विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

🚩 " रावरंभा निंबाळकर आणि मेहेलका "🚩

 


🚩 " रावरंभा निंबाळकर आणि मेहेलका "🚩


" तेचि पुरुष दैवाचे ,असे ज्यांच्या बाबतीत म्हणावे असे फारच थोडे पुरुष जन्माला येतात .रावरंभा निंबाळकर अशाच भाग्यवंता पैकी एक ! निंबाळकर घराण्याची अखेरची मारती समशेर, सौंदर्याचा जाणकार,समशेरीचा फर्जंद, रसिकतेचा मुर्तीमंत आविष्कार आणि या गुणांमुळेच आयुष्याच्या अखेरीस विपन्नावस्थेत काळ गुजरण्याचा प्रसंगही चारुदत्ता प्रमाणेच या दैवी पुरूषावर आलेला दिसतो.इ.स. 1705 साली जन्मलेले रावरंभा दिर्घायुषी झाले .पण याच रावरंभास आपल्या डोळ्यासमोर हैदराबाद राज्यावर इंग्रजांचा अंमल बसलेला पहावा लागला. आणि ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले ते हैदराबाद देखील इंग्रजांच्या आदेशाने सोडावे लागले .शौर्याबरोबर रावरंभाच्या आयुष्यात शृंगाराचे पर्व देखील फार मोठे होते. वीर आणि शृंगार या दोन रसांचा रावरंभा जणू आदर्श प्रतीकच होते. त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त प्रभावी ठरलेली स्त्री म्हणजे हैदराबादची वसंत सेना समजली जाणारी सुप्रसिद्ध नर्तकी आणि गायिका महेलिका उर्फ चंदा ही होय.माहेलका आणि रावरंभा निंबाळकर यांची भेटच मुळी काहीशा वेगळ्या प्रसंगाने झालेली आहे. मेहलका म्हणजे चंद्रमुखी. तिच्या असामान्य लाव्वण्यावर व गायनावर खुश होऊन निजामशहाने चंद्रमुखी हा किताब मेहलकाला बहाल केला होता. एक दिवस रावरंभा निंबाळकर मेहेलकाचे गाणे ऐकायला तिच्या दिवाणखान्यात येतात .त्यावर मेहेलका म्हणते ,"गफलत झालेली दिसते हा गाण्याचा मोहल्ला नाही की ही गाण्याची कोठी नाही हुजूर" शब्दाने शब्द वाढत जातो. दोघेही एकमेकांना जोखत राहतात.मेहेलका गाण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करते. रावरंभा 50 हजार रुपये देऊन गाणं न ऐकताच निघून जातात .मेहेलका साठी ते निरोप ठेवतात "ज्या वस्तूचे मोल निश्चित आहे त्याचे आम्हाला कौतुक वाटत नाही" या शब्दाने मेहेलका घायाळ होते .आणि रावरंभा निंबाळकर यांच्या प्रेमात पडते .एकदा पुण्यात सवाई माधवराव पेशवे यांच्या लग्नात मेहेलकाच्या नृत्य गायनाचा कार्यक्रम होतो मेहेलकाच्या गाण्याने पेशवे दरबाराचा.नक्शाच उतरतो,पण तिच्या नृत्यासमयी तुटलेल्या मोत्यांच्या हारातील मोती गोळा करणार्यांना ती म्हणते ,"आमच्या दरबारी नेहमी असे मोती तुटतात पण ते आम्ही वेचीत नाही .सकाळी महाल साफ करायला जे सेवक येतात त्यांना ते मिळतात"त्या उद्गगारांनी मेहेलकाने पेशवे दरबाराचे ऊरलेसुरले ऐश्वर्य लुटले होते. दरबारी नाचगाणे झाल्यानंतर मेहेलकाला बिदागी केवढी द्यायची ?नाना फडणिसांना प्रश्न पडतो .मेहेलकाचा अंदाज घेण्यासाठी ते आपल्या वाड्यावर येण्याचे सन्मानाचे आमंत्रण पाठवतात.दुसर्या दिवशी नाना आपल्या सदरेत ऊभे असताना चौकात एक सौदागर उभा होता.
