हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरे शिवाजी' असेही म्हटले जायचे. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता.
१६६५ पुरंदर तहानंतर पन्हाळगड परिसरातील लढाईत महाराजांचे दिलेरखानाविरूद्ध सावध धोरण लक्षात न येऊन झालेल्या गैरसमजातून मुघलांना सामील झाले. दहा वर्षे महंमद कुलीखान बनून मोगली गुलामी केली परंतु स्वराज्यात परत येताच महाराजांच्या आश्रयाला आले. महाराजांनी स्वधर्मात दाखल करून घेतले व पालकर घराण्यात आपली कन्या देऊन नातेसंबंध जोडले. महाराजांचे आदर्श धोरण लक्षात येते. पुढे नेताजी हे दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये होते.
शिवपुत्र शंभूराजांच्या जन्म प्रसंगी ते पुरंदर किल्ल्यावर होते. अफजल आदिलशाही मुलखात व शास्ताखान छाप्यानंतर औरंगाबाद पर्यंत मोहीम काढून खंडणी वसूल केली व मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. गनिमी कावा तंत्राचा उत्तम उपयोग केला.
उंबरखिंड लढाई, पन्हाळगड वेढा प्रसंगी शौर्य गाजवले.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.
No comments:
Post a Comment