विनोद जाधव एक संग्राहक

Friday 14 August 2020

सरदार शिंदे चे ऐतिहासिक गाव पिंगोरी

 



सरदार शिंदे चे ऐतिहासिक गाव पिंगोरी
आजची भटकंती पुरंदर तालुक्यातील पिगोरी गाव...पुरंदरच्या पायथ्याशी वासलेल गाव.. दरी खोर्यात राहणारे पराक्रमी मराठ्यांचे वारसदार शिंदे पाटिल घराने.. निरसर्गास अनुकूलून आपले वास्तव्य करणारे मरहट्टी जन.. डोंगर दर्यात वाघ, वारा आणि मराठा वावरु शकतो याच जीत जागते उदहारण पिंगोरी....
लोनंद जेजुरी मार्गावर.जेजुरी पासून १५की.मी. तर वाल्हे या गावा पासून ५ की.मि अंतरावर हे गाव आहे..!! उत्तरेत आपले अधिराज्य गाजवाणाऱ्या शिंदे घरान्याची आनेख गावे या महाराष्ट्रात आहेत. त्या पैकी एक पिंगोरी गाव.. गावत आनेख ऐतिहासिक वास्तु छत्र्या मंदिरे,विहिरी पहावयास मिळतात..
प्रथम दर्शनी पहावयास मिळते ते श्री वाघजाई मंदिर..बंधिस्त प्रकारात लाकड़ी मंडप व गर्भ गृह आशी रचना असणाऱ्या या मंदिरात.. वाघावर आरूढ असलेली वाघजाईची मूर्ती आहे या देवीस पिंगलाई असेही संबोधले जाते...
या मंदिराच्या प्रवेशद्वारा वर एक शिला लेख असून त्यावरुण ईस.१८१२ मध्ये सदर दरवाजाचे काम श्री बापूजीराव विठ्ठल शिंदे पाटिल यांनी वाघाई चरणी केल्याचे भासते..
या पिंगलाई देवी मुळे या गावास पिंगोरी नाव मिळाले अशी आख्यायिका आहे.. मंदिराचे बांध काम हे दगडी रुपात आहे मराठा शैलीचे मंदिर हे खुप पुरातन आहे.. दगडी दिप माळ, पालखी सुबुक आणि कोरिव काम डोळे थक्क करतात..
देवीच्या मंदिराच्या पाठी श्री शंभु महादेवाचे मंदिर आहे मंदिर गोल घुमट दगडी बांधकामत आहे...
#शिंदे छत्री...
या गावचे पाटिल यांची छत्री मंदिराच्या परिसरात आहे..सदर छत्री ही श्री बापुजीराव विठ्ठल शिंदे यांची असून याच पाठी प्रतिपा रूपी छत्री आहे..
ग्वाल्हेरकर शिंदयाची ही एक शाखा आहे.. या गावात आज देखील ग्वाल्हेर कर शिंदे यांचा वाडा आहे काळाच्या ओघात वाडा नामशेष झाला असला देखील वाद्याच्या काही तटा आजी देखील उभ्या आहेत..
#अमर जवान स्तंभ देश रक्षण्याची अभूती छत्रपातीं पासून आलेली ते दत्ताजी शिंदे यांच्या इतिहासाची पुनरावृति हे गाव करत आहे.. गावातील बरेच जन देश सेवा बजावत आहे त्यातील कामी आलेल्या विरांच्या स्मरणार्थ अमर स्तम्भ उभारला आहे..
#मटाची विहिरी... या विहिरित उतरण्यास दगडी पायऱ्या आहे विहिरित उतरतास पिंड आणि नंदीचे दर्शन होते सबंध दुष्काळ जरी पडला असता या विहिरीतिल पाण्याची पातळी कमी होतो नाही. विहिरीचे बांधकाम दगडी आणि विटा मध्ये आहे विहिरित आडवी भूयार आहे.. विहिरी वर एक दगडी शिलालेख आहे..
विहिरी लगत एका पिराची सामाधी आहे दर वर्षी या ठिकाणी उरुस मोठ्या उत्साहत साजरा होतो...
-साभार शेखर शिंदे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...