postsaambhar :Varsha Mishra
अहिल्या देवीची ज्ञानलालसा आणि औदार्य बुद्धी व्यापक होती. त्यांना लहानपणी शिक्षण असे फारसे मिळाले नाही, कारण त्या काळात स्त्रियांना पुस्तकी विद्या शिकण्याचा प्रघात नव्हता तरीही मराठा कालखंडात अनेक स्त्रिया साक्षर असल्याची ऊदाहरणे आहेत. मल्हाररावांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली असावी.
अहिल्याबाई मोडीत लिहत असत,त्यांचे मोडी लिपीतील सुंदर हस्ताक्षर आजही उपलब्ध आहेत. कथा पुराणे ऐकण्याची त्यांना लहाणपासुन आवड होती. पुराणाचा अर्थ व त्यातील नीतीतत्वे त्यांना चांगली समजली होती. त्याच्याजवळ फार मोठा ग्रंथ संग्रह होता, काही ग्रंथाचे त्या नित्यनेमाने श्रवण करत.
अहिल्याबाई नी महेश्वर येथे वेदाभ्यासाच्या व संस्कृतच्या पाठशाळा काढल्या, काशी येथे तर ब्रम्हपुरी विद्यापीठ सारखे वसवलेले होते. पुराणाचे वाचन, किर्तन, प्रवचन, भागवत अनेक देवंदेवतांचे ऊत्सव यासारखे प्रबोधन घडुन आणले. अनेक विद्वावांना ,पंडितांना, ज्योतीषांना आश्रय दिला.
त्याकाळी मुद्रणकला अस्तित्वात नसल्यामुळे ग्रंथाचे स्वरूप हस्तलिखित असायचे. अहिल्याबाई ने अनेक विद्वावांनाकडुन हस्तलिखित ग्रंथ तयार करून त्यांचे दान केले. आपल्या प्रजेला ज्ञानाअम्रूत देण्याची त्यांची ती भावना. अहिल्याबाई ने ज्ञानी, विद्वावांनाकडुन अहिल्या 'कामधेनू' नावाचा ग्रंथ लिहून घेतला. हा ग्रंथ म्हणजे कला,विद्या, इत्यादींचा ज्ञानकोश होय.या ग्रंथाने ज्ञानप्रकाशाचे कार्य तर केलेच परंतु पुर्वापार चालत असलेल्या चांगल्या पद्धती जीवंत ठेवण्यासही मोठ्या प्रमाणात मदत केली....
संदर्भ-
देवी अहिल्या- मुक्ता लेले
अहिल्याबाई होळकर स्मृती विशेषांक- सुलोचना पाटील.
#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा
No comments:
Post a Comment