|| भाग - १ ||
" महाराणी येसूबाईंचे राजकारण "
[ छत्रपतींच्या कैदेनंतरचा अपरिचित इतिहास ]
postsaambhar ::
■ जगविजेता संभाजी लिंक (फ़ेसबुकपेज ) : -
संगमेश्वरी अंधार पडला , मराठयांचा , राजा पकडला गेला , स्वराज्याला ग्रहण लागले . सर्व संगमेश्वरात दुःखमय वातावरण झाले , आपला राजा कैद झाला ; त्यामुळे तेथे माणसे जिवंत असून मरणयातना भोगत होते . लहान पोरं रडत होते , पुरुषमंडळी डोकं धरणीवर आपटत होती , कोणी माती तोंडात घालीत होते , स्त्रियांनी आपल्या बांगड्या फोडीत होत्या , सर्विकडे दुःखमय वातावरण होते . संगमेश्वरात आपल्या धाकल्या धन्याच्या रक्षणासाठी , सरनौबत म्हालोजी घोरपडे व ६०० मावळे धारातीर्थी पडले , आपल्या राजाचा जीव वाचविण्यासाठी लढत होते , मावळ्यांना स्वतःच्या प्राणांची अजिबात पर्वा नव्हती , जेव्हा एक एक मावळा मृत्युमुखी पडत होता , तेव्हा त्याला राजांची काळजी वाटत होती . अखेर सर्वजण धारातीर्थी पडले , त्यांचे मृत्यूमुखी देह सुद्धा तसेच युद्धभूमीवर होते . गावकरी सुद्धा भांबावून गेले होते , त्यामुळे हल्ला झाला त्याठिकाणी कोणीही गावकरी गेले नव्हते . ह्या दुर्दैवी प्रसंगामुळे , संगमेश्वरी हाहाकार उडाला होता , हिंदवी स्वराज्य अडचणीत आले होते .
संताजी आणि इतर सरदार ह्यांनी , राजांना नावडी मार्ग मोकळा करून , ते ही रायगडाकडे निघाले होते , मात्र त्यांना हे ठाऊक नव्हते , नावडी येथील पेठ संगमेश्वरीच राजे कैद झाले होते , हे वास्तव तेव्हा संताजी आणि इतर मराठा सरदारांना माहीत नव्हते . जेव्हा राजांना नावडी मार्ग मोकळा करून दिला होता , तेव्हाच ठरले होते , की जसे जमेल तसे सर्वांनी रायगड गाठायचा , परंतु मराठ्यांचे दैव पूर्णतः फिरलं , आलम दुनियेला जे कधीही शक्य नव्हतं ते घडलं , मराठ्यांचा महापराक्रमी , अजय राजा , छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ....
संताजी आणि इतर सरदार रायगडी आले , ही खबर मिळताच येसूराणी सरकार स्वतः जातीने महादरवाज्यापाशी , महाराजांची विचारपूस करण्यासाठी आल्या [ ह्या घटनेपर्यंत संगमेश्वरी , शेख निजाम उर्फ मुकर्रबखान ह्याचा , राजांवरती छापा पडला , ह्याची राजधानीला बातमी नव्हती ] . संताजी हे राणीसाहेबांच्या समोर आले , मुजरा करताना , संताजींचा चेहरा पाहून , काहितरी वाईट घडले हयाची , येसूराणीसरकारांना चाहूल लागली . येसूबाईंनी संताजींना , स्पष्टपणे विचारले , संताजीराव , " राजे कोठे आहेत , रायगडी केव्हापर्यंत येणार आहेत ? " , संताजी अगदी शांतपणे , राणीसाहेबांना सर्व घडलेला प्रकार सांगू लागले , संगमेश्वरावर अचानक पडलेला छापा , मराठा - मोगल धुमश्चक्रीत सरनौबतांचे धारातीर्थी पडणे , तरीही मावळ्यांचे , धाकल्या धन्याच्या रक्षणाकरीता , जीवाची बाजी लावून लढणे , हे सविस्तरपणे सांगितले . येसूराणी - सरकार सर्व व्यवस्थितपणे एकूण घेत होत्या .