विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 21 September 2020

शिवकालिन शस्त्रास्त्रे- चिलखत



शिवकालिन शस्त्रास्त्रे- चिलखत

प्राचीन काळी सैनिक फक्त छातीवर कमरेपर्यंत संरक्षणासाठी चिलखत वापरीत. त्याचे हात मात्र तसेच विनाचिलखताचे असायचे.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पारटा या प्रकारातील हे चिलखत. त्याचे हात मात्र तसेच उघडे राहत असत.

कौटिल्याचे मते, "विशिष्ट स्वरूपामुळे ज्यास लौह जालीका असेही म्हणतात"

प्राचीन काळी तलवार, भाला, गदा इत्यादी शस्त्रांचा आघात, वारापासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफ गोळ्यांचे तुकडे, अस्त्रांच्या घातक मार्यापासूनच शरीर संरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षण साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे

चिलखताला संस्कृतात बाण, वर्मन, कवच, द्रापि, वर्त्मन अशी नावे आहेत. शरीराच्या प्रत्येक भागात करिता अनुरुप अशी वेगवेगळी चिलखते असतात, आणि त्यांची नावेही वेगवेगळी आहेत ती पुढीलप्रमाणे - शिरस्त्राण, कंठत्राण, कंचुक वाखान, नागोदरिक इत्यादि.

मराठ्यांच्या युद्ध पेहरावातही चिलखत वापरत असत.

अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांनी अंगात जरीकुडता नावाचे रेशमी धाग्याबरोबर धातूंच्या तारा विणुन बनविलेले कुडत्याच्या आकाराचे चिलखत घातले होते.

ह्या संदर्भाचे साधनांमधील आढळलेले वर्णन पुढीलप्रमाणे-

"मार्गशीर्ष शु. ७ शुक्रवार ता.१०/११/१६५९ हा उभयतांच्या भेटीचा दिवस निश्चित झाला. ते दिवशी भेटीच्या आधी शिवाजीने आपल्या बचावाचा पोशाक चढविला. अंगात चिलखत व त्यावर अंगरखा, शिरस्त्राण व वर पागोटे, उजव्या हातात भवानी तलवार व बाहीते बिचवा डाव्या हातात वाघनखे, अशी आपल्या संरक्षणाची सिद्धता केली." (संदर्भ-मराठी रियासत)

कमेंट मध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा.

धन्यवाद.

Original post*

@maratha_riyasat

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...