विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

मराठा सरदार कदमबांडे


मराठा सरदार कदमबांडे. .......................................................................... िशवकाळातील त्यावेळचे एक तालेवार 96 कुळी मराठे घराणे.. सरदार कृष्णाजी कदमबांडे हे मोठे पराक्मी.. त्यांना अळकुटी पिरसरातील गावाची जहािगरी िमळाली.. थोड्याच कालावधीत त्यानी अळकुटी जहािगरी नावारूपास आणली.. िनजामशाहीकडून लढताना त्यानी मोठा पराक्म गाजवला.. संपूर्ण जुन्नर परगणा व अहमदनगरच्या िनजामशाहीपर्यंत त्याचा दबदबा वाढला होता. त्याकाळात शहाजीराजे भोसले िनजामशाहीतील मातब्बर सरदार होते. त्यामुळे कृष्णराव कदमबांडे यांचा शहाजीराजे व जुन्नरचे िकल्लेदार िवजयराजे यांच्याशी अितशय स्नेह होता. तो काळच धामधुमीचा होता. िनजामशाही, अिदलशाही व मोगल यांचा सत्तासंर्घष पराकोटीला पोहचला होता. जुन्नर िफरत्या चक्ाप्माणे िनजाम,अािदल, मोगल यांच्याकडे जात होता. कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे िनजामशाहीकडून मोठा पराक्म गाजिवत होते. िनजामशहाकडून त्यांना बढती िमळाली. 1628 साली या भागात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी हे गाव दिशणेकडे 1 मैल अंतरावर मुबलक पाण्याच्या िठकाणी सपाट प्देशात आवळकंठीच्या बनात एका छोट्या नदीिकनारी त्यांनी अळकुटीची स्थापना केली. आवऴकंठीचे बन साफ करुन िनयोजनपूर्वक तेथे सुंदर नगर वसिवले. िदवसेंिदवस येथील वस्ती वाढू लागली. अऴकुटीचे एका छोट्या शहरात रुपांतर झाले. आवळकंठी बनात हे गाव वसल्यामुऴे अमरापूर उर्फ आवळकंठी हे गावाचे नाव रुढ झाले. येथे त्यांनी छोटा वाडा बाधंला आिण एके िदवशी शहाजीराजे जुन्नरकडे जात असताना राञ झाल्यामुऴे कृषणराव कदमबांडेच्या वाड्यात मुक्कामाला गेले. त्यावेळी शहाजीराजेंसोबत गरोदर िजजाऊही होत्या. िजजाऊमाता गरोदर असल्यामुळे मार्गक्मणाला मर्यादा पडत होत्या. कृष्णराव कदमबांडेंना खूप आंनद झाला. प्त्यशात शहाजीराजे व िजजाऊ आपल्या घरी मुक्काम. कृष्णराव धन्य झाले. असे म्हणतात की, दोन िदवस राजांना ठेवून घेतले. खूप सेवा केली. िजजाऊंचा यथोिचत मानसन्मान केला. त्याची ओटी भरली. शहाजीराजांनी जुन्नर येथील िशवनेरी िकल्लावर आपले व्याही िवजयराजे िवश्वासराव यांचेकडे िजजाऊ यांना ठेवून राजे पुढील मोिहमेकरता रवाना झाले. थोड्याच िदवसात िशवनेरीवर ते स्वातंञ्यसुर्य उगवले.. ज्यांनी मराठी मुहूर्तमेढ रोवून स्वराज्यात रुपांतर केले. त्या एका घटनेने अळकुटीची भूमी पिवञ झाली. कृष्णराव कदमबांडे कृतकृत्य झाले. सरदार कृष्णराव कदमबांडे हे िदवसंेिदवस पर्बळ होत होते. मोगलांनी िनजामशाही नष्ट करुन त्यांचा या भागावर एकछञी अमंल चालू झाला. या काळात संघर्ष थांबला होता. एक िस्थरपणा आला होता. मोगलांनी दौलताबाद राजधानी करुन तेथुन अ.नगर, जुन्नरचा कारभार पाहू लागले. खंडणी रुपात कर भरुन अळकुटी जहािगरीतील कारभार कदमबांडे पाहत होते. मोगलांची मजीॆ संपादन केल्यानंतर मोगलांचे या भागाकडे दुर्लष झाले. स्वतंञ राजाप्माणे ते कारभार करू लागले. स्वत्.