विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

कोंडे देशमुख घराणं

 


कोंडे देशमुख घराणं *************** इसवी सन १००० सालापासून इतिहासातील गर्वाची व शर्थीच्या पराक्रमांच्या बिरूदावली मिरवणार्या इतिहासातील मानाचे सोनेरी पान राखून ठेवणार्या एेतिहासिक वतनदार देशमुख घराण्यापैकी एक शिवगंगा खोर्यातील खेडेबारे मावळच्या ४२ गावांचे वतनदार कोंडे देशमुख .. कोंडे देशमुख घराण्याचे संस्थापक सुर्यवंशी राजपुताना घराण्यातील रामसिंह राजपुत यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर शौर्याने शिवगंगा खोर्यातील खेडेबारे मावळच्या ४२ गावांची देशमुखी वतनदारी मिळवून कोंडे देशमुख या एेतिहासिक घराण्याची मुहूर्तमेढ रोवली. तदनंतर त्यांचे सुपुत्र राजश्नी कान्होजीराजे रामसिंह कोंडे देशमुख इतबारराव यांनी आपले कुलदैवत आई कोंडाई माता यांच्या आशिर्वादाने त्यांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेत त्यांच्या या पराक्रमाच्या जोरावर इतबारराव (विश्वासराव) ही फार्सी पदवी मिळवली व तसेच सरनाईक,इसापतदार इत्यादी पदव्या मिळवल्या. पुढे शहाजी काळात याच घराण्यातील राजश्री रायाजी कोंडे देशमुख इतबारराव यांचे चिरंजीव राजश्री बाबाजी रायाजी कोंडे देशमुख इतबारराव व राजश्री शहाजीराजे यांचे मैत्रीचे संबंध व विश्वासाचे नाते होते. याच कारणास्तव राजश्री शहाजीराजे भोसले बंगळुर मधे असताना स्वराज्याचे मनसुबे पुर्णत्त्वास नेण्यासाठी राजमाता जिजाउ व त्यांचे धाकटे चिरंजीव बाल शिवाजी राजे यांना पुढील शिक्षणासाठी व डावपेचांच्या आखणी करिता खेडशिवापुर चा ढाण्यावाघ कोंडे देशमुख यांच्याकडे १-१-१६३७ रोजी मोठ्या विश्वासाने खेडशिवापूर ला पाठविण्यात आले. राजश्री बाबाजी कोंडे देशमुख इतबारराव यांनी शहाजीराजेंच्या या विश्वासाला खरे उतरून त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...