संताजींनी लढाईचे वर्णन सांगितले , राणीसर कार आपला मावळा शत्रूवर भारी पडीत होता [ एक लक्षात घेण्याची येथे गोष्ट आहे , ह्या अतिअपदात्मक प्रसंगासमयी , मराठ्यांचे सैन्यबळ हे ६०० मावळा होते , तर मुकर्रबखानाचे मोगली सैन्यबळ ३००० हशम होते , आणि विशेष महत्त्वाचे जे मराठ्यांचे जे ६०० मावळ्यांचे जे सैन्यबळ होते , त्यातील प्रत्येक मावळा विशेष प्रशिक्षण दिलेला होता , व आपण जर बघितलं ६०० मावळे म्हणजे एक मोठी फौजेप्रमाणे ताकद होती , त्यांसोबत अजिंक्य दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज , सरनौबत म्हालोजी घोरपडे , शूरवीर संताजी घोरपडे , त्यांचे बंधू , छंदोगामात्य कवी कलश
( गोकुळदासजी ) , इतर सरदार देखील होते ; तर मोगली सैन्यबळ जरी मराठ्यांच्या ५ पटीने असले , तरी एक विचार करण्यासारखा , कोल्हापूर ते संगमेश्वर पर्यंत मोगल सैन्य , लपत लपत , न विश्राम करता आले होते , कितीही आतील गुप्त मार्ग , जरी स्थानिक वाटाडयांनी दाखविले असतील , बरेच मैल अंतर , घाट , नद्या , दऱ्या आणि निर्भीड जंगल असल्या कारणास्तव ते निश्चितपणे थकले असणार , परिणामी मराठा फौज , जरी कमी सैन्यबळाने असली , तरी ती ताज्यादमाची होती ] , मावळ्यांचा पराक्रम राणीसरकार ऐकत होत्या , तेवढ्यात त्यांनी , संताजींना महाराजांची विचारणा केली , संताजी त्याक्षणी मौन झाले , आणि म्हणाले त्याबाबत तूर्तास तरी काहीही खबर नाही आहे , ह्या धुमश्चक्रीत अंतिम घेतकेस नेमकी काय झाले ते अजूनतरी स्पष्ट नाही , लवकरच खबर येईल , तशी आम्ही तजबीजदेखील केली आहे महाराणीसाहेब . नंतर सर्व सरदार , मंत्री आणि येसूबाईसाहेब हे सदरेवर आले , परंतु येसूबाईंच्या मनात चिंतेचे वादळ रौद्र रूप घेत होते , तरीही त्या संयम बाळगून , शंभूराजांच्या खबरेची वाट पाहत होत्या , वेळही जात नव्हता , अखेर तो निर्णायक क्षण आला , एक हेर आला , सर्वजण काय खबर आहे ह्यासाठी उत्सुक होते , राणीसाहेबांनी वेळ न दवडता विचारणा केली , राजे कुठे आहेत , सुखरूप तर आहेत ना ? त्यावर हेर आसवं येत अवस्थेत म्हणाला , " राणीसाहेब , घात झाला , महाराज पकडले गेले , मुख्यघटनास्थळावरून निसटून , काही अंतर पुढे जाऊन , नावडी जवळ कसबा संगमेश्वर येथे राजे कैद झाले " , [ महाराणी येसूबाईंना काय दुःखयातना झाल्या असतील ह्याची कल्पना करणे , आता अशक्य आहे ] , अशा कठीणसमयी देखील महाराणी येसूबाई स्थितप्रज्ञ होत्या , पण ही गडावरील सर्व मंत्री , सरदार , इतर अधिकारी , राजमाता ह्यांच्या मनावर भीषण आघात करणारी ही घटना होती ; परंतु अशी प्रतिकूल समयी येसूबाई संयम राखून होत्या .