चे मोठे सैन्य त्याच्या पदरी होते. यात घोडदळ, पायदळ, 5 हजारांची फौंज त्यांच्याकडे होती.. याच काळात मोगलांनी खुलदाबाद शहर खूप सुंदर सिजवले होते. ते तंञण् बोलावून अऴकुटीत 4 एकर जागेमध्ये भव्य राजवाडा बांधला. मुख्य प्वेशद्वार, चार भव्य बुरूजे, सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी, िकल्लात दुमजली इमारत, प्वेशद्वाराजवळ राजदरबार व सरकारी कामकाजासाठी लांबलचक सागवानी कलाकुसरीचा दरबार तयार केला. एका लहान भुईकोट िकल्ल्याची िनर्िमती झाली. नदीच्या पलीकडे िचंचेच्या बागेत लष्करासाठी छावणी िनिश्चत केली. ितथे िवहीर खोदली. भटारखाना तयार केला. हेमाडपंती िशवमंिदराचे काम झाले. जुन्या एका दुर्लिषत कबरीचाही जीणोंध्दार केला. त्यांनतर त्यांनी संपूर्ण गावाला मजबुत अशी तटबंदी करुन गावकुस बांधली. या गावकुसाला 2 प्चंड वेशी व मोठाले आठ बुरूंजे बांधली.. सरदार कदमबांडे यांचे पदिर िबवरे हे बा्ह्मण कुटूंब लेखिनक म्हणून कामाला होते.. थोडक्यात अऴकुटी जहािगरीचे कुलकर्णीपद त्यांच्याकडे होते. िबवरे मोठे धार्िमक होते. त्यांनी कदमबांडेतर्फे निदकाठी महादेवाचे सुंदर हेमाडपंथी मंिदर बांधले. वाटसरू तसेच गावातील लोकांना िपण्याच्या पाण्यासाठी मोठी बारव बांधली. शेजारी भवानीमातेचे टुमदार मंिदर बांधले. सरदार कदमबांडे सिहष्णु वृत्तीचे होते. त्यांच्या सैन्यात िहंदू व मुिस्लम असे दोन्ही प्कारचे सैन्य होते. त्यानी भुईकोट िकल्ल्याच्या िनर्िमतीनंतर एका बाजूला मसिजत बांधली. अऴकुटी शहराची वस्ती वाढत होती. प्चंड लष्कराला लागणारे िकराणा, कपडे यासाठी त्यांनी व्यापाराला पोर्त्साहन िदले. मोठ्या बाजारपेठा वसिवल्या. िवणकरांना पोर्त्साहन िदले. त्यामुळे कोष्टी व मोमीन समाज मोठ्या संखे्यने येथे स्थाियक झाले. सै्थर्य व व्यापारास पोषक अशी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या संखे्यने व्यापारी येथे स्थाियक झाले. त्याकाळी अळकुटी शहराची मोठी भरभराट झाली होती. अऴकुटीचा डंका चारही िदशेला होत होता. बाजारपेठ गजबजली होती. व्यापार्याना संरषण िमळत होते. याकाळात कदमबांडेचा मोठा राजदरबार भरायचा. येथे न्याय िनवाडे व्हायचे , सरकारी कामकाज चालायचे. सरदार कदमबांडे यांची छञपती कुटूबांिवषयी मोठी िनष्ठा होती. हा प्देश जुन्नर-पारनेर-अ.नगर-खुलादाबाद पूर्णपणे मोगलाच्या ताब्यात असल्यामुळे कदमबांडे यांना उघडपणे छञपतीच्या गोटात जाता येत नव्हते. छञपती िशवाजी महाराजांनी इ.स.1657 ते 1670 दरम्यान हा भाग िजंकण्याचा जोरदार प्यत्न केला. परंतु ते अयशस्वी ठरले. त्यांनी जुन्नर-पारनेर-अ.नगर लुटले. मोठी चामड्याची बाजारपेठ असलेले िनघोज लुटले. परंतु त्यांनी अऴकुटीला धक्का लावला नाही. या भागात असताना त्यांनी एका पार्चीन पाडुंरंग मंिदरात दर्शन घेतले. बहुधा ते रांधे येथील स्वयंभू िवठ्ठल-रखुमाईचे मंिदर असावे. छञपतींना शेवटपर्यंत हा भाग स्वराज्यात सामील करता आला नाही. इंग्ज लोक भारतात व्यापारासाठी आले होते. त्यांच्याबरोबर त्याकाळी िफरणयासाठी काही इंग्ज पर्वासी आले होते. असेच दोन इंग्ज पर्वासी अबर्ट िरस्ले व िवल्यम कुर्फी याने आपल्या िपपल ऑफ इंिडया या पुस्तकात पृ.