विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

शाहिस्तेखानाला शिक्षा

 

🚩 5 एप्रिल 1663 शाहिस्तेखानाला शिक्षा 🚩

POSTSAAMBHAR ::
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे


5 एप्रिल 16 63 रोजी महाराजांनी अगदी गुप्तपणे लाल महालावर स्वारी करण्याची तयारी सुरू केली. सर्वांची तहान-भूक झोप उडाली. पुण्यात लाल महालावर छापा,तोही शाहिस्तेखानावर, शाहिस्तेखानावर छापा कसा घालायचा याची कुंडली तयार झाली. दिवस मावळला तशी महाराजांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे निघायची तयारी सुरू झाली. आई साहेबांचा आशीर्वाद, आणि जगदंबेचे दर्शन घेऊन महाराज निघाले .महाराज प्रत्येक संकटाच्या प्रसंगी भयंकर अवघड मनसुब्यात उडी घेत असत. जिजाऊ मासाहेबांना प्रत्येक वेळी खूप काळजी वाटायची .खाणाच्या छावणीतील खबर आधीच गुप्तहेरांक डून महाराजांनी आणली होती. रात्रीची वेळ होती. लोक गाढ झोपेत होते .हेच नेमके लक्षात घेऊन महाराजांनी छाप्यासाठी रोज्यांच्या महिन्यातील एक दिवस निवडला. शिवाय शहरात चौक्या-पहारे कसे व कुठे कुठे आहेत, लाल महालाच्या अवतीभोवती काय स्थिती आहे,एकून राबता कसा कसा चालत आहे, इत्यादी माहिती त्यांनी आधीच मिळवून घेतली होती.
एकूण कामगिरी सर्वच अवघड होती. जिवावरची होती. लाख फौजेच्या गराड्यात शिरून, चिरेबंदी वाड्यात शिरून, खानाला मारून, स्वतः जिवंत परतायचे होते. नाही सांगता येत,किती दुष्कर कर्म होते ते!
आपण कल्पनाही करू शकत नाही.
खुद्द लाल महालात एका मोठ्या दालनात अनेक पडदे वापरून एकात एक अशा अनेक खोल्या बनवल्या होत्या. जनान्याची राहण्याची व्यवस्था त्यात होती.खानही त्यावेळी तिथेच होता. याशिवाय खोल्या ,ओसर्या, दालने, कचेऱ्यांची जागा ,आबदारखाना वगैरे अनेक सदरासोप्यांनी व व्यवस्थांनी लाल महाल सजला होता. वाड्यात देवडी वर व आतही जागोजाग पहारे होते. खान झोपलेला होता. जनाना, जनान्यातील दासी व नोकरचाकर झोपलेले होते.
मुदपाकखान्यात आचारी व नोकरदार सर्वच झोपेत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची जागा हीच होती.अभ्यास ,स्मरण,तर्क,निरीक्षण आणि काळकामवेगाचा प्रमाणबध्द विवेक करून अगदी अगदी काटेकोर योजना करावी ती फक्त महाराजांनीच
. उत्कृष्ट पूर्वयोजना म्हणजे निम्मे यश .योजना न करता मिळालेले यश म्हणजे केवळ दैवी योगायोग असतो. ते पूर्ण यश नसतेच कधी.
महाराजांचे लोक लालमहालात घुसले .मधुन मधुन आरोळ्या किंकाळ्या उठू लागल्या.खानाच्या हुशार बायकांनी अंधारात खानाला बाजूला नेले.दिवे विझल्याबरोबर अंधारातच मराठ्यांच्या तलवारी फिरू लागल्या.परमेश्वराची ईच्छा.महाराज खानाला शोधत होते.त्यांना फक्त खान हवा होता.
खानाच्या बायकांनी खानाला जनान्यातील एका पडदानशीन दालनात लपून ठेवले होते.तेथे आणखी काही स्त्रिया होत्या. एवढ्यात पडदा फाटला! टर - टर-टर आवाज करत महाराजांची तलवार पडद्यात घुसवली. बायकांनी किंकाळी फोडली. तेवढ्यात खान आपली तलवार घेण्यासाठी उठला. पण महाराजांची नजर गेलीच. ते खानावर धावले .अंधार होता. महाराजांनी खानावर अंदाजाने खाडडकन् घाव घातला.तेव्हा आरडाओरडा भयंकर उडाला. महाराजांना वाटले खान मेला. परंतु खान मेला नाही. त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली. या वेळेपर्यंत वाड्याबाहेर खूप मोठे लष्कर गोळा झाले. गनिम आला, या बातमीने छावणीतील लोक खडबडून जागे झाले होते. लोक ओरडत होते,'गनीम आया ! दगा !' आणि मराठ्यांनी तसेच ओरडायला आरंभ केला. मराठेही त्यात सामील झाले .सर्वच मोगली गोंधळ! महाराजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला . मराठे पसार झाले. शाहिस्तेखान खरोखर अत्यंत बंदिस्त वाड्यात होता. लाखाच्यावर फौज त्याच्याभोवती पसरलेली होती. अशा परिस्थितीत खानाच्या देहावरच घाव घालण्यासाठी उडी घेणे म्हणजे अक्षरशः कालियाडोहातच उडी घेण्यासारखे होते .
लाल महालातील रडारड आणि गोंधळ अजून चालूच होता . खानाचे सैनिक छावणीत धावपळ करीत गनिमांना शोधत होते. शाहिस्तेखानाच्या तुटक्या बोटातून रक्त ठिपकत होते. परंतु महाराजांनी आपल्या गनिमी तंत्राने तलवारीच्या पात्याने अंधारातच आंधळी कोशिंबीर खेळून लाल महाल रक्ताने लाले लाल केला होता .खानाची एकंदर पंचावन्न माणसे ठार झाली. त्यात खानाचा मुलगा अबुल फत्तेखानही ठार झाला होता.खानाचे दोन पुत्र जखमी झाले होते तर,एक बेगम फार भयंकर रीतीने ठार झाली होती. अंधारात तिच्या शरिराचे इतके तुकडे तुकडे झाले की, शेवटी टोपल्यात भरूनच ते छिन्नविच्छिन्न प्रेत दफनासाठी न्यावे लागले. महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे साप तोडली होती. खानाची अब्रू गेली शिवाय तीन बोटेही गेली होती.शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांची ईतकी दहशत निर्माण झाली की तो ताबडतोब औरंगाबादला निघून गेला.
धन्यते आमचे छत्रपती शिवराय ,आम्हाला कायमच अभिमान आहे आपला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...