हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवाजी महाराजांबद्दल सा-या जगाला कुतूहल आहे. त्यांच्यावरून राजकारणही पेटतं. शिवाजी महाराज आमचे की तुमचे असा वादही निर्माण होतो. पण खरंच शिवाजी महाराज कोण होते हे जाणून घेणे आज अधिक महत्वाचे झाले आहे. देशात अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज त्या राजांपेक्षा वेगळे कसे होते हे माहिती करून घेणं महत्वाचं आहे.
१) स्वत:च स्वत:चं राज्य निर्माण केलं:
शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. जन्मताच त्यांच्या तोंडात चांदीच चमचाही नव्हता. त्यांनी स्वत: त्यांचं मराठी माणसाचं विश्व निर्माण केलं. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. त्यांना ह्या गोष्टी पिढीजात मिळालेल्या नाहीयेत. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या १६ वर्षी जिंकला होता. यावरून त्यांचं वेगळेपण दिसून येतं.
२) महाल उभारण्यापेक्षा १०० पेक्षा जास्त किल्ले बांधले:
इतर राज्यांप्रमाणे शिवाजी महाराजांना ऎश आरामात राहणे कधीही पसंत नव्हते. किंवा त्यांनी ते पसंत केले नाही. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्यांऎवजी त्यांनी त्यांच्या जनतेचं रक्षण करता यावं म्हणून १०० पेक्षा जास्त किल्ले उभारले.
३) टॅक्स सिस्टीम बदलली:
शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना टॅक्स गोळा करायचे. कसेही आणि कितीही प्रमाणात लोकांकडून टॅक्स गोळा केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतक-यांकडून वसूल करण्यात येणारा टॅक्स कमी करून टाकला.
४) शेतक-यांना मदत:
अनेक लोकांकडे शेती करण्यासाठी स्वत:ची जमीन नव्हती. शिवाजी महाराजांनी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली ज्याचा फायदा शेतीला मोठा झाला.
५) भारतीय नौदलाचे जनक:
शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी तेव्हा अतिशय दमदार असं आरमार त्यांनी तयार केलं होतं. त्यामाध्यमातूनच त्यांनी अनेकदा ब्रिटीश आणि फ्रेन्च लोकांना धूळ चारली आहे.
No comments:
Post a Comment