विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 24 August 2020

बाजीराव मस्तानीचा पराक्रमी पुत्र समशेर बहाद्दर

 

बाजीराव मस्तानीचा पराक्रमी पुत्र


समशेर
बहाद्दर

By कौस्तुभ शुक्ल 

आई वडिलांच्या पश्चात समशेर बहाद्दरला कुणी सांभाळले ? पेशव्यांनी त्याला बाजीरावांचा मुलगा म्हणून राज्यात स्थान दिले कि नाही ?

पेशवा बाजीराव यांच्याबद्दल माहित नसेल असा माणूस सहसा सापडणार नाही. कदाचित बाजीरावांनी काय पराक्रम केला या पेक्षा माणसांच्या तोंडावर बाजीराव मस्तानी हेच नाव जास्त फिरत असावे. याचबद्दल आपण काही जाणून घेऊया. मस्तानी हि बाजीरावांची दुसरी पत्नी, पहिली पत्नी काशीबाई यांच्यापासून बाजीरावांना बाळाजी बाजीराव, रघुनाथराव जनार्दनराव अशी अपत्ये झाली. मस्तानी आणि बाजीराव यांना मात्र एकच अपत्य होते. त्याचे नाव होते समशेरबहाद्दर, त्यांना कृष्ण राव असे सुद्धा म्हंटले जाते. त्यांनीही मराठ्यांच्या इतिहासात आपले अमूल्य योगदान दिले आहे. आज आपण समशेरबहाद्दर यांच्याबद्दल जाणून घेऊया.

ओळख

राजपूत राजा छत्रसाल आणि त्याची बायको रुहानी बाई बेगम यांची मुलगी होती मस्तानी, बाजीरावांनी छत्रसालला शत्रूपासून सुरक्षित ठेवल्यामुळे खुश होऊन छत्रसालने मस्तानीचा विवाह बाजीरावांशी केला. बाजीराव, मस्तानी सोबत पुण्यात आले मात्र मस्तानी मुस्लिम म्हणून त्या दोघांच्या नात्याला स्वीकारले गेले नाही. मस्तानीसाठी वेगळा महाल बांधून तिच्या राहण्याची व्यवस्था बाजीरावांनी केली.

मस्तानी बाजीराव यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव ठेवले कृष्णराव. बाळाचा जन्म झाला खरा परंतु बाजीरावांची पत्नी बाळाची आई हि मुस्लिम असल्याने या बाळावर कोणत्याही प्रकारचे हिंदू संस्कार करण्यास समाजाने पंडितांनी नकार दिला. याच कारणामुळे बाळावर मुस्लिम संस्कार करण्यात आले आणि बाळाचे नाव ठेवलेसमशेरबहाद्दर !

 १७४० मध्ये बाजीराव मस्तानी दोघांच्या मृत्यूनंतर, वर्षाच्या छोट्याश्या समशेरला बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांनी आपल्या छायेत आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढविले. समाजाने पेशवा घराण्याने मस्तानीचा स्वीकार केला नसला तरी समशेरचा मात्र फार लवकर त्यांनी स्वीकार केला, आपल्या इतर भावांसोबत (सावत्र) समशेर शिक्षण घेत होता, शास्त्र शस्त्र यांचे ज्ञान सुद्धा त्याने घेतले. बाजीरावांच्या म्हणजेच त्याच्या वडिलांच्या राजवटीतील बांदा आणि काल्पी हा प्रदेश समशेरच्या वाट्याला देण्यात आला.

 

कारकीर्द

आपल्या वाट्याला आलेला प्रदेश घेऊन समशेर समाधानी होता. त्याने आपल्या प्रदेशावर उत्तम सत्ता स्थापन केली. त्याने वेळोवेळी मराठ्यांना सहकार्य केले. मराठ्यांचे जे उत्तरेत राजकारण सुरु होते त्याच राजकारणामध्ये समशेर सुद्धा महत्त्वाचे सहकार्य करत होता. १७५८ तो पंजाबच्या दुराणी घराण्याशी रघुनाथ राव, दत्ताजी सिंधिया, मल्हारराव होळकर यांच्या बाजूने लढत होता. अखेर त्याने अटक, पेशावर आणि मुलतान जिंकून घेतले.

समशेर नंतर गादीवर आला कृष्णसिंग म्हणजेच अली बहादूर. अलीने आपले वर्चस्व अजून पक्के केले. त्याने बुंदेलखंड मधील बराच प्रदेश ताब्यात घेतला आणि तो बांदाचा नवाब म्हणून ओळखला जाऊ लागला. समशेरबहादूरच्या पुढील सर्वच वंशजांनी मराठ्यांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले. याच घराण्यातील दुसरा अली बहादूर हा राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने १८५७ च्या युद्धात लढत होता

 

पानिपतच्या युद्धातील पराक्रम

समशेरबहादूरने मराठ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मदत केली ती म्हणजे पानिपतच्या युद्धात. मराठ्यांना खूप मोठ्या शत्रूशी लढाई करायची होती. हे आव्हान फार कठीण होते, शक्य तेवढी मदत मराठे गोळा करीत होते. याच वेळी समशेरबहाद्दरने आपले सर्व सैन्य घेऊन मराठ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पूर्ण सुद्धा केले. समशेरबहाद्दर पानिपतच्या युद्धात प्राणपणाने लढला. या युद्धात तो बराच जखमी झाला. अखेर १८ जानेवारी १७६१ मध्ये केवळ वयाच्या २६ ते २७ व्या वर्षी समशेरचा भरतपूर येथे मृत्यू झाला.

 

उदाहरण

बाजीरावहिंदू ब्राह्मण आणि मस्तानी मुस्लिम. याच कारणामुळे ना समाजाने आणि ना ब्राह्मणांनी त्यांना स्वीकारले. त्यांच्या मुलाला मात्र तशी वागणूक मिळालेली फारशी सापडत नाही. वर म्हटल्याप्रमाणे काशीबाईंनी आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे समशेरला जपले, वाढविले आणि शस्त-शास्त्र शिक्षण सुद्धा देऊ केले. कळत्या वयापासून ते मरेपर्यंत समशेर हा मराठ्यांशी एकनिष्ठ राहिला. त्याच्या आईला आणि सुरुवातीला त्याला बरीच वाईट वागणूक मिळाली परंतु ते मनात ठेवता समशेर ने मराठ्यांसाठी पानिपतच्या लढाईत आपले प्राण सुद्धा दिले.

एक वेळ होती कि समशेरला ब्राह्मण म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्याचे वडील प्रयत्न करत होते परंतु, समाजाने समशेरला स्वीकारण्यास नकार दिला. परंतु हाच समशेर ज्याच्यावर मुस्लिम संस्कार झाले, तो याच मराठ्यांशी मात्र शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. इतिहासाने या उदाहरणातून हे पुन्हा दाखवून दिले कि जात, धर्म आपली निष्ठा ठरवत नाही, तुमचा पराक्रम तुमच्या जातीवर अवलंबून नसतो. समाजाने नेहमीच जात-धर्माच्या आधारे इतरांना पाहिले. परंतु अशा काही उदाहरणांनी आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडले. जात-धर्म यांच्याही वर असते माणसाचे कर्तृत्व, त्याची निष्ठा आणि या परीक्षेत समशेरबहाद्दूर खऱ्या अर्थाने बाजीरावांचा पुत्र शोभला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...