विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर

पुण्यश्
लोक अहल्याबाई होळकर
postsaambhar :अमर मोरे
मल्हारराव हे इंदूरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांची सून अहल्याबाई होळकर यांच्या हाती इंदूरच्या राज्यकारभाराची सूत्रे आली. अहल्याबाईंनी सुमारे २८ वर्षे राज्याचा कारभार समर्थपणे करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावली. त्या प्रजाहितदक्ष आणि न्यायी होत्या. त्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. त्यांनी अनेक जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केला. प्रजेच्या सुखसुविधांसाठी त्यांनी नदीकिनारी अनेक घाट बांधले, तसेच अनेक धर्मशाळाही बांधल्या. त्या शिवाच्या भक्त होत्या आणि नियमितपणे शिवाची उपासना करीत. एकदा राघोबा पेशवे यांनी इंदूरवर स्वारी करून होळकरांचे राज्य बळकावण्याचा मनसुबा आखला. ती बातमी अहल्याबाईंना कळताच त्यांनी राघोबादादांना पत्र लिहून सणसणीत उत्तर दिले, माझ्याशी लढतांना तुम्ही जिंकलात, तर स्त्रीशी लढून कोणता पुरुषार्थ दाखवणार आहात ? जर तुम्ही या युद्धात हरलात, तर स्त्रीकडून पराजित झाल्यामुळे तुम्हाला जगाला तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे युद्ध करण्यापूर्वी विचार करा. हे पत्र वाचून राघोबांनी युद्ध करण्याचे टाळले. कणखर मनाच्या आणि लढवय्या वृत्तीच्या अहल्याबाई सर्वांसाठीच आदर्श ठरल्या. अतिशय दानशूर म्हणून नावलौकिक असलेल्या अहल्याबाईंचे वर्ष १७९५ मध्ये निधन झाले. मध्यप्रदेश राज्यातील महेश्वर (जिल्हा खरगोन) हे गाव होळकर साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. येथेच पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचा वाडा होता. #अहिल्यापर्व #जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...