POSTSAAMBHAR ::डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
छत्रपतीं संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा मलिन ,कल्पित आणि विपर्यस्त
बनवण्याची पहिली सुरूवात कोणी केली असेल ,तर ती मल्हार रामराव चिटणीस
यांच्या बखरीने.छत्रपती संभाजीं राजांच्या दुर्दैवी शेवटानंतर तब्बल १२२
वर्षांनी म्हणजे उत्तरपेशवाईत इ.स. १८११ मध्ये ती बखर रचली गेली .आपले
पूर्वज बाळाजी आवजी आणि त्यांचा पुत्र आवजी बाळाजी यांना हत्तीच्या पायदळी
तुडवून मारल्याबद्दलचा राग मल्हाररावांच्या मनात होता. हे बखर लेखन
म्हणजे सुडाचाच एक भाग होता. ही बखर भाषेच्या दृष्टीने मोठी रसाळ आणि
चित्ताकर्षक लिहीली गेली होती.
. त्याही पूर्वी
जिंजीच्या मुक्कामात राजाराम महाराजांच्या आश्रयाखाली असलेल्या कृष्णाजी
अनंत सभासदाने आपल्या शिवप्रभू चरित्रात छत्रपती संंभाजी राजांच्या
बदनामीचा पाया रचला होता. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल, आदिलशाही
दरबाराच्या हेरांनी आपापल्या मालकाची मर्जी राखण्याकरिता जे अहवाल पाठविले
होते, त्यातही तिचे पडसाद उमटले आहेत. समकालीन व नंतरच्याही
कागदपत्रांमध्ये अशा रीतीने छत्रपतीं संभाजीं राजांची बदनामी करणारी
वर्णने आली आहेत.
छत्रपती संभाजीराजांनी आपणहून गृहकलह
सुरू करण्याचे काहीच कारण नव्हते .कारण ते शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ
पुत्र होते. रूढीनुसार व राजनीतिशास्त्रा नुसार राज्याचे ते वारसदार होते.
आणि ज्या रीतीने शिवाजी महाराजांनी त्यांना दक्षिणेच्या राजकारणात वागवले
होते, त्यावरून महाराज त्यांनाच पुढे आपला वारसदार म्हणून ठरवणार होते.
अशा परिस्थितीत गृहकलहाची सुरुवात घरातूनच झालेली असणार.राज्याभिषेक
प्रसंगी आपणास पट्टराणी पदाचा मान मिळाला तरी, आपल्या
मुलास
राज्याचा वारसा मिळणार नाही याचे दुःख सोयराबाई राणीसाहेब यांना झाले
असले पाहिजे .त्यामुळे त्यांना कटकारस्थान करण्यास भाग पाडून त्यांना या
कटकारस्थानांत मदत करणारे सरकारकून मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो
सुरनीस, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी इ छत्रपती . शिवरायांच्या विश्वासू
सहकाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सोयराबाई राणीसाहेबांना मदत केली.
त्यांनी स्वराज्यात पिकविलेल्या कंड्या व त्यांचा आधार घेऊन परकीय हेरांनी
आपल्या राजकर्त्यांकडे पाठविलेले अहवाल तसेच त्यावर आधारलेल्या बखरी ह्याच
छत्रपती संभाजी राजांच्या बदनामीस करणीभूत ठरल्यात. राम गणेश गडकरी यांनी
आपल्या नाटकाला उठाव आणण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची जास्तीत
जास्त बदनामी आपल्या नाटकातून केली.
