परमार पवार राजांचा राज्यकाळ
भाग 3
postsaambhar::-https://www.dharpawar.com/history.php
महाराष्ट्र्रातील मूळ पुरुष - साबुसिंग पवार
साबुसिंग पवार (इ.स. १६xx - १६५७) हिंदवी स्वराज्य स्थापनेत समावेश निजामशाही मुलखात अहमदनगरजवळ, हंगे गावाच्या रानात (कांबरगावच्या डोंगर घटात) साबुसिंगांचे प्रथम ठाणे होते. त्यांनी घोडेस्वार व पायदळ जवळ बाळगले होते. ह्याच सुमारास शिवाजी महाराजांनी हिंदू शूरवीर एकत्र करून स्वराज्य स्थापनेचे स्थापनेचे पवित्र कार्य चालविले होते. महाराजांनी साबुसिंगस हाताशी धरले. तोरणगड मोहिमेत साबुसिंह पवार छत्रपती शिवाजी महाराजां सोबत होते. इ.स. १६५८ (शके १५७९) मध्ये कोकण प्रांत हस्तगत करण्यासाठी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली. त्यावेळी साबुसिंगनी मोंगल फौजेवर चाल करून पराक्रम गाजविला. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात सुखेवाडी ऊर्फ सुपे गाव वसविले. ह्या गावाची पाटीलकी त्यांच्या कामावर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यास दिली. १८ ऑक्टोबर १६५७ (शके २६ अश्विन १५८०) रोजी साबुसिंग पवार ठार झाले.
सरदार कृष्णाजी साबुसिंग पवार कृष्णाजी (इ.स. १६yy - १६zz) नावाचा साबुसिंगना एकुलता पुत्र होता, त्यांची गणना शिवाजी महाराजांच्या खास पागेच्या तेहतीस सरदारांत होतसे. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर ज्या स्वार्या केल्या त्यात कृष्णाजी पवार यांनी प्रामुख्याने भाग घेतला होत. अफझल खान ह्यास महाराजांनी इ.स. १० नोव्हेंबर १६५९ (शके १९ कार्तिक १५८१) मध्ये प्रतापगडावर ठार मारले. त्या प्रसंगी व त्यानंतर अफझल खानाचा मुलगा फाजल खान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवारांनी शौर्य गाजविले. कृष्णाजी पवारांच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना कणगी व करणगाव इनाम दिले. सुपे गावी त्यांची गाडी असून, एक शिवालयही बांधले आहे. कृष्णाजी एकाकी आजारी पडून वारले. त्यांना तीन पुत्र होते व तिघेही मोठे शूर होते. बुबाजी, रायाजी व करोजी; हे तिघेही शिवाजी महाराजांच्या लढ्यात सामील असत. दक्षिनाकडील कर्नाटकच्या मोहिमेत हे तिघेजण होते. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत बुबाजी, रायाजी व केरोजी हे त्रिवर्ग बंधू अधिक वैभवास चढले. छत्रपति संभाजी महाराजांच्या वधानंतर मराठेशाहीवर जे भयंकर संकट कोसळले, ते दूर करण्यासाठी, ज्या मराठा सरदारांनी प्राण पणाला लावून शत्रूशी झुंज दिली त्यात ते त्रिवर्ग बंधूही होते.
स्वराज्रा रक्षक - बुबाजी, रायाजी व केरोजीराजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे औरंजेबाच्या मोगल फौजेचा सामना करण्यासाठी, बुबाजी व केरोजी यांनी मातब्बर फौजा बाळगून वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात मोगल फौजेस हैराण करून सोडले आणि मोगलांच्या मुलखात चौथाई व सरदेशमुखी हे मराठ्यांचे हक्क प्रस्थापित करून तापी खोर्यापर्यंत स्वराज्याचा अंमल बसविला व त्यामुळे मराठ्यांचा दरारा वाढला. या कामगिरीतच एकदा मोंगल रसद लुटीत असताना मराठ्यांचा शूर सेनापती संताजी घोरपडे शत्रू सेने कडून अचानक घेरला गेला तेव्हा बुवाजी पवारांनी त्यास सोडवून आणले इ .स. १६९४ मध्ये संताजी मोंगलास येत असलेली रसद लुटीत असताना मोंगल अधिकारी हिम्मत खान याने घेरले तेव्हा बाबूजी पवार यांनी आपल्या फौजेसह हिम्मत खानवर अचानक हल्ला करून आलेले संकट टाळले. या कामगिरीमुळे राजाराम महाराज प्रसन्न झाले. त्यांनी बुबाजीस ‘विश्वासराव’ हे सन्मानाचे पद व ‘विश्वासराई’ सरंजाम दिला आणि केरोजीस ‘सेनाबारासहस्री’ हि बहुमानाची पदवी व वस्त्रे दिली. राजाराम महाराज खूश झाले व त्यांनी किताब बहाल केले, ही गोष्ट जगजाहीर झाली. विश्वासाची सर्व कामे राजाराम महाराजांनी या बंधुवर सोपवली आणि त्यांनी ती स्वामी निष्ठेने पार पाडली. पवार बंधूंनी शूर व सशास्त्रकुशल लोकांची सेना उभारून वर्हाड व गंगाथडी मुलखात मोंगलांची फौज गर्भगळीत केली, त्यामुळे मराठांच्या दरारा वाढला. सबब राजाराम महाराजांनी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांना बहुमानाची वस्त्रे दिली. इ.स. १६९९ मध्ये छत्रपतींच्या सेवेत खानदेशात असताना मोगलांनी बुबाजीस घेरले, जिवंत वाघ पिंजर्यात अडकला. त्यास आशिर-गडावर भिंतीती जिवंत चिणून ठार मारले. तिन्ही भावांची घराणी - सुप्यात असलेले बुबाजीचे मोठे पवार घराणे "विश्वासराव", रायाजी यांचे "वाघळे" आणि केरोजी यांचे "नगरदेवळे" ह्या नावाने प्रसिद्धीस आली.
No comments:
Post a Comment