विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 4 August 2020

शिवभारत तथा अणुपुराणांतील तपशील शहाजीराजे कौद लढाई वर्णन

शिवभारत तथा अणुपुराणांतील तपशील शहाजीराजे कौद लढाई वर्णन .....
_____फर्जंद बाहुबली महाराज शहाजी राजे आणि आदिलशाह यांच्यात नाराजी झाल्याने शहाजीराजेंच्या खास मिञ रणदुल्लाखां यांच्या मृत्यूनंतर आदिलशाहने मुस्तफाखानास सरसेनापती केले पण शहाजीराजेंचे व याचे कधी जमलेच नाही नंतर मुस्तफाखानास आदिलशाहने आदेश दिला की शहाजीराजास कौद करा.सावध शहाजीराजास कोणच कौद करू शकत नव्हते मग पहाटे पहाटेच मुस्तफाखानच्या सैनिकांनी शहाजीराजे झोपेतचं असताना हल्ला चढवला . शहाजीराजे कालव्याने उठले युद्ध सुरू होते त्यात खंडोजी पुष्कळ युद्ध करून पडला. शहाजीराजेंनी ही आपली समशेर चालवली अचानक झालेल्या हल्ल्याने जखमी शहाजीराजेंना कौद केले. आदिलशहास ही बातमी समजताच तयास आनंद झाला.
कविंद्र परमानंद लिहतात ... आपल्या पित्याला शञूने पकडल्याचे कळल्याने बंगळूर येथे राहणार्या शंभूजीस रूस्तमखानचा अतिशय संताप आला. प्रतापी शिवाजीस हे समजल्यास आदिलशहाचा सुड घेण्याची प्रतिज्ञा केली. मुस्तफाखानने बंगळूर घेण्यास डुरे वंशातील मुख्य तानाजीराजे, विठ्ठल गोपाळ ब्राम्हण व पोक्त फरादखान यांना पाठवले . त्याचवेळी महंमदशाहने शिवाजीवर चालून जाण्यास सरदार पाठवले.
____ फत्तेखान नावाचा सेनापती मिनाद शेख व रतन शेख आणि शरीफशहा धनुर्धारी व कवचधारी सज्ज यवन आणि वज्रासारखे बाण आहेत असा मताजी घाटगे फलटणचा राजा बजनाईक आणि सोन्यांच्या पाठीशी धनुष्ये ,कंबरपट्टे,वस्ञे,ध्वज, आणि सोन्याचांदीच्या ढाली धारण करणारे शेकडो मांडलीक राजे यांनी बेलसर नावाने नगर बलाने हस्तगत करून तळ ठोकला. त्याचप्रमाणे उत्तम गोलंदाज क्रुर असा हैबतरावाचा बल्लाळ याने अनेक सैनिकांसह शिरवळ गाठले.
____ तेव्हा तो आलेला ऐकून शिवाजीने कवच बाण हाती घेऊन शस्ञस्ञाञे हाती घेऊन आपल्या सैनिकांस म्हणाले , माझे वडील स्वतःच्या संपत्तीने युक्त असतांही मुस्तफाखानवर विश्वास ठेऊन ही त्यांस कौद केले आहे. ज्या आदिलशहाचे राज्य रक्षिले आज्ञा पळाली महाराजांनी त्यांचे काय केले होते? मिञांचा शञू झाल्यामुळे निराधार असा हा आदिलशहा आपल्या ऐवश्वर्यामुळे मान्य असला तरी विनाश पावला नाही हे आश्चर्य होय.
_______ बंगळूरी मी या गडांचे रक्षण करीत अगदी जोराने मी शञूंशी झुंजेन . इकडे मी आणि तिकडे मोठे बंधू आम्ही दोघेही युध्द करून पित्यांस सोडवू.गर्विष्ठ महंमदशाहचा आम्हांकडून पराभव झाला तर तो शहाजी महाराज यांना स्वतः हा सोडवेन.
जर आदिलशहा मुर्खपणाने महाराजांस अपाय करील तर बाबाच त्यास सहकार्यकर्यांसोबत त्यास लगेच ठार करतील.
______ लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी घेतली आहे. संतापलेला घोरपडे मला पाहून गोगलगाय झाला आहे . युद्धार्थ एकदम चाल करून मी फलटण राज्यास पळवून लाविले आणि जिवंत पकडून सोडिले. आता हे फत्तेखानास एकञ जाहले . अतिबलाढ्य बल्लाळ शिरवळ घेतल्याने स्वतःहास फार मोठा समजतं आहे. म्हणून तुम्ही येथुनी जाऊन त्या बल्लाळास पकडावे. मग त्या फत्तेखानास उद्या पर्वा इथे वा तिथे आम्ही त्यांच्याशी युध्द करू. शिवाजीचे हे हुकूम ऐकून सर्व सैन्य सिंहाप्रमाणे गर्जले.
______ मग शञूंचा विध्वंस करणारा आणि निकराच्या युध्दात आनंद मानणारा गोदाजी जगताप जणू दुसरा भीमच , भयंकर बलाढ्य भीमा वाघ , शञूंचा गर्व हरण करणारा संभाजी काटे, आणि भाल्याचे टोक तो शिवाजी इंगले शञुंची लक्ष्मी चोरणारा लढण्यात भयंकर सैनिक असलेला सेनानायक भैरव , हे सर्व स्वामीस प्रणाम करून निघाले. शिवाजीने काबूकास (कावजीस) त्या सर्वांचे सेनापती नेमले. आपल्या युध्दाचा पोषाख चढवून गर्जना करीत पुरंदराहून खाली उतरले तेथेच राञ घालवून शञूस जिंकण्याच्या इच्छेने तयार झाले.मराठा सैन्य निघाले शिरवळ कडे बघता बघता शिरवळ गाठले.
____ शिवाजीचे सैन्य पाहून बल्लाळ म्हणतो युध्दात मरणे हे श्रेष्ठ आहे युध्दात पळून जाणे हे निंद्य आहे. फत्तेखानच्या आज्ञेवरून आपण शिरवळ घेतले आहे. आपले ठाणे धृवाप्रमाणे अढळ आहे. म्हणून जोराच्या युध्दासाठी आपण टेकडीचा आश्रय घेऊ . बल्लाळचे भाषण ऐकून हजारो शञू दुर्गाचा आश्रय करून हत्तीप्रमाणे गर्जू लागले .शञूंनी तटांचा आश्रय घेतला .
शिवाजीचे सेनापती कावजीने म्हणाले शञू तटाचा आश्रय घेतला याला बुरूज नाही खंदकही नाही हा दुर्ग दुर्गम आहे असे समजू नका.याला वेढा द्या सभोवतीचा मार्ग बंद करा . सैनिकांनी चोहोबाजूनी हल्ला केला . आतुन धनुष्य बाण येत होते चाके,नांगर,कर्णे,मुसळे , धिरटे; पेटलेली कोलिते , तापलेली तेले, आणि नानाप्रकारची शस्ञे मराठा वीरांवर फेकत होते.
______ मग दिर्घ गद्यांनी लोखंडी काठ्यांनी आणि काही आवेषयुक्त सैनिकांनी अनेक ठिकाणी तो दुर्ग फोडला.काहींनी शिड्यावरून तट बिलगिले.कावूकाने गद्याने आणि वेगवेगळ्या शस्ञांनी समोरची वेस पाडली आणि तो आत घुसला त्यावर शञुसैध्याने लगेच चाल करू लागले.
______ कावूकच्या नेतृत्वाखाली भिकाजी , भिमाजी , गोदाजी , दरोजी, संभाजी, तुकाजी, आणि दुसरेही सैनीक घोडे वेगाने उडवित बल्लाळवर सैन्यावर त्वेषाने चाल करू लागले . त्या ठिकाणी इंगळ्याने पंचवीस पोळाने चौदा चोराने सोहळा घाटग्याने तेवीस वाघाने सोळा असे शञु एका क्षणांत ठार केले आणि कावूकने उत्तम जबरदस्त असे योद्धे एकोणीस ठार केले. जेव्हा मराठा सैन्याचा वाढता जोर पाहता बल्लाळचे सैन्य भितीने पळू लागले. पळणारे शञू हैबतरावाचा पुञ रोखू शकला नाही . भाल्याने हौबतरावाचा पुञ पाडला आणि बरीच शञुसैन्य कावूकास शरण आलेले सैन्य सोडून दिले वाटेल तिकडे पळाले.मग शञू रणांगणावर पडला असता हत्ती घोडे अलंकार वेगवेगळी वस्ञे कवचे पालख्या आणि भरपूर सामान घेऊन अत्यंत आनंदित होऊन होत्साने कावूकादी आणि उत्तम योद्धे शिवाजीस भेटण्यासाठी पुरंदरगडावर गेले.
फोटो क्रमांक 1 ) गोदाजीराजे जगताप समाधी स्थळ सासवड.....
2) गोदाजीराजेंची प्रतिमा.....
संदर्भग्रंथ
छञपती शिवाजी महाराज पुर्वाध
लेखक वा सी बेंद्रे सर
लेखांकन बाळासाहेब पवार
9604058030

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...