■ शंभूराजांना सोडविण्याचे प्रयत्न : -
वास्तविक शंभूराजे अटक झाल्याची खबर ही रायगडी , छापा पडल्याच्या दीड दिवस नंतर समजली , त्यामुळे खान वाटाड्यांच्या मदतीने , न थांबता , पकडलेले राजकैदी【 छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश 】, ह्यांना घेऊन परतीचा प्रवास वेगाने करू लागला [ त्याला हे पुरते ठाऊक होते की वाटेत मराठी ठाणी आहेत जर त्यांना जराजरी खबर लागली की त्यांचा राजा कैद झालाय , तर आपली कत्तल केली जाईल त्यामुळे त्याने कमालीची गुप्तता बालगिली होती ] , शंभुराजांना सोडविण्याचा एक उत्तम पर्याय होता , मोगली सैन्य घाटमाथ्यावर वर जाण्यापूर्वीच त्यांच्यावर एक जबर हल्ला करून , छत्रपतींना सोडविणे ; परंतु हे झाले नाही कारण मुळात आधी सांगितल्यानुसार शंभूराजे अटक झालेत ही खबर दीड दिवसाने समजली , त्यामुळे खानाची वेळेत सुद्धा मरा -
ठयांच्या पुढे होता , आणि खान परतीसाठी कोणता मार्ग निवडला हे सुद्धा माहिती नव्हते , तसेच ह्यासमयी त्याने मराठ्यांचीच रणनिती ही मराठ्यांविरुद्ध अवलंबिली , त्याने वेगवेगळ्या मार्गात , फौझेनिशी सरदार त्या प्रदेशामध्ये फिरविले . त्याचा फायदा असा झाला की रायगडावरून राजांच्या शोधात काही पथके निघाली , त्यांना निश्चितच गुंगावा मिळाला , अखेर शेख निजाम त्याच्या ध्येयस्थानापर्यंत पोहचला [ मराठयांनी अनेक प्रयत्न हे शंभुराजांना सोडविण्यासाठी निर्विवाद केले असतील , इतिहास त्याबाबतीत मौन ही बाळगीत असेल , परंतु ह्यावेळी दैव हे मुकर्रबखानाच्या बाजूने होता , परिणामी खानाची युद्धनीती सफल झाली ] .
■ आलमगीरा आनंद झाला ....
अकलूजला तळ असतानाच ,
औरंगजेबाला , छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे , मुकरबखानाने कैद केल्याची खबर मिळाली , प्रथम त्याला विश्वासच बसेनात , त्याने पकडलेला खरा संभाजी आहे का ह्याची पुष्टी करावयास सांगितली , आणि जेव्हा त्याचा विश्वास बसला , की मराठ्यांच्या राजाला कैद केले , तेव्हा तो अल्लाला म्हणाला , " संभाजी कैद झाल्याने , एका मोठ्या शत्रूपासून तू माझी
सुटका केलीस " .
पुढे मोगली तळ बहादूरगड
[ धर्मवीरगड ] येथे पडला , याऔरंगजेब जाणून होता , मराठे निश्चितपणे शंभुराजांना सोडविण्यासाठी हमला करतील , अशासमयी जर आपण एका भुईकोट किल्ल्याचा आश्रय घेतला , तर मराठ्यांना हल्ला करणे जड जाईल आणि ते गनिमी कावा ह्या तंत्राचा वापर करू शकत नाहीत , आणि त्यांनी खुला हल्ला केला तर आपले सैन्यबळ अधिक असल्या कारणास्तव मराठ्यांची बेछूट कत्तल होईल व विजय ही आपलाच होईल , त्यामुळे बहादूरगडाची निवड केली , १ लाख पायदळ , ६० हजार घोडदळ आणि त्याची स्वतःची राखीव ५० हजाराची फौज होती , तसेच त्याने नियम बनविले होते , की किल्ल्यापासून ठराविक कोसांच्या अंतरापर्यंत घोडा न वापरणे , त्याच्या सरदारांना देखील बंदी होती , तसेच शाईस्तेखा - नावर , छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकला होता , त्याची पुनरावृत्ती न व्हावी त्यासाठी योग्य ती खबरदारी त्याने घेतली होती . ह्याच किल्ल्यावर येताना छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली , नंतर औरंगजेब आणि शंभूराजे ह्यांची भेट देखील झाली ,परंतु त्याभेटीचा काहीही फायदा झाला नाही , भेटीच्या नंतर शंभूराजांची नेत्रदृष्टी काढण्यात आली , कवी कलशांना देखील हीच शिक्षा दिली . पुढे राजांवर व कविकालशांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले , स्वराज्याकरिता , राजे आणि कविराज सर्वकाही सहन
करीत होते ; मराठयांच्या छत्रपतींवर औरंगजेब पाशवी अत्याचार करतच होता ....
