## अंबिकाबाई ##
छत्रपती राजाराम महाराजांचा अंतकाळ सिंहगडावर अकल्पित झाल्याने त्यांच्या पत्नी पैकी त्यांच्याजवळ कोणीच न्हवते.
" ताराबाई व राजसबाई" या आपल्या मुलांसमावेत पन्हाळ्यावर होत्या
आणि "अंबिकाबाई" विशाळगडावर होत्या.
अंबिकाबाई यांचे दुसरे नाव "अहिल्याबाई" होते.
अंबिकाबाई ह्या सर्वात तरुण पत्नी होत्या .
राजाराम महाराजांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांनी सती जाण्याचा संकल्प केला .
"मल्हार रामराव" वर्णन करतात,
" हे वर्तमान विशाळगडी कळले ,त्या समई चार सहा घटका दिवस होता. अंबिकाबाई साहेब यांना समजल्यानंतर
त्या वाड्यातून निघून सदरेस आल्या.
हवालदार व इत्यादिकांनी मुजरा करून ते श्रमी झाले.
तेव्हा बाई बोलल्या की
,"हा मृत्यूलोक आहे.
श्रमी का होता?"
"आम्ही सहगमन करणार" साहित्य करावे."
यावरून सरनोबत बोलिला की ,
"महाराजांचा काळ सिंहगडी झाला .
आज तिसरा दिवस."
"तेंव्हा सहगमन कशास करावे?"
तेंव्हा उत्तर केले की," आपल्याला कळला तोच दिवस मुख्य.
तुम्ही कोणी संशय न धरता
साहित्य लवकर करा. अनमान कराल
तर तरी तुम्हास महाराजांच्या पायाची शपथ.."
तेव्हा हवालदार याने विनंती केली की,
" दिवस थोडा राहिला"
" मलकापुराहून" साहित्य येणें .
रात्र होईल .
गलबलीचे दिवस.
किल्ल्याचे काम,
येविशी आज्ञा व्हावी."
तेव्हा म्हणाल्या," स्वार पाठवून समान आणवावे.
" मी सहगमन केल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही" . तेव्हा सारे एकमेकांकडे पाहू लागले..
तेव्हा बोलल्या ,"तुम्ही खोटे मानू नका."
सदरेची सावली पडली होती..
त्या सावली जवळ किंचित मातीचा ढीग करवून त्यावर पळसाचे पान
रोवले.
"त्यास ओलांडून सावली जाणार नाही".
असे बोलल्या.
असे म्हणल्यावर हवालदारानी विनंती केली की ,
"आज्ञेप्रमाणे स्वार रवाना करतो.
अस्तमान झाल्यास दरवाजे लावीन .
साहेबी रागे भरू नये'
" नाही."
असे उत्तर केल्यावर स्वारामागे स्वार ठेवून स्वारांची डाक लाविली.
पळसाचे पानावरुन सावली पुढे गेली नाही .
मलकापुराहून साहित्य येऊन महाराजांच्या पागोट्याबरोबर बाईंनी सहगमन केले.
स्नानविधी सर्वत्र करीत तो पर्यंत प्रकाश दिसतच होता.
सर्वत्र सदरेस आल्यावर
चार तास रात्र झाली.
अंध:कार दिसू लागला.
सतीचा मजकूर पन्हाळ्यास पंतांकडे पाठवून दिला.
पंतांनी दानधर्म बहुत करविला .
पुढे सती गेल्या ठिकाणी बुवासाहेब महाराजांनी वृंदावन बांधून खर्चाची नेमणूक केली.
राजाराम महाराजांची उत्तरक्रिया जीवजीराजे भोसले वावीकर यांजकडून करविण्यात आली .
आशा प्रकारे अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई 6 मार्च 1700 मध्ये सती गेल्या.
इतिहासात बऱ्याच ठिकाणी ही तारीख 15 मार्च 1700 दिलेली आहे व त्या पन्हाळ्यावर सती गेल्या अशी माहिती आहे..
ही खरी नाही.,
राणी श्रीमंत अखंड सौभाग्यवती" अंबिकाबाई राजे साहेब भोसले" यांना एक मुलगी होती.
परंतु ती सती जाण्यापूर्वी वारली होती.
डॉ. उदयकुमार जगताप
No comments:
Post a Comment