आदिलशाहीचं एका साधारण लष्करी ठाणं एवढीच ओळख असलेला बिरमदेवाचा डोंगर आपल्या चाणाक्ष नजरेने हेरून त्याला मराठा साम्राज्याच्या राजधानीचं स्वरूप दिलं. इथला एक-एक चिरा महाराजांच्या नजरेखालून गेला असेल. राजगडाचा सर्वात महत्वाचा भाग मी या पाली दरवाज्याला समजतो कारण असंख्य वेळा इथून महाराज गेले असतील. सुखदुःखाचे अनेक खलिते इथून गेले असतील. कधी जिजाऊंचा मेणा तर कधी शिवराज्ञांचे मेणे इथून आले गेले असतील. बाल शंभुच्या इवल्या पाऊलखुणा अन राजारामाचे बोबडे बोल ही या दरवाज्याने कवटाळून ठेवले असतील. खरंच जर चिरे बोलत असते तर असंच काहीतरी ते सांगत राहिले असते, नाही का..? कधी मुद्दामहून गर्दी टाळून एकदम शांतपणे या दरवाज्यात उभं राहून बघा हा दरवाजा तुमची इतिहासाची भूक नक्की भागवेल फक्त कान इतिहासासाठी आसुसले हवेत...
-मयुर राजेंद्र चौधरी
No comments:
Post a Comment