■ आदेश दिला ....
अखेर औरंगजेबाचा सबर संपला , संभाजी आपल्याला काहीही सांगणार
नाही [ खजिना , मोगली फितूर सरदार व बरंच
काही ] , त्यामुळे भर दरबारात आदेश सोडला , " वजीरे सल्तनत , बहुत हुआ सबर , उस काफिर संभा को सजाए मौत सुनाई जाये , ऐसी बेदर्दी और बेरहमी मौत दियी जाये , की उसे देखकर और सूनकर , देनेवाला शक्स और सूनने वाले हर आदमी की रुह काप उठे , इतना
दर्दभरी मौत उसे नसीब की जाये |
सबसे पहले उसके जखमो
से भरे हूए शरीर पर तेजाब डालो , बादमे उसके बदन के तुकडे किए जाये , उसकी बोटी बोटी नोचली जाए , और उसके बोटी के तुकडे चिल कौवो के लिये फेके जाए , ताकी ओ उनको नसीब हो सके |
और ये ध्यान रखा जाए ,
की किसीभी शक्स ने , उन बोटीयो को हात लगाने की कोशीष की तो उसका सर कलम किया जाए | और एक बात जो मगरूर सर जो कभीभी हमारे सामने झुका नही , असे समशेर से काटकर , भाले के नौक पर लगाकर , उसे
दख्खन की गली - गलीमे , गाव - गावमे , फिराव , जुलूस निकालो , ढोल नगाडे बजावो , उसे नचावो , उसके आवाम को मंजर देखणे केलीये मजबूर करो , ताकी उसके बाद मोगलीया सल्तनत के खिलाफ दुश्मनी करणे की किसीकी भी हिंमत न हो " |
हुकूम की तामिळ हो |
[ हा भयावह प्रसंग , म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कौर्याने हत्या , औरंगजेबाने हिंदूंच्या नववर्षाच्या प्रथम दिनीच म्हणजे , गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचे आदेश दिला , आणि छत्रपती शंभूराजांप्रमाणेच , कवी कलशांना , देहदंडाची शिक्षा दिली ] .
अखेर तो अशुभ दिवस उजाडला , शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली
, प्रथम कलशांच्या देहाचे तुकडे केले आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र देहाचे तुकडे केले , अंततः राजांचे मस्तक तलवारीने अलग केले , आणि छत्रपती संभाजी महाराज , हिंदवी स्वराज्य सोडून गेले ....
■ रायगडावर खबर पोहोचली ....
छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या मृत्यूदंडाची शिक्षा रायगडी समजली , सर्वत्र हाहाकार उडाला , हा प्रसंग अतिशय हृदयद्रावक होता , परंतु महाराणीयेसूबाईंनी संयम राखून सर्वांना दिला , स्वराज्यातही खबर समजली , रयतेच्या दुखःची कल्पना करणे आता शक्यच नाही , प्राणांहून प्रिय अशा , राजांची एवढी अमानुषपणे केलेली हत्या पाहून स्वराज्यात सर्वत्र स्मशानशांतता पसरली . छत्रपती संभाजी महाराज , संगमेश्वरी कैद झाल्यापासून , कित्येक घरात चुली पेटल्या नव्हत्या , सर्वांना प्रचंड मानसिक त्रास होत होता . छत्रपतींच्या जाण्याने स्वराज्य पुन्हा अडचणीत आले , परंतु छत्रपती संभाजी महाराजांची , अर्धांगिनी , स्वराज्याची महाराणी तसेच कुलमुखत्यार , येसूराणीसरकार खंबीर होत्या हे , संकट पेलायला , त्यांनी तात्काळ , स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरील किल्लेदारांना
, तसेच सुभेदारांना पत्र पाठविले , " जरी छत्रपती संभाजी महाराज आज आपल्यात नसले , तरी रायगडावर आम्ही स्वतः आहोत , रामराजे आहेत , आलेल्या मोगली आक्रमणाला तोंड , किल्ला लढवा , प्राणांची बाजी लावा ,
प्रखर झुंज द्या " ....
पुढे येसूबाईंनी मंत्रीमंडळाची
एक विशेष भेट घेतली , आणि मोगली आक्रमण कसे थोपवायचे ह्याबाबत रणनिती आखली . नवनिर्वाचित सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांना , वेगेवेगल्या मोहिमा दिल्या .
