विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले

 

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजीराजांनी सर्वस्व पणाला लावले. शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्ष मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, अंतर्गत शत्रूविरूद्ध लढत राहिले. अश्या आपल्या सामर्थ्यशाली, पराक्रमी, शौर्यवान, निर्भीड स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींची थोडक्यात माहिती...
पूर्ण नाव:- संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
वडील:- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
आई:- सईबाई शिवाजीराजे भोसले.
दूध आई:- धाराऊ पाटील. (गाव:- कापूरहोळ, जिल्हा:- पुणे)
जन्म:- १४ मे, इ.स. १६५७
जन्मस्थान:- पुरंदर किल्ला, जिल्हा:- पुणे, महाराष्ट्र.
बंधु:- राजारामराजे शिवाजीराजे भोसले. (महाराणी सोयराबाईंचे पुत्र)
बहीण:-
१. सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर (फलटण-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
२. राणूबाई - - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
३. अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
४. दीपाबाई - - विसाजी उर्फ विश्वासराव (जन्मदाती आई:- सोयराबाई)
५. कमळाबाई - जानोजी पालकर पुत्र, (शिरूर-पुणे) (जन्मदाती आई:- सकवारबाई)
६. राजकुवर - -गणोजी शिर्के (दाभोळ) (जन्मदाती आई:- सगुणाबाई)
पत्नी:- येसूबाई (शिर्के)
शंभूपुत्र व सुना:- शाहूराजे संभाजीराजे भोसले.
अंबिकाबाई, सावित्रीबाई.
शंभूकन्या व जावई:- भवानीबाई – शंकराजीराजे महाडीक (हरजीराजे महाडीक यांचे पुत्र)
राज्याभिषेक:- जानेवारी १६, इ.स. १६८१.
राजधानी:- किल्ले रायगड
मुद्रा व दानपत्र:-
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
अर्थ:- शिवाजी पुत्र संभाजींची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालवते.
|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || || छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||
यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये केले आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलेले ग्रंथ:- बुधभूषण, नाईकाभेद, नखशिखा, सातसतक.
मृत्यू:- ११ मार्च, इ.स. १६८९.
समाधीस्थळ:- तुळापूर, जिल्हा:- पुणे, महाराष्ट्र.
चलन:- होन, शिवराई.
उत्तराधिकारी:- छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...