सरदार संभाजी नरसोजी गायकवाड
वरंध ता. महाड जि. रायगड येथील छत्रपती घराण्याशी सदैव स्वामीनिष्ठ असणारे श्री संभाजी नरसोजी गायकवाड अधिकारी शिक्केकरी देशमुख , तपे बिरवाडी यांचा ४०० वर्षापुर्वीचा एेतिहासीक वाडा. आमच्या आजोबांच्या मावस भावांचे हे घराणे . आजही ह्या घराण्यातील त्यांचे थेट वंशज श्री सुरेशराव बापु व विलासराव काका शिक्केकरी देशमुख वाड्यावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तितक्याच मायेने प्रेमाने विचारपुस करून आदरातित्थ्य करतात . ज्या आसनावर बसून न्याय निवाडे केले जायचे ते एेतिहासिक लाकडी आसन आजही आपल्याला या वाड्यात पहायला मिळते.
या घराण्याचा वंशविस्तार वरंध , देशमुख कांबळे , बिरवाडी , आसनपोई जि. रायगड , जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील कर्जत फाट्यावरील चौक गाव , खर्डी कसारा जि. ठाणे इ. ठिकाणी झाला आहे
शिवतिर्थ रायगडावर भोरमार्गे जाताना वरंध घाट उतरल्यावर लगेचच लागणार्या वरंध गावातील या एेतिहासीक वाड्याला इतिहासाची आवड असणार्या सर्व शिवभक्तांनी जरूर भेट द्यावी .
Source Nana Dhumal
No comments:
Post a Comment