मराठा पगडी
मराठा पगडी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून प्रसिद्ध पावली. ह्यात छत्रपती शिवाजीमहाराजांचा शिरेटोप सोडला तर साधारण सगळे मराठा सेनापती,सरदार, मावळे लोक हे माझ्या फोटोत डोक्यावर जी पगडी आहे ह्या पद्धतीची पगडी वापरत असत. ब्राम्हण लोक ब्राम्हणी गोल पगडी वापरत असत; ज्याला अलीकडच्या काळात टिळक पगडी असेही म्हणतात. (आजकाल आपण त्याला पुणेरी पगडी म्हणतो. अर्थात पुण्याचा आणी ब्राम्हणी गोल पगडीचा काहीही संबंध नाही.)
मुळातच पुनवडी म्हणजे आहे शितोळे सरकारांचे, झाम्बरे पाटलांचे, बहिरट पाटलांचे, शिरोळे पाटलांचे.
असो.
मराठा पगड्यांमध्ये विविध प्रकार आहेत. ते प्रकार असे: मावळी पगडी,
सातारा छत्रपती पगडी, कोल्हापुरी छत्रपती पगडी, ग्वाल्हेर च्या शिंद्यांची
शिंदेशाही पगडी, बडोद्याच्या गायकवाडांची पगडी, धार-देवासच्या पवारांची
पगडी, नागपूरकर भोसल्यांची पगडी, मुधोळकर घोरपड्यांची पगडी, तोरखेडकर
कदमांची पगडी, होळकर पगडी अश्या बऱ्याच प्रकारच्या मराठा घराण्यांच्या
मराठा पगड्या आणि त्यांचे विविध प्रकार आहेत.
आपण आपला हा इतिहास जपला पाहिजे आणि हट्टाने आपल्या शुभ कार्यांमध्ये वापरला पाहिजे. आपली लग्नकार्ये आणि इतर सण उत्सवांमध्ये आवर्जून आपली मराठा पगडी वापरून आपली मराठा संस्कृती जपावी म्हणून हा खटाटोप....
(काही भाग डिलीट केला आहे नाइलाजास्तव)
सौजन्य:-सतिश कदम सर
No comments:
Post a Comment