विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 4 August 2020

"छत्रपती राजाराम महाराज तिसरे (करवीर संस्थान)"




"छत्रपती राजाराम महाराज तिसरे (करवीर संस्थान)"
कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बी. टी. काॅलेज, शिवाजी टेक्निकल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (कोर्ट), कलेक्टर आॅफीस, साईक्स लाॅ काॅलेज अशा खूप देखण्या वास्तू आहेत. छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी यांचे पुतळे आहेत. हे वास्तू हे पुतळे कोणी उभा केले तर या साऱ्यांत राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे; पण काळाच्या ओघात राजाराम महाराजांचे हे काम दडून गेले आहे. केवळ वास्तूच नव्हे, तर 1922 ते 1940 अशी एकूण आठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहीला. राजा म्हणजे राजवाडा ऐषोरामी यात गुंतून न रहाता राजाराम महाराजांनी कोल्हापूरला नवा मार्ग दाखवला.
त्यांच्या काळात रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला. शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. दसरा चौकात शाहू महाराजांचा, लक्ष्मीपुरीत आईसाहेब महाराजांचा देखणा पुतळा उभा केला. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात बाळंतपण व शिशुउपचार असे स्वतंत्र मोफत उपचार कक्ष सुरू केले. याशिवाय कोल्हापूर बँकेची त्यांनी स्थापना केली. लक्ष्मीपुरी परीसराची उभारणी केली. जयभवानी फुटबॉल टिमची स्थापना करून उभरत्या खेळाडूंना संधी मिळवून दिली.
कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्यांनी पुण्यात उभारला.
महाराजकुमारी पद्माराजे छत्रपती ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या एकमेव अपत्य व लाडक्या कन्या व करवीरकर छत्रपती घराण्याच्या रक्ताच्या थेट वारस...
महाराज कुमारी पद्माराजे छत्रपती ह्यांचे लग्न किल्ले तोरखेड जि. धुळे चे जहागीरदार कदमबांडे ह्या सरदार घराण्यात झाले.
महाराजकुमारी पद्माराजे राजाराम महाराज छत्रपती (कदमबांडे) यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी आमदार. श्रीमंत राजवर्धनसिंहराजे कदमबांडे हे करवीरकर छत्रपती राजाराम महाराजांचे रक्ताचे थेट वंशज (नातू) आहेत...
मा. आमदार. राजवर्धनसिंहराजे कदमबांडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज (पणजोबा) व आजोबा छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्ताचे थेट वारसदार म्हणून समाजातील सर्व स्तरातील दीन दुबळ्या, गरजु लोकांसाठी सदैव तत्पर असतात व छत्रपती घराण्याच्या रक्ताचा व विचारांचा वसा सार्थकी लावत आहेत!!
📷📷"छत्रपती राजाराम महाराज (करवीर संस्थान) यांच्या जयंतीनिमित्त मानाचा हिंदवी मुजरा"📷📷

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...