विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले
हिंदुस्थांनातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. शिस्तबद्ध आणि पराक्रमी लष्कर व प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि रयतेचे स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवरायांबद्दल थोडक्यात माहिती......
पूर्ण नाव:- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
वडील:- शहाजीराजे मालोजीराजे भोसले.
आई:- जिजाबाई शहाजीराजे भोसले.
जन्म:- फेब्रुवारी १९, १६३०.
जन्मस्थान:- शिवनेरी.
राजधानी:- किल्ले रायगड.
राज्याभिषेक:- जून ६, १६७४.
मृत्यू:- एप्रिल ३, १६८०.
समाधीस्थळ:- किल्ले रायगड.
राजमुद्रा:- प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।
चलन:- होन, शिवराई.
उत्तराधिकारी:- छत्रपती संभाजीराजे भोसले.
पत्नी:-
1. सईबाई (निंबाळकर)
2. सोयराबाई (मोहिते)
3. पुतळाबाई (पालकर)
4. लक्ष्मीबाई (विचारे)
5. काशीबाई (जाधव)
6. सगुणाबाई (शिंदे)
7. गुणवंतीबाई (इंगळे)
8. सकवारबाई (गायकवाड)
शिवपुत्र व सुना :-
1. छत्रपती संभाजी भोसले (महाराणी सईबाईंचे पुत्र)
• येसूबाई (शिर्के)
2. छत्रपती राजारामराजे भोसले (महाराणी सोयराबाईंचे पुत्र)
• जानकीबाई (गुजर)
• ताराबाई (मोहिते)
• राजसबाई (घाटगे)
• अंबिकाबाई
• सगुणाबाई
शिवकन्या व जावई:-
• राणी सईबाईंच्या कन्या (जन्मदाती आई)
1. सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर ( फलटण-सातारा)
2. राणूबाई - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा)
3. अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा)
• राणी सोयराबाईंच्या कन्या (जन्मदाती आई)
4. दीपाबाई किंवा बाळाबाई - विसाजी उर्फ विश्वासराव
• राणी सकवारबाईंच्या कन्या (जन्मदाती आई)
5. कमळाबाई - जानोजी पालकर ( नेताजी पालकर पुत्र, मूळ गाव शिरूर-पुणे)
• राणी सगुणाबाईंच्या कन्या (जन्मदाती आई)
6. राजकुवर उर्फ नानीबाई - गणोजी शिर्के ( मळे, दाभोळ)
नातवंडे:-
1. भवानीबाई (छत्रपती संभाजीराजे व येसूबाई यांची कन्या)
2. शाहूराजे (छत्रपती संभाजीराजे व येसूबाई यांचे पुत्र)
3. शिवाजीराजे दुसरे (छत्रपती राजरामराजे व ताराबाई यांचे पुत्र)
4. संभाजीराजे दुसरे (छत्रपती राजरामराजे व राजसबाई यांचे पुत्र)

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...