विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळ #भाग 2

 

या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळ
#भाग
2 या १० गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराज ठरतात सर्व राजांपेक्षा वेगळे पहिले ५ मुद्दे #भाग१ मध्ये वाचा. ६) अनेक कायदे केले: महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले होते आणि त्याचे पालनही केले जात होते. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते. ७) धर्मनिरपेक्षवादी: शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. मुस्लिमांसोबतच इतरही अनेक जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती. ८) महिलांचा आदर: शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं. सैनिकातील कुणी असे केल्यास ते सैनिकाला कठोर शिक्षा करीत होते. महिलांचा आदर करणे हा त्यांचा आदेश होता. ९) ते अंधश्रद्धाळू नव्हते: शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच केल्या आहेत. १०) गनिमी कावा: गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ माहिती साभार पाउलखुणा इतिहासाच्या🙏

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...