विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 September 2020

सरदार " कोयाजी बांदल -देशमुख

 

बारा मावळ
🔥🔥



सरदार " कोयाजी बांदल -देशमुख🔥🔥

🤺🤺 "कोयाजी बांदल"🤺🤺

🔥महाराजांनी मोंगली सरदार शास्ताखानाला शास्त दिली त्यावेळी महाराजांसोबत जे वीर होते त्यात कोयाजी बांदल ह्यांचाही समावेश होता, कोयाजींनी ह्या युद्धात पराक्रमाची शर्थ केलेली, जखमी होऊन शरीरावर युद्धखुणा जपल्या त्यांनी. अश्या ह्या वीराची समाधी स्थळावर नतमस्तक होऊन आज धन्य झाले 🔥
कवी अज्ञानदासां बांदलांच्या कतृत्वाविषयी लिहिले आहे तो असे :-
🙏🙏अज्ञानदास विनवी श्रोत्याला | राजा अवतारी जन्मला ||
नळ निळ सुग्रीव जांबुवंत | अंगद हनुमंत रघुनाथाला ||
एकांती भांडण | जैसे राम-रावणाला ||
तैसा शिवाजी सर्जा | एकांती ना आटोपे कवणाला ||
जेधे बांदल तैसे शिवाजीला | दृष्टी परी यश शिवाजी राजाला ||🙏🙏

👏👏श. १५८५ श्र .सा. ५ ला .७४४
श. १५८५चैत्र इ. १६६३एप्रिल 👏👏

..........शास्ताखान दिल्लीहून स्वारी करून आले. खासा राजमहालात येऊन राहिले. ते समयी थोरले महाराज जातीनशी राजगडहून रात्रीस धारकरी लोक पायउतारा घेऊन रंगमहालात प्रवेश करून गर्दी केली. तेवेळेस कोयाजी बांदल याणे मोगलाचे लोकांवर वार केले., त्यास ही चार वार लागले. याकरिता महाराज कृपाळू होऊन मौज आळंदेस नूतन इनाम जमीन रकम कास टके ११।। दिल्ली....
समाधी स्थळ मौजे इंगवली, नेकलेस पाईट, तालुका भोर जिल्हा पुणे
फोटो :- सरदार कोंयाजी बांदल देशमुख समाधी व छत्रपती शिवाजी महाराजांचे इनाम पत्र
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....