■ औरंगजेब आणि स्वराज्य : -
औरंगजेबाने पुन्हा आपले नामांकित सरदार , स्वराज्यातील गडकिल्ले जिंकण्यासाठी पाठविले , किल्ले पडतही होते , मोगली आत्मविश्वास प्रचंड वाढला , अशातच औरंगजेबाने एक नवी मोहीम आखली , मरात्यांची राजधानीच जिंकण्याची , त्यासाठी त्यांनी , वजीर असदखान ह्याच्या मुलाची , एतिकदखान ह्याला , ४० हजार फौज , तसेच प्रचंड युद्धसाहित्य घेऊन पाठविले , खान स्वतः जाणून होता रायगड जिंकणे निव्वळ अशक्य . कारण तसेच होते .
■ रायगडावर आक्रमण :-
धूळीचे लोळ उठवीत मोगली सैन्य रायगडापाशी आले , परंतु तरीही त्याचा रायगडाच्या सुरक्षेवर काहीही परिणाम पडणार नव्हता , ४० हजार काय ४ लाख फौज स्वतः आलमगीर जरी घेऊन आला , तरीही रायगड जिंकणे अशक्य , तसेच किल्याला पूर्णपणे वेढा ही घालू शकत नाही , सुरुंगही लावू शकत नाही , कारण बऱ्याच भागात घनदाट जंगल , डोंगरी भाग होताआणि राजधानी असल्याकारणामुळे रायगडी प्रचंड युद्धसाहित्य तसेच इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात होते , रायगडचे किल्लेदार , चांगोजी काटकर हे प्रचंड पराक्रमी होते , आणि त्या समयी रायगडावर पायदळ सेनाप्रमुख , शूरवीर येसाजी कंक स्वतः होते , त्यामुळे कितीही वर्षे युद्ध केलं , तरीही रायगड अजिंक्य राहणार हे निश्चित होते , तरीही येसूबाईंनी अजून एक डाव टाकला , छत्रपती रामराजे तसेच कुटुंब आणि इतर २०० असामी , हे गुप्तमार्गाने रायगडावरून पाठविले , जेणेकरून छत्रपती सुरक्षित राहावेत , हा निर्णय निर्णायक ठरला , रायगड लढत होता , मराठ्यांचीच सरशी होत होती . त्यात पावसाळा , रायरीचा पाऊस सहन करणे अशक्य , मोगलांची दाणादाण होत होती .
■ रामराजांचा प्रवास : -
रामराजे , प्रतापगड - वासोटा - सज्जनगड - वसंतगड - पन्हाळा येथे जून अखेर आले . मराठ्यांचे मुख्य किल्ले सिंहगड , पुरंदर , राजगड , तोरणा हे किल्ले मोगलांनी फितुरीने जिंकले घेतले . पण पावसाने मराठ्यांना थोडी उसंत घेतली , कारण मोगली फौज पावसाळ्यात मावळी भागात , सह्याद्रीमध्ये लढू शकत नव्हती , ह्याचा फायदा मराठयांनी घ्यायचे ठरविले , आणि मराठा सरदारांनी अनेक मोहिमा आखल्या , फलटण येथे धनाजी जाधव ह्यांनी मोठा पराक्रम गाजविला , तसेच मोगलांवर मराठे छापे टाकीत होते . अशातच सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांनी , बहिर्जी , मालोजी व विठोजी चव्हाण , ह्यांनी एक धाडसी बेत आखला , तुळापूर येथे असलेल्या बादशहाच्या छावणीत हल्ला करून बादशहाला ठार मारायचे . हल्ला हा यशस्वी सुद्धा झाला , संताजी स्वतः गुलालबारीमध्ये
[ औरंगजेब राहण्याचे ठिकाण ] प्रवेशले ; परंतु औरंगजेबाचे नशीब जोरावर होते , त्यासमयी तो गुलालबारीमध्ये हाजीर नव्हता , त्याला सुखरूप ठिकाणी हलविण्यात आले , पण पराक्रमाची खून म्हणून संताजींनी गुलालबारीच्या तंबूचे सोन्याचे कलश कापून आणले , पुढे संताजींनी आपला मोर्चा रायगडी वळविला , एतिकदखानावर बाहेरून जोरदार हल्ला चढविला , मोगली फौझेचे खूप नुकसान केले , काही हत्ती तसेच संपत्ती मराठ्यांनी लुटली , व सर्वजण पन्हाळ्याला आले .
