भाग ५
या कालखंडाविषयी आपण बोलतो आहोत त्या कालखंडात स्वत:च्या पराक्रमाने रणांगणे गाजविणारी सारीच घराणी ही सह्यद्रीच्या मातीत वाढलेली होती. सह्यद्री पर्वत भारताचा मेरूदंड म्हणून आपले महत्त्व अतिप्राचीन कालापासून ठसवीत आलेला आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन कालखंडाचा विचार केला तर, सातवाहनांपासून ते शिवछत्रपतींपर्यंतच्या अठराशे वर्षांच्या इतिहासात जवळजवळ प्रत्येक राजकुळाने सह्यद्रीच्या खांद्याचा आधार घेत आपापल्या साम्राज्यांचा विस्तार करतानाच त्या साम्राज्याला स्थिरताही बहाल केलेली दिसते. दक्षिणोत्तर सहाशे मल पसरलेला हा पर्वत एका बाजूला सिंधुसागर तर दुसऱ्या बाजूला काळ्याकभिन्न पाषाणाचे दख्खनचे पठार असा भूगोल मांडून बसलेला दिसतो. सह्यद्रीचे रूप रौद्र आहे. त्याचा स्वभाव रौद्र आहे. त्याच्या कुशीत जन्मलेल्या कन्यापुत्रांनी अन् मुक्तपणे वाहणाऱ्या जलस्रोतांनी त्यांच्या सुपीक तीरांवर एतद्देशीय साम्राज्यांना जन्म दिला. त्यांचे पालनपोषण केले. वाहत्या जळासोबत त्यांची कीर्ती दिगंतराला नेली. हे सारेच सह्यद्रीच्या साक्षीने घडले होते. या रौद्रभीषण सह्यगिरीच्या मस्तकावर बांधलेल्या गिरिदुर्गानी या साम्राज्यांच्या पराक्रमाला स्वत:च्या दुभ्रेद्यतेची अन् अजेयतेची जोड दिली.
एक गोष्ट निर्वविादपणे सांगता येते की, भूगोल व भौगोलिक परिस्थिती ही त्या त्या प्रदेशाची वा देशाची मानसिकता घडवतात. त्या त्या देशाचा इतिहास घडवतात. त्या त्या देशीच्या माणसांचे स्वत्त्व घडवतात. त्या त्या देशाचे व्यक्तिमत्त्व घडवतात. जितकी अवघड भौगोलिक परिस्थिती तितकीच दुर्दम्य इच्छाशक्ती तेथील माणसांना लाभते. त्या त्या देशीचा भूगोल तिथल्या माणसांच्या जीवनाला सामाजिक, आíथक, सांस्कृतिक व राजकीय आयाम प्रदान करतो. ज्या ज्या वेळी आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा त्या इतिहासामागील भौगोलिक पलू जर ध्यानी घेतला नाही तर तो विचार र्सवकष ठरत नाही.
No comments:
Post a Comment