विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 August 2020

🚩 #शिलेदार_शिरोळे_पाटील_घराणे 🚩

🚩
#शिलेदार_शिरोळे_पाटील_घराणे 🚩
(पुण्यनगरीचे ऐतिहासिक वारसदार)

POSTSAAMBHAR ::Adityaraj Shirole

* पुणे शहर म्हणजे खरतर महाराष्ट्र ची सांस्कृतिक वैभव ऐतिहासिक पाशवभूमी लाभलेल्या या शहराच्या नावलौकिकात भर घालण्याचे काम अनेक दिग्गजांनी केले. स्वराज्यातील पुरातन सेवक म्हणुन शिलेदार शिरोळे (शिरवले) पाटील घराण्यास संबोधले जाते. शूरवीर शिलेदार रत्नोजी शिरोळे (शिरवले) हे या घराण्याचे मूळपुरूष. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेले आणि ऐतिहासिक रोहिडा किल्लयाजवळ असलेले लोहम या घराण्याचे मूळ गाव, रोहिडा किल्लय वर एक प्रमुख बुरुजाचे नाव "शिरवले बुरुज" असे आहे ते याच घराण्याचे . श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्मितीसाठी पावनखिंडीत 13 जुलै 1660 रोजी जो रणसंग्राम झाला त्या वेळी घोडखिंडीत जी लढाई झाली, त्या लढाईत नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या बलिदानामध्ये शूरवीर शिलेदार शिरोळे (शिरवले) स्वराज्याचा कामी आले. या बलिदानाचया सन्मान म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे प्रांतातील भांबवडे (भांबुर्डे-शिवाजीनगर) हे गाव आणि ह्या गावाची जमीन शिलेदार शिरोळे (शिरवले) घराण्याला इनाम म्हणुन दिली. तेव्हा पासून शिलेदार शिरोळे (शिरवले) घराण्याची नाळ पुणे प्रांतातील भांबवडे (भांबुर्डे-शिवाजीनगर) गावाशी जुळली, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालात शाहिसतेखानावर स्वारी केली त्यावेळेसही महाराजांच्या आदेशावरून शिलेदार शिरोळे (शिरवले) यांनी या संपूर्ण स्वारीची चोख व्यवस्था केली होती. भांबवडे (भांबुर्डे) गावात असलेल्या ग्रामदैवत श्री रोकडोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेतच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अश्व बांधून ठेवले होते तेथूनच ते पुढील कार्यवाहीसाठी रवाना झाले होते या स्वारी वेळीही शिलेदार शिरोळे (शिरवले) यांचा सहभाग होता. काळांतराने शिरवले या आडनावाचे शिरोळे या आडनावात रूपांतर झाले. इ.स. 1720 - 1722 मध्ये काळ कठीण असल्याने भांबवडे (भांबुर्डे) च्या "बहिरट पाटलांनी" निम्मी पाटीलकी "शिलेदार मोराजी शिरोळे" यांना विकली, तेव्हा पासून शिरोळे घराण्याला गावाच्या पहिले/प्रमुख पाटील चा हक्क आणि मान मिळाला, दोन्ही घराणी (शिरोळे आणि बहिरट) भांबवडे (भांबुर्डे-शिवाजीनगर) गावाची पाटीलकी (वतनदारी) समर्थपणे संभाळत आहे. मराठ्यांचया इतिहासातील पानिपताच्या युद्धात "शिलेदार शिरोळे (पाटील)" घराण्यातील सात शूरवीर शिलेदार शहीद झाले होते - शिलेदार सुलतानजी, शेखोजी, आंनदराव, बळवंतराव, गोविंदराव, इत्यादी, त्या नंतर या घराण्याला पिंपळे गुरव येथील 42 एकर जमीन इनाम मिळाली होती, शिरोळे घराण्यातील शूरवीर शिलेदारांनी स्वराज्य साठी आजुन भरपूर युद्ध लढली आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिरोळे घराण्यास अनेक मानमरातब मिळत गेले, बिनीवाले शिरोळे, शिरोळे इनामदार, अशी अनेक पदव्या घराण्याला मिळत गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगतील पहिला अश्वरुड पुतळा शिवाजीनगर मध्य शिरोळे घराण्याचा जमीनीवर आहे. श्री सदगुरू जंगली महाराजांचे प्रमुख शिष्य म्हणून शिरोळे घराणं ओळखले जाते. पुणे शहर वसवण्यात शिरोळे घराण्याचे मोठे योगदान आहे, फर्ग्युसन काॅलेज, कृषी महाविद्यालय, पोलिस लाईन ऐरीया, पोलिस ग्राऊंड, Bhandarkar Institute, Ranade Institute, Government Polytechnic College, Modern College and School, J.W.Marriot Hotel, SSPMS School, छत्रपती संभाजीराजे उद्यान, पुणे महानगरपालिका, डेक्कन जिमखाना क्लब आणि सोसायटी, शिवाजीनगर परिसरातील अनेक सामाजिक संस्थांच्या मुळ जमीनी शिरोळे घराण्याच्या मालकीच्या आहेत.
पुणे शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात शिरोळे घराणे नेहमी प्रथम स्थानावर असतात.
* शिरोळे घराण्यातील मातब्बर लोका - डी.आय.जी. ऑफिसर कै. दिनकरराव आबुराव शिरोळे, महापौर व आमदार कै. भाऊसाहेब शिरोळे, आमदार कै. मालतीबाई शिरोळे, कै. माधवराव शिरोळे, माजी महापौर बाळासाहेब शिरोळे, डी.एस.पी. ऑफिसर कै. संभाजीराव बाजीराव शिरोळे, मेजर कै. कृष्णराव माधवराव शिरोळे, डाॅ. कै. धैर्यशील शिरोळे, डाॅ. श्रीरंग शिरोळे, फर्ग्युसन कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. कै. बाबूराव गणपतराव शिरोळे, माजी खासदार अनिलराव शिरोळे, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, नेते रणजित शिरोळे.

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...