सातारातील मराठा सरदार
सरसेनापती हरजीराजे राजेमहाडीक
छत्रपती शिवराय निर्मित स्वराज्य बांधणीमध्ये अनेक छोट्या मोठ्या घराण्यातील सर्वसामान्य लोकांनी मोलाची साथ देऊन प्रसंगी प्राण त्याग करून स्वराज्य निर्मितीमध्ये इतिहास कोरून ठेवला अश्या 18 पगड जातीतील सर्व परिचित, अपरिचित स्वराज्य योध्याना स्मरून हा छोटासा लेख लिहण्याचा माज्यासारख्या पामराचा हा अल्पसा प्रयत्न.
स्वराज्य बांधणीमध्ये भोसले, निंबाळकर, जाधव, घोरपडे, महाडिक, आदी घराण्यांनी आपला वेगळाच आत्मविश्वासू ठसा महाराजांच्या काळजात उमटवला होता, त्यापैकी राजे महाडिक ह्या घराण्याने आपला वेगळाच दबा स्वराज्य निर्मितीच्या काळात कर्नाटक प्रांतात उठवला.
महाडिक घराण्याला छ. शाहू महाराजांच्या काळात
गावांची वतनकी व सरदेशमुखकी छ. संभाजी महाराजांची मुलगी व छ. शाहूंची बहीण
भवानी बाई महाडिक (शंकराजी राजेमहाडीक यांची पत्नी) यांच्या पराक्रमाने
मिळाली होती ती खालील प्रमाणे गावे आहेत...
तारळे(जि.सातारा)
___महाडिक घराण्याचा सगळा कारभार हा तारळे (ता.पाटण जि. सातारा) येथून व्हायचा, गावामद्धे सद्य परिस्तिथी मद्धे 8 वाडे अजूनही शाबूत आहेत, पैकी यातील 3/4 वाड्यामद्धे त्यांची वंशावळ राहत आहे, घराचे बांधकाम हे चुण्या मद्धे केलेले असून कौलारी वाडे आहेत, प्रत्येक वाड्यामध्ये वृंदावन, प्रशस्त बैठकीची जागा आहेत, यातील काही वाड्यामद्ध्ये आजही सुस्थितीतील जुन्या काळातील भांडी, कपाटे, शास्त्रास्त्रे (तलवार, दांडपट्टा, खंजीर) पाहायला मिळतात, जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रीयानां नेण्यासाठीची पालखी, पेठारे आजही पाहायला मिळतात. (खाली दिलेले फोटो पहा)
गावामद्धे 8 वाड्यांबरोबर वाड्याच्या बाजूला जुने राममंदिर व मंदिरालागत जुन्या काळातील विहीर पाहण्यासारखी आहे, तसेच जुने पडझड झालेले वाडे, इतरत्र पडलेले शिल्पे, वीरगळी गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतात.
____गावच्या बाहेर नदीकाठी संगमावरती शंभूपुत्रिका भावाणीबाई महाडिक यांची समाधी आहे तिथे नतमस्तक व्हावे, सध्या समाधीची दुरावस्था झाली आहे, आम्ही हाराजीराजेंचे 13 वे वंशज राजेमहाडीक यांच्याशी बोलणे झाले आहे लवकरच समाधीचे जिर्णोधार करण्यात येईल असे समजले आहे
● इतिहास______
__श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात
हे महाडला आले महाडवरून त्यांना राजेमहाडीक असे आडनाव पडले त्यांचा
महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले
त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य
निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले
हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस
कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच
लक्ष होते .
___ मुलगा हरजीराजे राजेमहाडीक हे शिवरायांचे विश्वासू व
सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज
यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची
जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी
अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती
दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही
ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची
जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच
ठेवली ___.
पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले
त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या
मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी
हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार
झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29
सप्टेंबर 1689 ला जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले.
_____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी (28 गावांची वतनकी) 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या होत्या. तेथे त्यांची समाधी आहे.
(काही माहिती हि नेटवरून अज्ञात लेखकाची वापरली आहे, पुस्तकांचा संदर्भ घेऊन मिळवली आहे)
माहिती संकलन बाळासाहेब पवार
No comments:
Post a Comment