विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

🚩 29 मे 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोजीबंधन 🚩

 

🚩 29 मे 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोजीबंधन 🚩छत्रपति शिवाजी का जीवन परिचय और रोचक ...

 लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
(इतिहास अभ्यासक पुणे)

गागाभट्टांनी महाराजांच्या
राज्याभिषेकविधीसाठी एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार ठेवला होता '.राज्याभिषेकप्रयोग' हे या ग्रंथाचे नाव .राज्याभिषेकविधि कसा कसा करावयाचा, कोणकोणते धार्मिक संस्कार व समारंभ करावयाचे वगैरे गोष्टीची तपशीलवार शास्त्रीय माहिती गागाभट्टांनी अत्यंत दक्षतापूर्वक अभ्यासली होती. त्यानुसार आता धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता.
रायगडच्या महाद्वारावर तोरण चढले. नगारे ,चौघडे ,शिंगे कडकडू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली. तांदुळात कुंकू मिसळले गेले. स्वस्तिक चिन्हे उमटली. गागाभट्टांनी गणरायास आवाहन केले.श्रीमन्महागणाधिपतयेनमः! एकेका विधिस प्रारंभ झाला. पहिला विधी महाराजांचे मौजीबंधन! महाराजांची मुंज व्हायची राहिली होती, म्हणजे केलेलीच नव्हती! कारण जरी भोसले क्षत्रियकुलोत्पन्न होते. तरी त्यांची मुंज झाली नव्हती. धार्मिक संस्कार झाले नव्हते.मुंजीशिवाय क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही ,म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज होणे जरूर होते. गागाभट्टांनी मुंजीची तिथि ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ही निश्चित केली होती.मुंजीसाठी देवदेवकाची प्राणप्रतिष्ठा, कुलधर्मकुलाचारादि विधि झाले .
शुद्ध चतुर्थी उजाडली . स्त्रियांची , पाहुण्यांची,शास्रीपंडितांची मंगल वर्दळ सुरू झाली. मुहूर्ताची घटिका घंघाळात हेलावू लागली. हजारो वैदिक ब्राह्मणांच्या, अग्नीच्या व सूर्याच्या साक्षीने महाराज मुंजीसाठी सिद्ध झाले. मुंजमुलाचे वय यावेळी अवघे 44 वर्षाचे होते. महाराजांची अगोदरच लग्न झाली होती. गागाभट्टाने व बाळंभट्टाने सर्व पौरोहित्य केले.वाद्धे दणाणली.पंचआरत्या झाल्या. महाराजांच्या गळ्यात यज्ञोपवीत आले. अग्नीच्या साक्षीने महापवित्र गायत्री मंत्राची महाराजांनी दीक्षा घेतली. महाराज संस्कारयुक्त क्षत्रिय झाले.
29 मे 1674 रोजी महाराजांची मुंज झाली.मुंज झाल्यावर मगच विवाह करावयचा असतो.शास्र हे असे सांगते.गागाभट्टांनी महाराजांना शास्राप्रमाणे आता लग्न करण्याची आज्ञा केली. महाराजांची अगोदरच आठ लग्न झालेली होती. त्यातील काही राण्या हयात होत्या. आता शास्त्राप्रमाणे नवीन लग्न करावयाचे.महाराजांना आता परत लग्न करणे हा मुद्दा मुळीच पटणारा नव्हता.
लग्न झालेल्या या राण्यांशीच महाराजांची पुन्हा लग्ने लावावीत! शास्त्राला ते मंजूर होते! आणि महाराजांची लग्न ठरली ! म्हणजे मुंजीच्या दुसऱ्या दिवशी सोयराबाई राणीसाहेबांचा महाराजांशी समंत्रक विवाह झाला. लग्नात थाट - समारंभ मात्र मुळीच करण्यात आला नाही. नंतर सकवारबाईसाहेब, पुतळाबाई साहेब यांचीहि महाराजांशी लग्ने करण्यात आली. अशा प्रकारे 29 मे 16 64 74 या दिवशी महाराजांची समंत्रक मुंज पार पडली.
एकेका दिवशी एकेक विधी होत होते ॠत्विजवर्णन - पुण्याहवाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायकशांती करण्यात आली. नक्षत्रशांती, ग्रहशांति,ऐंद्रियशांती ,पौरांदरीशांति वगैरे विधि पार पडले होते.महाराज या काळात व्रतस्थ होते. दुग्धपान व फलाहार करुन ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासांग पार पाडीत होते
नंतर महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचे ठरले होते. 16 महादानांपैकी तुळादान हे एक दान हे आहे. या दिवशी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यात येत होते. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. पारडी समभार झाली. महाराजांची तुळा झाली. एकूण 17 हजार होन लागले .म्हणजे महाराजांचे वजन पक्के 2 मन होते.(160 पौंड) होते. या पारड्यात महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली. व या सर्व धनाचा दानधर्म केला .सोने, चांदी ,तांबे ,कापूर ,साखर, लोणी ,फळे ,मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुला करण्यात आली व ते सर्व पदार्थ दान करण्यात आले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...