श्रीमंताच्या विवाह प्रसंगी आपली घोडी पेशवे दरबारी खपतील अशा आशेने सौदागर उत्कृष्ट जातीची,एका रंगाची ,उमदी ,सहा अबलक घोडी घेऊन आला होता. अश्वपरीक्षेतही घोडी उजवी ठरली होती.प्रश्न होता तो किंमतीचा. प्रत्येक घोड्याची किंमत प्रत्येकी दोन हजार होती. नाना फडणीस दीड हजार ला एक घोडा घेण्याची तयारी दर्शवतात. सौदागर निराश होऊन निघून जातो. त्यावेळी मेहेलका त्या सौदागरास थांबवून त्याच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे सहाही घोडे खरेदी करते. नाना फडणीस आश्चर्याने विचारतात एवढे महागडे घोडे कशाकरिता खरेदी केले, तेव्हा महेलिका म्हणते "माझे यजमान रावरंभा निंबाळकर यांना घोड्याचा खुप शौक आहे त्यांच्याकरिता मी हे घोडे खरेदी केले.. या ऊत्तराने पेशवे निरूत्तर होतात.मेहेलकाच्या सन्मानार्थ पेशव्यांनी खास दरबार भरवला "माहेलकाबाई,- तुम्ही श्रीमंताच्या मैफिलीत नृत्य- गायन सादर केलेत.श्रीमंत आपल्या नैपुण्यावर प्रसन्न आहेत.तुमच्या कलेची कदर करावी म्हणून एक लक्ष रूपये बिदागी अन मानाचे वस्र श्रीमंतांनी देऊ केले आहे. त्याचा स्वीकार करावा." त्यावर मेहेलका पेशव्यांना म्हणतात " मला संपत्तीचा लोभ नाही हुजूर! त्याची मला कधीच कमतरता पडली नाही. माझ्या अन्नदात्यांच्या कृपेने ,माझ्या घरी संपत्ती पाणी भरते.त्यामुळे आपल्या लक्ष रूपयांचे मला मोल नाही. आणि ज्याचे कौतुक वाटत नाही ते आपल्या दरबारी स्वीकारून, आपण दर्शविलेल्या कृपेचा अपमान करावा असे वाटत नाही. स्वीकारण जिवावर येत." सारा दरबारा स्तब्ध होतो.मेहलका पेशव्यांना म्हणते आमच्याकडे भागानगरला असे सुरेख गोविंदविडे बांधले जात नाहीत. दासीला द्यायच झालच तर तो गोविंद विडा द्यावा .बस्स ! माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. विडा मिळाला तर सार मिळाल्याचे समाधान मला लाभेल." दरबार संपल्यानंतर पेशवे मेहेलका समोर तबकातील पानाचा विडा धरतात. तो विडा स्वीकारण्यापूर्वी मेहेलका पेशव्यांना म्हणते हा विडा आपण देत आहात पण याचा अर्थ आपणास माहीत आहे का? नानासाहेब पेशवे विचारतात "कसला अर्थ " त्यावर मेहेलका म्हणते विडा हे प्रेमाचे प्रतीक आहे.मी रावरंभाची व निजामाची राज नर्तिका ....म्हणजेच त्यांच्या दरबाराची प्रतिनिधी. या दोघांबद्दल आपल्या मनात जिव्हाळा, व प्रेम राहणार असेल तरच त्या विड्याला अर्थ आहे. आपल्या मनात परस्परांबद्दल वैरभाव असेल तर विडा मागे घ्यावा त्यावर पेशवे म्हणतात ज्या दरबारी धन्याचे भले चिंतणारे तुमच्यासारखे थोर कलावंत असतात त्यांना धक्का कोण लावील? जोवर तुमच्या दरबाराकडून आमची आगळीक होत नाही ,तोवर आम्ही आपणहून चाल करणार नाही. सर्वांशी स्नेह टिकवण्यासाठी पेशव्यांनी मेहेलकाला विडा दिला..अशीही निष्ठेने प्रेम करणारी , राजकारणातील डावपेच तितक्याच कौशल्याने खेळणारी, धन्याची स्वामित्व प्राण पणाला लावून जपणारी,ही मेहेलका व रावरंभा निंबाळकर यांच्या अनोख्या प्रेमाची ही कहाणी .मेहेलकाने आपल्या धन्यासाठी केलेला अपूर्व त्याग व राजकारण्यालाही लाजवेल अशी मुत्सद्देगिरी होती.

 

पोस्त सांभार :::डॉ सुवर्णा नाईक निबालकर 


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...