क्.164 मध्ये अळकुटीचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, महाराष्टात मराठा सरदार घराण्यांमध्ये भोसले, िनंबाळकर, जाधव , कदमबांडे व पोवार ही घराणी मोठे शूरवीर व तालेवार घराणे होते. सरदार कदमबांडे या भागात स्वताला राजे समजायचे. स्वतंञ िसंहासन , स्वतंञ ध्वज (भगव्या ध्वजावर तलवार व ढालीचे िचञ), पदरी हत्यारबंद घोडदळ व पायदळ सैन्य होते. तसेच सरदार कदमबांडे घराण्याची 70 हात लांब मखमली कापडाची वैिशष्ट्यपूर्ण पगडी होती. इ.स.20 फेबु्वारी 1707 मध्ये औरंगजेब अहमदनगर येथे वारला. त्यावेऴी छञपती शाहूंचा मुक्काम येथेच होता. पुढे उत्तरेत गेल्यावर त्याची सुटका करण्यात आली. त्यादरम्यान ऑगस्ट मिहन्यात शाहू महाराज अ.नगर येथे आले. शाहू महाराजांना अऴकुटीचे सरदार अमृतराव कदमबांडे सर्वात पर्थम भेटले. ते महाराजांच्या मागे खंबीरपणे उभे रािहले. यावेळी कदमबांडेकडे 10,000 पेक्शा जास्त हत्यारबंद सैिनकांची फौज होती. शाहू महाराजांना पराक्मी अमृतराव कदमबांडे यांचा फार मोठा आधार होता. अ.नगर येथे शाहू महाराजांनी मोठया फौजेचा जमाव काेला. अनेक मातब्बर सरदार घराणे शाहू महारांजाना येऊन िमळाले. छञपती शाहूंनी ताराबाईंशी वाटाघाटी केल्या. याचा िनकाल लागण्यास वेळ लागला. सुरूवातीला अ.नगर येथे राजधानी करण्याचा शाहूंचा बेत होता. परंतु मराठेशाहीचे मुख्य गादी सातारला।। अष्टप्धान , राजिचन्हे तेथेच. सातारा घेतला नाही तर आपणास कोण छञपती मानणार नाही. नगरच्या राजधानीचा बेत बदलून दहा ऑकटोबरला मोिहमेसाठी पुढे रवाना झाले. मोठा संघर्ष करून छञपती शाहू महाराज सातारच्या गादीवर बसले. या लढाईत सरदार कदमबांडे यांनी मोठा पराक्म गाजिवला. संपूर्ण मराठा सरदारात कदमबांडेचा दबदबा वाढला. इ.स. 1710 ते 1735 हा काऴ कदमबांडे घराण्याचा सुवर्णकाऴ होता. एकाचढ एक कर्तबगार, पराक्मी माणसे या घरात जन्म घेत होते. या काळात त्यांनी अटकेपार झेंडे लावले. सरदार अमृतराव कदमबांडेंची दोन्ही मुले िशर्मंत सरदार रघोजीराव कदमबांडे व िशर्मंत सरदार कांताजी कदमबांडे हे मोठे प्राक्मी िनघाले..इ.स. 1720 साली सरदार कदमबांडे कातांजी कदमबांडे यांनी गुजरात भागात चढाई केली. तेथे अतुलनीय पराक्म गाजिवला. तेथून मोठी लूट ते घेऊन आले. या गुजरात स्वारीमध्ये त्यांनी 40 ते 45 उंटावर येथे धन आणले. शेवटच्या उंटावर केरसुणी आणली (केरसुणीला लक्ष्मीचा दर्जा िदलेला आहे.) असा उल्लेख आहे. िशर्मंत सरदार कांताजी कदमबांडे सोबत त्यावेऴी त्या भागातून गुजराती व मारवाडी समाज मोठया प्र्माणावर व्यापारासाठी आला. कांताजी कदमबांडेनीे नवीन पेठा वसिवल्या. सोने, चांदी व िहरे यांचे मोठमोठ्या पेठा स्थापन झाल्या. कापड उद्योगासाठी तर कदमबांडेनी मोठं उत्तेजन िदलं होत. मोठा मोमीन िवणकर समाज स्थाियक झाला. चामड्याची बाजारपेठ बहरली. अनेक व्यापारी कुटुंबे येथे स्थाियक झाली. व्यापार उिदमास येथे मोठे पो्र्त्साहन िमऴत होते. कदमबां़डे धार्िमक व मोठे दानशूर