छत्रपती शिवरायांचा
पुत्र असलेल्या आणि महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती बनलेल्या शंभूराजांच्या
अन्नामध्ये काही सरकारकुनांनी अक्षरशहा: विष कालवून त्यांना जिवे मारायचा
अनेकदा प्रयत्न केला. या राजद्रोहावर आणि गद्दारीवर छत्रपती शंभूराजांनी
पुन: पुन्हा: दया दाखवूनही त्याच मंडळीकडून तसाच राजद्रोह घडला. आपल्या
राजाला त्यांनी पुन: पुन्हा: जीवे मारण्याची कटकारस्थाने केली. म्हणूनच
शेवटी छत्रपती शंभूराजांना त्या संबंधित सरकारकुनांना योग्य ती सजा
देण्याचे राजकर्तव्य पार पाडावे लागले.ह्या सजा मिळालेल्या मंडळींच्या
वंशजांनी छत्रपती संभाजीराजांच्या पश्चात त्यांच्या चरित्रावर उठवलेली
राळ म्हणजेच महाराष्ट्राच्या माती मारलेले खोटे शंभू चरित्र होय.
छत्रपती संभाजी राजे यांची जाणीवपूर्वक केलेली बदनामी या
सर्व ऐतिहासिक कागदपत्रांची छानणी करून आयुष्याची चाळीस वर्षे खपून इतिहास
संशोधक वा.सी.बेन्द्रे यांनी शोधग्रंथ तयार केला. 'छत्रपती संभाजी
महाराज' या शीर्षकाखाली १९६० मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला.
त्यानंतर.डाॅ. कमल गोखले यांनी याच विषयावर पी.एच.डी. करिता संशोधन
केले.वा.सी.बेंद्रे आणि डाॅ. कमल गोखले यांच्या चरित्र ग्रंथांनी
महाराष्ट्राला 'नव्या छत्रपती संभाजी महाराजांचे ' दर्शन घडवले. त्यांचा
'शिवपुत्र संभाजी' या शीर्षकाचा त्यावर आधारित ग्रंथ १९७१ साली प्रसिद्ध
झाला. हे दोन ग्रंथ प्रकाशित झाल्यावर छत्रपती संभाजी चरित्राकडे
पाहण्याची अभ्यासकांची दृष्टी बदलली. अनेक इतिहास संशोधक व कथा कादंबरीकार
एक महानायक म्हणून छत्रपती संभाजी राजांकडे पाहायला लागलेत. शिवाजी
सावंतांची 'छावा' सारखी कादंबरी याच प्रेरणेतून जन्माला आली. डॉ.
जयसिंगराव पवार यांनी 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' १९९० मध्ये संपादित
केला. या ग्रंथातील विविध अभ्यासकांच्या लेखांनी छत्रपती संभाजी
राजांविषयीचे अपसमज दूर होण्यात खूप मोठी कामगिरी बजावली आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किर्तीस
शोभेल असेच शूर वीर होते. पारंपारिक शस्त्रविद्या ,राज्यव्यवहार व
युद्धकला या क्षेत्राबरोबर तत्कालीन राजनीतीच्या क्षेत्रातही आपला पुत्र
तरबेज व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजीराजास
दक्षिणेतील राजकारणातील प्रत्यक्ष धडे दिले होते.
छत्रपती
संभाजीराजां विषयी अनेक गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरलेली चिटणिसी बखर
लिहिणारे मल्हार रामराव चिटणीस हे बाळाजी आवजीचे खापरपणतू होते.छत्रपती
संभाजींराजांवर विषप्रयोग करण्याच्या कटात बाळाजी आवजी सामील होते.
त्यामुळे छत्रपती संभाजींराजांनी त्यांना हत्तीच्या पायदळी तुडविले.
आपल्या खापर पणजोबाच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या भावनेतून चिटणीसाने
छत्रपती संभाजी महाराजांना चरित्रहीन व स्वैरवर्तनी ठरवले.
मराठी साहित्यिकांनी चितारलेली छत्रपतीं संभाजी महाराजांची प्रतिमा
नि:संशय पूर्वग्रहदूषीत आणि सूड भावनेने लिहीलेली आहे.
आमच्या या शूर, धाडसी, पराक्रमी राजास आमचा मानाचा मुजरा
संदर्भ
1 "छत्रपती संभाजी"
डाॅ. जयसिंगराव पवार
2 संभाजी
श्री विश्वास पाटील
3 संभाजी
डाॅ. कमल गोखले
4 शिवपुत्र संभाजी
वा.सी.बेंद्रे
No comments:
Post a Comment