विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

महाराणी सईबाई भोसले

 

महाराणी सईबाई भोसले
मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारत उमटवली. शिवछत्रपतींच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये जसा मातोश्री जिजाऊंचा सहभाग होता तसाच पत्नी सईबाईंचा सुद्धा होता.
एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायंच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उजवले..
एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले..
स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब अखंड सौभाग्य अलंकृत सईबाईसाहेब शिवाजीराजे भोसले.
पूर्ण नाव:- सईबाई शिवाजीराजे भोसले.
वडील:- माधोजीराव निंबाळकर.
आई:- रेऊबाई निंबाळकर.
बंधु:- बबाजी निंबाळकर
जन्म:- २९ ऑक्टोबर १६३३.
जन्मस्थान:- फलटण, महाराष्ट्र.
विवाह:- १६ मे १६४०.
पति:- छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
संतती: सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर ( फलटण-सातारा)
राणूबाई - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा)
अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा)
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
मृत्यू:- ५ सप्टेंबर १६५९
समाधीस्थळ:- राजगड
पार्श्वभूमी:- सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत.
विवाह:-
विवाह पुण्यातील लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होत्या. सईबाई ह्या शिवरायांच्या सवंगडी स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या.
तलवारबाजी:-
सईबाई यांना तलवारबाजीची आवड होती. सईबाई ह्यांनी लहापणापासून मातोश्री जिजाऊंच्या छत्रछायेखाली व शिवरायांबरोबर शीक्षण घेतले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी सईबाईंना ढोहाळे हे तलवारबाजी, घोडेस्वारी असे लागले होते.
शिवरायांनी साईबाईंना दिलेली भेटवस्तू:-
शिवरायांना जुन्नरच्या छाप्यामध्ये एक शिल्प सापडले होते. ते होते “बाळकृष्ण”. सईबाईंना ते शिल्प खूप आवडलं आणि त्या म्हणाल्या “दृष्ट लागावे असे शिल्प आहे. आणि आता हे आमचे झाले”.
संभाजीराजेंचा जन्म:-
१४ मे १६५७ (गुरूवार घटिका १०) रोजी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांना जन्म दिला.
ज्येष्ठ शु।। १२ हेमलंबी संवत्सरशके १५७९.
महाराणी सईबाईंची प्रकृती अधिकच खराब आणि स्वराज्य गिळंकृत करायला आलेला खान :-
संभाजीराजेंचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणी साहेब अंथरुणाला खेळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य
सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता.
अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले. सईबाईंच्या आजाराने महाराज थोडे चिंतेत असत. पण तलवारी संग लगीन लागलेल्या राजांना आपल्या भावविश्वात रमायला तरी वेळ होता कुठे, अखंड रयतेचा विचार करणारे राजे त्यांना उसंत ती कुठली. खानाशी कसे झुंजावे, कोणास काय कामगिरी द्यावी सारी सारी खलबत राजांच्या डोक्यात चालू. त्यातच कुठेतरी सईबाईंचा विचार मनास डंक लावून जाई.
सईबाई म्हणजे राजांच्या लहानपणातील सवंगडी. एकत्र खेळणे, बागडणे, भांडणे, रुसवे - फुगवे अशा कैक कैक गोष्टी. हवा बदलीचा सुद्धा काही परिणाम दिसत नव्हता. म्हणून सईबाई आणि आऊसाहेब परत राजगडी आले. राजगडाहून राणीसाहेबांच्या प्रकृतीच्या बातम्या सतत प्रतापगडी जात असत. राजगडाहून येणारा प्रत्येक संदेश. राजांच्या मनाला घोर पाडत असे.
एक दिवस राजांना आलेल्या खलीत्यात त्यांना राजगडी भेटीस बोलावले. आणि राजे गेले देखील. गडावरील हवा सहन होत नव्हती म्हणून शिवापटण इथे एक वाडा राजेंनी बांधला होता. सईबाई इथेच असत. राजे भेटीला आले. आणि भेटून गेले सुद्धा. प्रतापगडी खानाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी सुरु झाली. महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व मुत्सद्दी प्रतापगडी पोहोचले. मावळखोरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक वार्ताही गडावर पोहोचली. श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुणावू लागला.
निधन:-
नेमक्या याचवेळी सईबाईसाहेबांची प्रकृती पार ढासळली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी - लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य आमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला (दिनांक ५ सप्टेंबर १६५९ रोजी) सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला ! एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला ! भरल्या मळवटाने सईबाई महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या !!!
संदर्भ :- शिवपत्नी सईबाई (डॉ. सदाशिव शिवदे)
राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे)
स्वराज्यरक्षक संभाजी (मालिका)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...