जेष्ठ शिवकन्या सखुबाई राणीसाहेब यांची फलटण येथील समाधी : डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर
माळशिरस (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या सखुबाई .यांचा जन्म इसवी सन 1648 मध्ये झाला.त्यांचा विवाह फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ पुत्र महादजी नाईक निंबाळकर यांचेशी 16 56 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात लावून दिला .या लग्नाला स्वतः सईबाई राणीसाहेब हजर होत्या.
फलटणचे नाईक निंबाळकर यांचे घराणे अत्यंत शौर्यशाली व पराक्रमी असे होते. सखुबाई राणीसाहेब या सर्वात ज्येष्ठ कन्या असल्यामुळे छत्रपती शिवाजीराजांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या. नाईक-निंबाळकर यांच्या घरांशी भोसले यांचे पूर्वापार संबंध चालत आले होते. शहाजीराजांचे ,जिजाऊ साहेबांचे ,व शंभूराजे या तिघांचेही आजोळ फलटणचे नाईक निंबाळकर, वनंगपाळ बारा वजीराचा काळ अशी ख्याती असलेले आपल्या तोलामोलाचे हे घराणे असल्यामुळे राजेंनी ही सोयरीक मोठ्या आनंदाने निवडली होती छत्रपती .शिवाजी राजांचे जावई महादजी नाईक निंबाळकर यांनी स्वराज्याच्या कामी आपल्या सासर्याला उत्कृष्ट सहाय्य केले होते.
पुढे संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेते वेळी महादजी नाईक निंबाळकर मोगलांच्या हाती लागले. महादजीराजे व सखुबाई राणीसाहेबांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. काही दिवसांनी महादजी नाईक निंबाळकर यांचा मृत्यू झाला.
नंतर त्यांच्या पत्नी सखुबाई राणीसाहेब आपल्या सासरी फलटणला येऊन सती गेल्या.
त्यांची समाधी फलटणला राॅयल
फॅमिली छत्रीबाग येथे
आहे. सध्या फेसबुकवर माळशिरस येथील
जोड समाधी महादजी
नाईक निंबाळकर आणि
सखुबाई राणीसाहेब यांचीच
आहे असा सर्वत्र गैरसमज
झाला आहे. परंतु
ती समाधी महादजी
नाईक निंबाळकर व
सखुबाई राणीसाहेब यांची
नाही हे सांगण्यासाठीच मी
ही पोस्ट व
समाधीचे फोटो पाठवत आहेत.
No comments:
Post a Comment