
प्रसुत झाली वेळेला
मुलगी आली जन्माला
शुभ त्याहो योगाला

शास्त्री ज्योतिषी बोलावुन
जन्मकुंडली बनवुन
बारशे त्यानी घेतले
अहिल्या नाव ठेविलें

ज्योतिष बोलु लागला
ज्योतिषी सांगु लागला

मुलगी मोठी गुणी हो
संस्थानाची स्वामिनी

किरत मिळविली भूमीवरी
नाही मिळविली अजवरी

गोष्ट घडली कलीयुगाला
सतराशे मिळविली सालाला

#अहिल्या_पर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...