मोगल आता पन्हाळ्याला वेढा घालू लागले , तेव्हा निळो मोरेश्वर , रामचंद्रपंत अमात्य , शंकराजी नारायण सचिव , सरसेनापती संताजी घोरपडे , धनाजी जाधव , रुपाजी भोसले ह्या मुत्सदयांनी , मोगली प्रचंड सेनासागर पाहून , राजारामराजांना जिंजीला पाठविण्याचा निर्णय घेतला , इकडचे निर्णय घेण्याची मुभा प्रधानमंडळाला दिले . आणि रामराजे गुप्तपणे जिंजीला निघाले , त्यांच्या खजिन्याची जबाबदारी जिंजीपर्यंत नेण्याची , गिरजोजी यादवांवर सोपविली , त्यांचा मार्ग भिन्न होता ....
■ रायगड : -
पावसाळा गेला , रायगड लढतच होता ; पण नंतर स्वराज्याला लागलेला शाप , फितुरीने डोके वर काढले , आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेला , कोणाएका सरदाराने गडाचे दरवाजे उघडले , मोगली सैन्य गडात घुसले , राजपरिवार कैद झाले , राजपरिवारातील सर्व सदस्यांच्या सुरक्षेची , एतिकदखानाने येसूबाईंना हमी दिली .
पुन्हा फितुरीने शत्रूंचा विजय झाला , रायगड पडला असे म्हणू शकतो . खानाने रायगडावर जाळपोळ सुरू केली , सरकारी दस्तऐवज नष्ट केले . नंतर बादशहाने तख्त फोडण्याचा आदेश दिला , त्यानुसार ज्या सिंहासनावर , राजा शिवछत्रपती , राजा शंभूछत्रपती विराजमान झाले होते , ते सिंहासन
नष्ट करण्यात आले , घनाचे घाव घालण्यात आले , आगीचा लोळ टाकण्यात आला आणि हिंदवी स्वराज्याचे सिंहासन , तख्त नष्ट करण्यात आले .
एकंदर सन १६८९ हे वर्ष , हिंदवी स्वराज्यासाकरिता , छत्रपतींच्या परिवारासाठी खूप भयंकर वर्ष होते , ह्या एका वर्षाने मराठ्यांच्या संपूर्ण इतिहासाला कायमची कलाटणी दिली .
◆ सन १६८९ मधील महत्वपूर्ण तारीखा : -
● ३ फेब्रुवारी - छत्रपती संभाजी महाराज यांवर
संगमेश्वरी छापा आणि कैद .
● ९ फेब्रुवारी - रामराजे मंचकी बसले .
● १५ फेब्रुवारी - शेख निजाम याने संभाजी महाराज व कवी कलुशास , बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले .
● ११ मार्च - संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
● २५ मार्च - राजधानी रायगडाला वेढा .
● ५ एप्रिल - रामराजांनी रायगड सोडला .
●ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण .
● ३ नोव्हेंबर - रायगड मोगल अधिपत्याखाली.
■ संदर्भ ग्रंथ : -
● शिवकाल (१६३०-१७०७)[डॉ.वि.खोबरेकर]
● शिवजीचारित्र [ जदुनाथ सरकार ]
● छत्रपती शिवाजी व शिवकाल
●छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) ,
● शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ●ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) ,
● राजा शंभूछत्रपती ( श्री . विजय देशमुख ) ,
● अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज ( ऍड . अनंत दारवटकर .
● मराठ्यांची इतिहासाची साधने ,
● मराठा - पोर्तुगीज संघर्ष ( श्री. सरदेसाई )
●ऐतिहासिक पत्रव्यवहार ,
●ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज
● जेधे शकावली ,
● संभाजी ( श्री. विश्वास पाटील )
● ऐतिहासिक बखरी .
● इंग्लिश दस्ताऐवज
● इतर ग्रंथ .
■ = ■ = ■ ●●●●●●●● ■ = ■= ■
No comments:
Post a Comment