होते. त्या काळातील लघुउद्योगांना नेहमी मदतीचा हात िदला. येिथल व्यापार वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याकाळतील ज्या- ज्या गोष्टी दैनंिदन जीवनात अत्यावश्यक म्हणून गणल्या जायच्या त्या तयार करणार्या कुशल कारािगरांची संख्या इंथ खूप मोठ्या प्माणात होती. रघोजीराव कदमबांडे धार्िमक वृत्तीचे होते. त्याच्याकडे मोठे सैन्य असायच. लढाईत काही सैन्य मृत्युमुखी पडायचे. ते दरवर्षी धार्िमक िवधी, शांती,यदण्य,अन्नदान करायचे. कोरठणच्या खंडोबाचा पालखीचा मान कदमबांडे घराण्यात होता. िशर्मंत सरदार कांताजी कदमबांडे यांचेकडील घोडदऴ खूप मोठे होते. घोडे चरण्यासाठी िशरापूरचा माळ, रांधे येथील खंडोबा माळ, दरोडीचा माऴ या पट्ट्यात चारा व पाणी मुबलक असल्यामुऴे घोडदऴात उत्तम व उमेद घोडे होते. रांधे या िठकाणी मोठ्या पागा होत्या. तेथे घोड्यांची मोठी पैदास केली जात होती. अऴकुटीकरांच्या अिभमानाची गोष्ट अशी की, िशर्मंत सरदार कांताजी कदमबांडेच्या घोडदऴाचे प्र्मुख एक उमदा युवक होता. त्यांचे नाव सरदार मल्हारराव होऴकर. आश्यचर्य वाटले ना.।। मल्हारराव पूणे जहािगरीतील नेरजवळच्या होळ गावाचे धनगर समाजाचे हे पराक्र्मी युवक नोकरीच्या शोधात अळकुटी येथे आले. सरदार कांताजी कदमबांडेंच्या घोडदळाचे प्र्मुख झाले. त्यावेळी त्यांनी घोड्याच्या सरावासाठी रांधेचा खंडोबा माळ, िशरापूर, लोणीमावळा या पिरसराची मोठी रपेट मारली असेल. अळकुटीत कदमबांडेचा कारभार त्यांनी जवळून पािहला. धार्िमक व व्यापारातील सिहष्णुताही त्यांनी पािहली. या अळकुटीच्या मुशीतच त्यांना पुढील राजकारणाची पे्रणा िमळाली असेल.।। पुढे हेच मल्हारराव होळकर आपल्या पराक्माच्या जोरावर मराठेशाहीचे फार मोठे सरदार झाले.. सरदार रघोजीराव कदमबांडे व कांताजी कदमबांडे यांच्या पराक्माच्या बातम्या शाहू महाराजांपर्यंत जात होत्या. रघोजीराव कदमबांडेंचा मुलगा शूरवीर पराक्मी सरदार मल्हारराव कदमबांडे हेही खूप कर्तबगार िनघाले.. त्यांनी छञपती शाहू महाराजांचे लक्श वेधून घेतले. शाहू महाराजांनी आपल्या मुलीसीठी मल्हाररावांसाठी मागणी घातली. छञपतीची नात आपल्या घरची सून होणार यामुऴे रघोजीरावांना खूप आनंद झाला. अऴकुटी शहरात हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. छञपती शांहूची मुलगी गजराराजे भोसले व िशर्मंत सरदार रघोजीरावांचा मुलगा सरदार मल्हारराव कदमबांडे यांचा शाही िववाह सातारजवळच्या वडगावला मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. दोन्ही घराण्यातील तालेवार मंडळी या िववाहाला हजर होती. अशा तरे्हने सातारच्या गजराराजे भोसले या अळकुटीच्या सुनबाई झाल्या.. हैदराबादच्या िनजामाने मराठी मुलुखात चढाया चालू केल्या होत्या. सरदार दाभाडे, सरदार कांताजी कदमबांडे, सरदार िपलाजी गायकवाड यांनी िनजामाचा पराभव केला.. सरदार कदमबांडे यांनी 1726 मध्ये गुजरातमधील सधन शहर वडनगर लुटले. यावेळी मोठ्या प्र्माणावर लूट िमळाली. त्यावेळी महाराष्टाच्या राजकारणाचा हळूहळू छञपती घराण्याचा प्भाव कमी होऊन सर्व सूञे पेशव्याच्या