विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 August 2020

औरंगजेब एक अजब रसायन भाग १

औरंगजेब एक अजब रसायन भाग १
postsaambhar ::Amar Salunkhe Bhau Maratha
बाप मारतोय म्हटलं की आनंदित होणारी इस्लामची संस्कृती होती. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तानचा बादशहा शहाजहान आजारी पडला आणि त्याला भेटण्यासाठी म्हणून त्याची मुल सशस्त्र सैन्य घेऊन बापाला भेटायला निघाली. शहाजहानने पत्र पाठवून त्यांना कळवल कि मी अगदी ठणठणीत आहे मला काहीही झालेल नाही. पण पोरांच्या हातात आयत कोलीत सापडल होत ती कसली ऐकणार होती. त्या पोरांमध्येही आपापसात अविश्वास होता आणि कित्येक वर्षे त्यांनी एकमेकांना पाहिलेले नव्हत.
ही मोगल सल्तनतिच्या वारस युद्धाची नांदीच होती. शहाजहानच्या या पोरांच्या वारसा युद्धाबद्दल आपण पुन्हा कधीतरी पाहू आज आपण चर्चा करणार आहोत ती शहेनशहा म्हणून गादीवर आलेल्या एका अपरिचित शहजाद्याची.
वारस युद्धात औरंगजेबाची फत्ते झाली आणि औरंगजेबाने आपला मोठा भाऊ दारा शिकोह यांची निर्दयी आणि आणि क्रुर अशी हत्या घडवून आणली.दारा शिकोह बरोबरच त्याने आपल्या आप्त नातेवाईकांपैकी ३० ते ४० लहान मोठ्या आप्तजणांची हत्या घडवून आणली. दारा शिकोह हे एक वेगळे समीकरण होत. दारा शिकोह जर राजगादीवर आला असता तर आज हिंदुस्थानच राजकारण काही वेगळंच असत. परंतु कदाचित नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होत.
औरंगजेब एक कडवा मुसलमान तर होताच परंतु तो एक कट्टर इस्लामला मानणारा व स्वतःच्या राज्यावर इस्लाम लादणारा एक सनकी परंतु तितकाच धोरणी राज्यकर्ता होता. राज्य सत्ता हातात आल्यावर त्याने इस्लामला मान्य नसणाऱ्या काही गोष्टीवर निर्बंध लादले. चित्रकला, संगीत, शायरी हे त्यापैकी एक होत. वस्तुस्थिती अशी होती की मुसलमानांमध्ये कित्येक पट्टीचे शायर होते, संगीतकार होते संगीत प्रेमी होते. अचानक औरंगजेबाने या सगळ्या गोष्टी बंद केल्यामुळे जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला.
कोण हा औरंगजेब? एक तर ह्याने रयतेच्या लाडक्या दारा शिकोह चा अतिशय कूर असा वध केला होता, शिवाय गेल्या तीस ते पस्तीस वर्षात वर्षात रयतेला हा औरंगजेब कोण आहे हे माहीतच नाही. त्याची कारकीर्द इतकी वर्षे दक्षिणेत गेलेली होती त्यामुळे हा नक्की कोण आहे अशा एका प्रश्नाने संपूर्ण राज्याला ग्रासलं होत.
अचानक एखादा धूमकेतू उमटावा तसा हा औरंगजेब मोगलांच्या राजकीय राज पटलावर उमटला होता त्यामुळे सगळ्यांसाठी हा औरंगजेब म्हणजे एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह होत. सहाजिकच मोगल साम्राज्यात औरंगजेबा बद्दलअसंतोष निर्माण झाला. या असंतोषाचा फलित म्हणून मोगल साम्राज्यात जे संगीतप्रेमी होते त्यांनी औरंगजेबाचा निषेध म्हणून संगीताच प्रेत काढलं आणि प्रेताच्या आजूबाजूला मोठ्याने आक्रोश करायला सुरुवात केली. अर्थातच हा आक्रोश औरंगजेबाच्या कानावर पडला. ही नक्की काय भानगड आहे म्हणून औरंगजेबाने त्यातील काही प्रतिनिधींना बोलावून घेतले.
जेव्हा औरंगजेबाने त्या प्रतिनिधींना विचारले की हा सर्व काय प्रकार आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की ही संगीताची अंत्ययात्रा आहे. का तर तुम्ही संगीता विरुद्ध फतवा काढलाय. त्यावर औरंगजेबाने अशी प्रतिक्रिया नोंदवली की "खयाला रखीयेगा की ये संगीत जो है वह अच्छी तरह से दफन हो जाये क्यूकि अगर ये संगीत ठीक से दफन नही हुलागु और इसने फिरसे अपना सर उठाया तो मै आप सब के सर कलम कर दूंगा.
औरंगजेब म्हणाला तुम्ही खूप चांगलं काम केलय, आता एक काम करा, खोल खड्डा खाना आणि त्या खड्ड्यात या संगीताचा जनाजा खोलवर दफन करा. संगीताचं प्रेत जर व्यवस्थित दफन झालं नाही आणि यदाकदाचित जर मला राज्यात कोठे संगीत ऐकू आलं किंवा जिवंत आहे असं आढळलं तर मी तुम्हा सर्वांची डोकी कलम करेन. त्यांच्या लक्षात आले की खरोखरच हे काहीतरी वेगळेच रसायन आहे .
जे कोणी औरंगजेबासमोर आले होते ते अक्षरशः तोंडात मारल्यासारखे निशब्द होऊन परतले. औरंगजेबासाठी किंवा त्याच्या विरोधात या जनसमुदायाकडे बोलण्यासारखं किंवा निषेध नोंदवण्यासारखं काहीही उरल नव्हत. कारण या सगळ्या गोष्टींगोष्टींची जर पाठराखण करावी तर हा माणूस इस्लामचा आश्रय घेऊन आपले मुडदे गाडल्याशिवाय राहणार नाही.
तर असा हा औरंग आणि त्याच्या अंगी असलेल्या रंगा पैकी हा एक हा एक रंग .
सांगण्याचा उद्देश एवढाच ही धर्म मग तो कोणताही असो हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई किंवा बौद्ध यांच्यापैकी कोणत्याही धर्माच्या विरोधात आपण जर बोलला मग ते योग्य असो किंवा अयोग्य तुम्हाला त्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकत नाही आणि याच गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलणारा औरंगजेब हा हिंदुस्तानच्या पटलावर राज्य करणाऱ्या राजकारराजकारण्या पैकी एक धूर्त व धोरणी राज्यकर्ता होता यात शंका नाही.
औरंगजेबाला त्याच्या धर्माबद्दल किती आस्था होती हा भाग वेगळा परंतु त्याने एक राज्यकर्ता म्हणून आपल्या धर्माचा राज्यासाठी किंवा राज्य विस्तारासाठी पुरेपूर फायदा करून घेतला हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
असं नाही कि त्याने फक्त हिंदुविरोधी कारवाया केल्या त्याने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या इस्लाम धर्मातही खाचा लक्षात घेऊन स्वतःच्या सोईप्रमाणे त्याचा उपयोग करून घेतला.
_ अमर श्रीरंग साळुंखे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...