🙏 सालप्याची लढाई व मोहिते घराण्याचा उदय 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक पुणे)
: सरसेनापतीं हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते हे
अहमदनगरच्या निजामशाहीत लष्करी सेवा बजावीत होते.स.1584 साली निजामशाहीत
उद्भवलेली बंडाळी त्यांनी मोडून टाकली. तेव्हा निजामशहाने त्यांना बाजी हा
किताब बहाल करुन त्यांचा मोठा सन्मान केला. तेव्हापासून त्यांचे वंशज
स्वतःला 'बाजी' मोहिते म्हणून घेऊ लागले. रतोजी मोहिते यांचे पुत्र तुकोजी
मोहिते यांनी तळबीडची पाटीलकी हस्तगत केली; तेव्हापासून मोहीते मंडळी
तळबीडचे रहिवाशी बनले.
रतोजी यांना तीन अपत्ये झाली.
तुकोजी,संभाजी व कन्या तुकाबाई. यापैकी संभाजींचे लग्न घाडगे घराण्यातील
मुलीशी तर तुकोजींचे लग्न घोरपडे घराण्यातील मुलीशी झाले .तुकाबाई यांचा
विवाह श्रीमंत शहाजी
राजे भोसले यांच्या बरोबर झाला. घाडगे व घोरपडे
हे दोघेही आदिलशाही सरदार होते. त्यांनी आपल्या जामातांना -तुकोजी व संभाजी
यांना- अदिलशाही दरबारात रुजू केले. स. (1622) मध्ये लवकरच दक्षिणेत एक
महत्त्वाची घटना घडली. निजामशाही दरबारातील पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले
रुसून आदिलशाही दरबाराकडे आले.आदिलशहाने त्यांचा मोठा सन्मान करून
त्यांना 'सरलष्कर' ही पदवी व आपल्या वतीने पुणे प्रांताची जहागिरी बहाल
केली !आदिलशहाच्या वतीने पुणे प्रांतावर आपला अंमल बसवीत असता निजामशाही
सेनानी साबाजी अनंत यांच्याशी शहाजीराजांची सालप्याच्या घाटात लढाई झाली.या
लढाईत शहाजीराजांचे सोबत असणाऱ्या संभाजी व तुकोजी या मोहिते बंधूनी
मोठे शौर्य गाजवले.स्वाभाविकच शहाजी राजांची त्यांच्या वर मर्जी
बसली.(स.1625) मधे या मोहिते बंधुनी आपल्या बहिणीचा - तुकाबाईंचा
शहाजीराजांशी विवाह घडवून आणला. अशाप्रकारे ते राजांचे मेहुणेच बनले.! आता
राजांनी आदिलशहाला खास विनंती करून या बंधूंना तळबीड व बालाघाटची देशमुखी
मिळवून दिली. (स 16 26)
तुकोजी व संभाजी मोहिते मोठे
पराक्रमी सेनानी होते .त्यांच्या पराक्रमाचे वेळोवेळी आदिलशहाने केलेले
कौतुक अनेक आदिलशाही फर्मानात पहावयास मिळते. पुढे लवकरच संभाजी मोहिते
यांना शहाजीराजांनी सुपे परगण्याचा सर हवालदार म्हणून नेमले .पुढे संभाजी
मोहिते कर्नाटकात गेलेले दिसून येतात. नंतर त्यांनी सोयराबाई छत्रपती
शिवाजी महाराज यांना तर अण्णुबाई व्यंकोजीराजे यांना तर हंसाजी ऊर्फ
हंबीरराव मोहिते यांनी आपली कन्या ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांना देऊन
भोसले व मोहिते यांचे नाते संबंध घडवून आणले.असे हे भोसले - आणि मोहिते
यांचे घनिष्ठ संबंध मराठेशाहित निर्माण झाले.
श्रीमंत शहाजी
राजे भोसले यांच्या बरोबर मोहिते बंधूनी शौर्य व पराक्रम गाजवला
,अशाप्रकारे सालप्याच्या लढाई नंतर मोहिते घराण्याचा उदय झाला.
1) श्रीमंत शहाजी राजे भोसले - तुकाबाई राणीसाहेब
2) छत्रपती शिवाजी महाराज- सोयराबाई राणीसाहेब
3) व्यंकोजीराजे- अण्णुबाई
4) छत्रपती राजाराम महाराज- ताराराणी साहेब
5) छत्रपती थोरले शाहू- सगुनाबाई साहेब
अशा प्रकारे भोसले यांच्या घराण्याशी वेळोवेळी मोहिते यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले.
🚩जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराया 🚩
🚩 जय शंभूराजे 🚩
No comments:
Post a Comment