हाती एकवटली. पिहले बाजीराव पेशवे खूप पराक्मी व मुत्सद्दी िनघाले. त्यांनी प्र्थम सर्व मुलुख मराठेशाहीत आणला. पेशव्यांकडून लढताना अनेक सरदारांनी बहादुरी दाखवली. महाराष्ट काबीज झाल्यानतंर पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावण्यास सुरूवात केली. पिहल्या बाजीराव पेशव्यांकडून सरदार िपलाजी गायकवाड, सरदार कांताजी कदमबांडे,तळेगावचे सरदार दाभाडे यांनी गुजरातचा बराच मुलूख काबीज केला. िजंकलेल्या प्देशात सत्ता अबाधीत ठेवण्यासाठी त्या भागात राहणे गरजेचे होते. म्हणून सरदार कांताजी कदमबांडे व दमाजी गायकवाड यांनी गुजरातचा पिरसर वाटून घेतला. गायकवाड यांनी तापीचा पिलकडचा भाग व बडोदा मुख्यालय घेतला, तर कदमबांडे यांनी तािपचा अिलकडचा भाग धुळे पिरसर रनाळा, कोपर्ली, तोरखेड हा भाग घेतला. त्यांनी तोरखेड हे मुख्यालय केले तर कोपर्लीला सैिनकाची छावणी केली. त्या भागात मोठा िवस्तार केला. त्यांच्या मदतीला रघोजीराव कदमबांडे व पराक्मी मुलगा म्लहारराव हे अळकुटी येथून तोरखेड येथे गेले. मल्हाररावांच्या पत्नी शाहूकन्या गजराराजे या अितशय िशवभक्त होत्या. त्यांच्या पूजेसाठी खास ञ्यंबकेश्वरहून अळकुटी येथे जागृत स्वयंभू िशविलंग मागिवण्यात आले होते. त्या िशविलंगाची स्थापना राजवाड्याच्या तळघरात करण्यात आली होती. नतंर मल्हारराव व गजराराजे तोरखेड येथे स्थाियक झाले. तेथे त्यांचा राजवाडा आचही पहावयास िमळतो.कारण हा मुलूख पेशव्यांच्या पुण्यापासून लांब होता. 5 वर्षाचा शेतसारा पेशव्यांकडे भरून ते त्या भागाचे राजेच झाले होते. अळकुटी भागात मल्हाररावांना पराक्माला वाव िमळाला नसता. कारण पूर्ण महाराष्ट पेशव्यांच्या अंिकत झाला होता. छञपती घराण्याशी एकिनष्ठ म्हणून त्यांचे खच्चीकरण करण्यात आले असते. हा दूरदर्शीपणा ओळखून रघोजीराव व मल्हारराव तोरखेड येथे स्थाियक झाले. तेथे त्याच्या पराक्माला मोठा वाव िमळाला. गुजरातबरोबर मध्यप्देशात त्यांनी धडक मारली. यावेळी त्यांच्याकडे फार मोठे सैन्य होते. इ.स. 1750 नंतर अळकुटीच्या गादीचे महत्व कमी होऊन, तोरखेडच्या गादीला महत्व पा्र्प्त झाले. अळकुटी येथील गुजराती व्यापारी िनघुन गेले. सरदार रघोजीरावांचा दुसरा मुलगा कमळाजी हे अळकुटी भागाचे कारभार पाहू लागले.. या भागातून जाताना महत्वाचे कागदपञे तळघरात ठेवले असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच इतके मोठे पराक्मी घराणे असूनसुध्या ते कागदपञांअभावी प्र्काशात आले नाही.. या घराण्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. सरदार कमळाजीराव सुध्दा पराक्मी व धार्िमक होते. त्यांनी खर्ड्याच्या युध्दात भाग घेतला होता. पेशव्यांनी त्यांना दौंड तालुक्यातील वडगाव हे गाव बक्िषस िदले. आजही त्या गावास बांडेचं वडगाव म्हणतात.. कमळाजीरावांनी हनुमान मंिदर व गिढच्या शेजारी भव्य िशवमंिदराची उभारणी केली. काळ्या घोटीव दगडात चुन्यामध्ये हे बांधकाम केले आहे. या मंिदरावर पेशवेकािलन छाप पडते. गजराराजेच्या िशवपूजेसाठी जी ञ्यबंकेश्वरावरून जागृत व स्वंयंभू िशविलंग आणले होते बहुदा याच िशविलंगाची पा्णप्ितशष्ठा या मंिदरात केली असाल्याची शक्यता आहे. या महादेव मंिदराचा िशवपा्णप्ितष्ठेची तारीख व मजकुर या िशलालेखात आहे. हे मंिदर शके 1672 म्हणजेच इ.