विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या सखुबाई

 

"जेष्ठ शिवकन्या सखुबाई राणीसाहेब " 

POSTSAAMBHAR ::डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर



🚩🚩

शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या सखुबाई .यांचा जन्म इसवी सन सोळाशे 48 मध्ये झाला.त्यांचा विवाह फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ पुत्र महादजी नाईक निंबाळकर यांचेशी सोळाशे 56 मध्ये शिवाजी महाराजांनी पुण्यात लावून दिला .या लग्नाला स्वतः सईबाई राणीसाहेब हजर होत्या. फलटणचे नाईक निंबाळकर यांचे घराणे अत्यंत शौर्यशाली व पराक्रमी असे होते. सखुबाई राणीसाहेब या सर्वात ज्येष्ठ कन्या असल्यामुळे शिवाजीराजांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या. नाईक-निंबाळकर यांच्या घरांशी भोसले यांचे पूर्वापार संबंध चालत आले होते. शहाजीराजांचे ,जिजाऊ साहेबांचे ,व शंभूराजे या तिघांचेही आजोळ फलटणचे नाईक निंबाळकर, वनंगपाळ बारा वजीराचा काळ अशी ख्याती असलेले आपल्या तोलामोलाचे हे घराणे असल्यामुळे राजेंनी ही सोयरीक मोठ्या आनंदाने निवडली होती .शिवाजी राजांचे जावई महादजी नाईक निंबाळकर यांनी स्वराज्याच्या कामी आपल्या सासर्यांना उत्कृष्ट सहाय्य केले होते. पुढे संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेते वेळी महादजी नाईक निंबाळकर मोगलांच्या हाती लागले. महादजीराजे यांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले काही दिवसांनी महादजी नाईक निंबाळकर यांचा गाॅल्हेरच्या कैदेतच मृत्यू झाला. नंतर त्यांच्या पत्नी सखुबाई राणीसाहेब फलटणला सती गेल्या. सखुबाई राणीसाहेब यांची समाधी राॅयल छत्रीबाग येथे आहे. .सखुबाई राणीसाहेब यांना शिवाजीमहाराजांनी पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे गाव चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिले होते. सध्या फलटण जिल्हा सातारा येथे विधान परिषदेचे अध्यक्ष माननीय श्रीमंत रामराजे , संजीव राजे ,रघुनाथ राजे श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर व समस्त . नाईक निंबाळकर वास्तव्य करतात.नाईक निंबाळकर यांचा मनमोहन राजवाडा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. "सखुबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा "

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...