"🚩🚩शंभूकन्या भवानी बाई 🚩🚩
भवानीबाई संभाजी राजे भोसले यांचा जन्म 26 जानेवारी 16 79 रोजी शृंगारपूर
येथे झाला .भवानी बाई या छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या
नात व संभाजी राजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या. संभाजी
राजांच्या मृत्यूनंतर भवानी बाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व
धाकटे बंधू शाहू महाराज यांचेबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या .त्यांचे
लग्न हरजी महाडीक व अंबीकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक म्हणजेच भवानी
बाईंच्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी औरंगजेबाच्या कैदेत असतानाच
लावून दिले गेले. शंकराजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना
शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खुप प्रयत्न केले .संभाजी महाराजांच्या
मृत्युनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता ,साऱ्या दक्षिण
प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या, अशावेळी हरजी महाडीक व शंकराजी
महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला
त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी माहाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे
यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानी बाई यांना चोवीस
गावांची सनद त्यांच्या नावे करून दिली .शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या
भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व
धाडशी होत्या मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात 1 जुलै
1710 मध्ये भवानी बाईंनी परत उभी केली .शंकराजी महाडिक यांचे सुमारे 17
28 च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी
महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या.राजे महाडिक घाराण्याच्या खाजगी
स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी
इतिहास प्रेमीलोक आजही आवर्जुन भेट देतात. भवानीबाई यांना दुर्गोजी व
अंबाजी हे दोन पुत्र होते .तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच शिवाजी
महाराजांची मुलगी व नात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा
,दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांचे वंशजाचे आठही
वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत. तारळे गाव सातारा पासुन 30 किलोमीटर अंतरावर
आहे. "अशा या शिवकन्या व शंभूकन्या यांना आमचा मानाचा मुजरा "
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
No comments:
Post a Comment