स.1750 साली पा्णप्ितष्ठा.. मजकूर पुढीलप्माणे...... श्री सीवचरणि दृढभाव कमळाजी सुत रघोजी कदमराव पाटिल मोकदम मौजे आमरापूर उर्फ आवळकंठी प्रगणे कर्डे सरकार जुन्नर सके १६७२ श्री मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा र _ _ _ _ _ _ _ शुभं भवतु ' यानंतर माञ या घराण्यात कर्तबगार माणसे िनपजली नाही.. नंतर हे घराणे िशण होत गेले. पेशवाईत क्विचतच यांचा उल्लेख आलेला आहे.. एका वाड डायरी नोंद पुढीलप्माणे.... या पञानुसार िञंबक सोनार यांच्याकडून िवठ्ठल अप्पाजी कदमबांडे कमािवसदार अळकुटी यांनी 292 रुपये जबरदस्तीने घेतले होते. त्याबाबत ञ्यंबक सोनार याने तका्र िदली होती. त्याबाबत ञय्बंक सोनार याने नारायणराव पेशवे यांस पुणे येथे येऊन तक्रार िदली होती. त्यानतंर नारायणरावाच्या िचटणीसाने पञ पाठवून कऴिवले होते की, पंचायत घेऊन िनर्णय घेण्यात यावा. त्यापैकी 1/4 पैसे सरकारात घेऊन बाकीचे पैसे सोनारास देण्यात यावे. या पञाचा ( िदनंाक 26 नोंव्हेंबर 1767) अळकुटी बरोबरच शेजारील गावाचा इितहास उपलब्ध होतो. मुळे जहािगरदार असलेले शेरी गाव व िपंपळगाव येथील लोकांमध्ये 'कोरठण खंडोबा' येथील पूजेिवषयी वाद होता. हा वाद 2 िडंसेबर 1768 रोजी माधवराव पेशवे यांच्यापर्यंत गेला होता. पेशवेकाळात अळकुटी हे मुख्य गाव होते.. येथील माधवराव कदमबांडे यांनी इ.स. 1775 मध्ये पेशवेिवरूद्ध वर्तन केल्यामुळे त्याच्या पािरपत्यासाठी अंताजी पंताबरोबर 28 मे 1775 रोजी पथक रवाना करण्यात आले होते.. माधवराव कदमबांडे यास पकडून जुन्नर सुभेदाराकडे हवाली करण्यात आले होते.. नंतर 25 सैिनक बरोबर देऊन माधवराव कदमबांडेना रवानगी अळकुटी येिथल गढीत करण्यात आले होते.. दुसर्या बाजीराव पेशव्याच्या काळातील मराठी राज्यात अनागोंदी माजली होती.. मराठ्याच्या िशंदे व होळकर या सरदारांनी आपआपसातील प्देश लुटण्यास सुरूवात केली.. इ.स.1800 मध्ये िशंदे , होळकर व िजवाजी यशवंत यांच्या फौजेने अळकुटी गावास लुटल्यामुळे या गावाचा यावर्षीचा महसूल माफ करण्यात आला. या लुटीनंतर सुरिशतेच्या भावनेतून मोठा व्यापारी वर्ग पुणं्यात गेला... दुसर्या बाजीरावाचा सरसेनापती ञ्यबंक डेंगळ यांनी पेशव्यातर्फे जोंधळे यांनी अळकुटीची जहागीरी देऊन येथे वसिवले.. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला. जुने सरदार व जहािगरदार यांचे त्या- त्या भागातील लोकांवर वर्चस्व असल्यामुळे आपला राज्यकारभार व्यविस्थत व्हावा यासाठी 1836 मध्ये िब्टीशंानी "इनाम किमशन" बसवून सरदार व जहािगरदार यांना नव्या घडीत बसिवले.. इगं्ज राजवटीत कदमबांडे यांना पाटील ही पदवी देवून या भागातील पाटीलकी बहाल केली. नंतर माञ कुठल्याच महत्वाच्या नोंदी या घराण्यािवषयी नाहीत... * संदर्भ - लोकहित ं(अळकुटी परिसर विशेषांक - २०१०)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...