विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 July 2020

## भुईंजचे राजे जाधवराव ##




## भुईंजचे राजे जाधवराव ##

स्वराज्यात वेळोवेळी तलवार बहादुरी करून त्यांचे वर्धन करणारी
जी मराठ्यांची घराणी होती,
त्यातील "जाधव" हे एक प्रसिद्ध होत .
वाईपासून सुमारे चार कोसावर" कृष्णेच्या" तटाकी "भुईंज "म्हणून एक गाव आहे.
तेथे अद्याप सिंदखेडराजा येथील जाधव यांच्या घराण्याचा वंश आहे. स्वराज्यातील मोकसगिरी, जहागिरी ,सरंजाम, तदंगभूत वैभव जरी आता नष्ट दशेत आहे.
तरी या घराण्याचे वंशज पूर्वीचा थोरपणा सांभाळून आहेत .
या घराण्यात
"रायाजीराव जाधव "
नावाचा एक सरदार
" छत्रपती शाहू" महाराजांच्या काळात उदयास आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गादीची चाकरी करायची.
ती मरेपर्यंत अढळ चालवायची.
गादीवर बसणाऱ्याला देवाप्रमाणे मान द्यायचा.
त्याच्याकरिता हातावर शीर घेऊन समरंगणात उभे राहायचे .
त्यांच्या शत्रूच्या नरडीचा घोट घ्यायचा.
हेच ब्रीद या घराण्यात नखशिखान्त भरले होते.
आणि शेवटी 28 फेब्रुवारी 1728 मधील "पालखेडच्या" लढाईत रायाजीस वीर मरण आले.
ही लढाई बाजीराव पेशवा व निजाम उल मुल्क यांच्यात झाली .
औरंगाबाद पासून 28 मैलावर असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर सध्याच्या
" पुणतांबे" गावाजवळ झाली .
या लढाईचा जगाच्या इतिहासात एक महत्वाची रणनीती म्हणून उल्लेख केला जातो .
निजामाची फौज एक लाख व बाजीराव पेशव्यांची फौज फक्त 25 हजार .
तरीही मराठे जिंकले .
याचे कारण स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेले सैन्य ,
सैन्यात बहुसंख्य घोडदळ,
रस्त्यात वाटेल ते खाऊन गुजारा करणे ,
गतिमानता, चपळता ,
छत्रपती शाहूंचा रायाजीवर विशेष लोभ होता.
तो त्यांच्या एकनिष्ठपणामुळे.
रायाजीचा पुत्र "खंडेराव" म्हणून होता.
तो शिपाईबाण्यानेच होता.
तथापि सदोदित मुखाने राम भजन चालवणारा होता.
त्याला दोन पुत्र होते.
थोरला मुरारराव
व धाकटा गोविंदराव .
मुराररावास शिपाई शिक्षणा बरोबर लिहावाचायचेही शिक्षण मिळाले होते .
मुरारराव जातीचा मराठा.
पण त्याचे आचरण शुचिर्भूत ब्राम्हणसारखे होते.
या जाधवांच्या वाड्यात शास्त्री असे.
तो रोज वाड्यात माईसाहेब व काकीसाहेब याना पुराण सांगत असे व मुराररावाबरोबर अध्यात्म विषयावर सस्पृह भाषण करीत असे.
मुरारराव पहाटेस तालीम,
सायंकाळी आवडत्या घोड्यावर बसून फेरफटका
व महिन्यातून एक दोनवेळा शिकारीस जात असे .
एके दिवशी त्याच्या जवळच्या माणसांनी त्याला दरबारातील भानगडी सांगितल्या.
क्रोधाने त्याचे डोळे लाल झाले .
हातात तलवार घेऊन देवघराची वाट धरली.
दिसणार नाहीत अशी एकदोन हत्यारे त्यांनी आपल्या पोशाखात लपवली.
व नाना फडणवीस यांच्या वाड्याच्या दिशेने गेला.
वाड्यात शिरून मनगटाच्या जोरावर नानाची चौकशी केली .
नाना सापडला नाही.
नाना अगोदरच त्याचा अवतार बघून वाड्यातून सटकला होता.
मुरारराव मानी स्वभावाचा होता .
कोणालाही कळू न देता स्वदेशाला त्याने शेवटचा रामराम ठोकला..
मुरारराव नाहीसा झाला.
असे जग बोलू लागले .
या शूर मराठ्याला कोणीही हसत त्याच्या पथकासह चाकरिस ठेवले असते.
परंतु मुरारराव अधम कोटीतला न्हवता.
त्यामुळे तो कायमचा नाहीसा झाला.

उदयकुमार जगताप

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...