विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 24 August 2020

.प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती

 

प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती
प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते. यांचे खरे नाव 'कुडतोजी गुजर' असे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती. २४ फेब्रुवारी १६७४ शिवरात्रीचा दिवस होता. जिवंत सोडून दिलेल्या अब्दुल करीम बहलोलखानाच्या मागावर जाऊन गुपचूपपणे प्रतापराव आणि इतर सहा सरदारांनी हल्ला चढवला आणि त्यात ते वीर मारले गेले. प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी ता.गडहिंग्लज येथे आहे.
"वेडात मराठे वीर दौडले सात" या ओळी रचून त्या ७ वीरांना वि. वा. शिरवाडकरांनी अजरामर करून ठेवले आहे.
मिर्झाराजे दख्खनवर चालून आल्यावर त्याने रयतेचे अतोनात हाल केले आणि पुरंदरवर दिलेरखानाला पाठवले. यामुळे महाराजांना मिर्झाराजेला शरण यावे लागले. याच दरम्यान मिर्झाराजे छावणी मधे असताना स्वराज्याचे सेनापती कुडतोजी गुजर यांनी मिर्झाराजेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यांचे महाराजांप्रती निस्सीम प्रेम पाहून मिर्झाराजेने त्यांना सोडून दिले. या प्रसंगामुळे महाराजांनी त्यांना असामान्य असा प्रताप गाजवला म्हणून प्रतापराव ही पदवी दिली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...