विनोद जाधव एक संग्राहक

Friday 14 August 2020

सरदार बाबाजी कोंडे देशमुख

 सरदार बाबाजी कोंडे देशमुख

छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली बाबाजी कोंडे देशमुख यांच्या मदतीने खेडशिवापूर येथून वाहणार्या आंबील अोढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली..
या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील अोढ्यास जाउन मिळते..
व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील अोढ्यास मिळते.
येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात..

साभार भूषण कोंडे देशमुख इतबारराव

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...