परमार पवार राजांचा राज्यकाळ
भाग 4
postsaambhar::-https://www.dharpawar.com/history.php
श्री छत्रपती चरणी तत्पर
- छत्रपती शिवाजी महाराज:- साबुसिंह पवार, कृष्णाजी पवार कृष्णाजी पवार महाराजांच्या खास पागेच्या तेहतीस सरदारात गणना..
- छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज:- बुवाजी पवार, रायाजी पवार, केरोजी पवार राजाराम महाराजांकडून बुवाजीस विश्वासराव हे सन्मानाचे पद तर विश्वाराई हा सरंजाम दिला गेला. केरोजीस सेनाबारासहस्त्री हि बहुमानची पदवी दिली.
- छत्रपती शाहू महाराज :- काळोजी पवार,संभाजी पवार.. काळोजी पवार छत्रपती शाहू महाराजांचे अव्वल भरवशाचे महाप्रतापी सेनापती होते. त्यांना सुभेलष्कर हा सन्मानदर्शक हुद्दा होता. काळोजी पवार यांचे चार पुत्र होते. काळोजी पवार यांच्या मृत्यू नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र कृष्णजी पवार यांना सेनापंचसहस्त्री व सरसुभा हा सन्मानीय खिताब दिला. कृष्णजी पवार व उदाजी पवार यांना हुजरतीची खासा फौज देऊन कोकणात मोहिमेवर पाठवले. उदाजी पवार यांनी खासा सिद्धी अंबर चे शीर कापून आणले. वाडी पाचाड हस्तगत केले. महाड व बाणकोट किल्ले जिंकून घेतले. कृष्णजी पवार मोहिमेत कामी आल्याने त्यांचे खिताब त्यांचे पुत्र बुवाजी यांना दिले. पुढे बुवाजीना पराक्रमाने सेनासाहेब सुभा व सरलष्कर व सेनाधुरंधर हा खिताब दिला. सेनापतीस जो मानपान निशाण व दर्जा होता तोच निशाण मानपान व दर्जा सेनाधुरंधर या पदास होता. बुवाजी पवार यांचे जेष्ठ पुत्र माधवराव पवार पानिपत युद्धात उजव्या बाजूस जे प्रथम सैन्य होते त्यात आपल्या पथका सोबत होते. त्यांच्या पलीकडे कृष्णजी जिवाजी व यशवंत राव पवार होते. माधवराव पवार या या लढाईत वाचले तर राजे यशवंतराव पवार कामी आले.
पवार सरदार यादी
शिवपुर्व काळ
- पवार विश्वासराव .
- सरदार रामजी विश्वासराव.
- शहाजीराजे यांचे बंधु शरिफजी यांच्या पत्नी याच विश्वासराव घराण्यातील होत.
- विजयराव सिधोजी विश्वासराव .
शिवकाळ
- शाबुसिंग पवार
- सरदार कृष्णाजी पवार ,
- यशवंतराव रामाजी विश्वासराव,
- शिवराज्ञानी सोयरबाईसाहेब यांची कन्या दिपाबाईसाहेब यांचा यशवंतरावांशी विवाह.
राजाराम महाराज काळात
- सरदार बुबाजी पवार ,
- रायाजी पवार
- केरोजी पवार
ताराराणीसाहेब काळात
- काळोजी पवार ( नंतर शाहु पक्षात )
- संभाजी पवार
थोरले शाहु काळ
- काळोजी पवार , ( शाहु पक्षात प्रवेश )
- काळोजीस चार पुत्र खालील प्रमाणे -कृष्णाजी पवार , तुकोजी पवार ( देवास थोरली पाती ) जिवाजी पवार ( देवास धाकटी पाती), सरदार मनाजी पवार, सरदार ऊदाजी पवार, सरदार बुवाजी पवार, महाराजा राजे यशवंतराव पवार ( पानिपतमध्ये खर्ची ).
No comments:
Post a Comment