भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः !
मज्जैत्र यत्राः कुवर्णा: प्रोल्लो सन्ति पदे पदे !!
अर्थ - हिरडस मावळचे अतिशय लोक प्रिय राजे बांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत , पावलो पावली सैन्याचा आणि माझा जोम वाढवीत आहेत
असे वर्णन खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केले त्या बांदल घराण्यातील रण मर्दांच्या नेत्रदीपक बहादुरी वर खुश होऊन केली आहे .
राजश्री कृष्णाजीराजे नाईक बांदल -
कृष्णाजी बांदल यांच्या कडे पिडीजात ५३ गाव कुलवतन हिरडस मावळ (आळंद ते उंबर्डे ) ची जहागिरी होती .बांदल हे मुळचे बुंदेलखंडातील राजपूत घराणे महाराष्ट्रात येउन त्यांनी बाणांचे दल काढले म्हणून आडनाव बांदल झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे . तरीसुद्धा तलवारीच्या बळावर त्यांनी १२ मावळात सर्व वतनदारांवर वचक ठेवला होता . ते आदिलशाहीला निजामशाहीला मुळीच जुमानत नव्हते .सन १६२५ मध्ये त्यांनी मलिक अंबर ला हरवले आणि केंजळ गड जिंकून घेतला निजामशाही वर चालून गेलेला शिवपूर्व काळातील एकमेव जहागीरदार असे वर्णन कानंद मावळ मधील मारळ घराण्याने केली आहे . सन १ ६ ३ ६ मध्ये आदिलशाही नोकर दादोजी कोंडदेव याच्याशी कृष्णाजी बांदल यांच्या चकमकी झाल्या तिन्ही चकमकीत दादोजी कोंड देव सपाटून हरला त्याच्या घोडे सुद्धा भुंडे केले गेले जीव मुठीत धरून दादोजी कोंडदेव पळाला .
राजमाता दीपाबाई औसाहेब बांदल निंबाळकर-
कृष्णाजी नाईक बांदल यांची धर्म पत्नी . हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या स्त्री न्यायाधीश ( डोहार देशमुख मजहर वेळवंड खोरे ) .सईबाई साहेब यांची सख्खी आत्या . ह्यांचा उल्लेख शिवाजी राजे औसाहेब असा करत असत . कृष्णाजी बांदल यांच्या मृत्युनंतर औसहेबानी मावळातील कारभार हाती घेतला मोठा मुलगा बाजीराव नाईक बांदल यांना राजनीती व युधानितीचे धडे दिले . पुढे हेच बाजी बांदल खळद बेलसर च्या लढाईत सामील झाले , मोऱ्यांचा कणा मोडायला शिळीमकर यांच्यासोबत पुढे आले . दीपाउ औसाहेब अफजल खानच्या लढाईत सामील झाल्या कान्होजी जेध्यान्सोबत त्यांच्या मुलाने बाजीने आणि नातवांनी रायाजीने भरपूर पराक्रम केला कि अफजलखानच्या सैन्याचा साफ चुराडा झाला होता .त्यावर राजांनी अज्ञानदासाकडून पोवाडा हिरडस मावळच्या बांदलानी आणि कारीच्या जेध्याची समशेर अशी तळपली होती त्याच्यावर महारजांनी पोवाडा करून घेतला
सम गाठताना अज्ञानदासाचा पोवाडा -(अफजलखान वध )
अज्ञानदास विनवी श्रोत्याला | राजा अवतारी जन्मला || नळ निळ सुग्रीव जांबुवंत | अंगद हनुमंत रघुनाथाला ||
एकांती भांडण | जैसे रामरावणाला || तैसा शिवाजी सर्जा | एकांती ना आटोपे कवणाला ||
जेधे बांदल तैसे शिवाजीला | दृष्टी परी यश शिवाजी राजाला | कलीमधी अवतार जन्मला ||
बांदालांच्या नेत्रदीपक कामगिरीचा दिवस म्हणजे १३ जुले १६६० ची गजापुरच्या खिंडीतील ६ प्रहर . आदल्या रात्री महाराज बाजी बांदल यांच्या हिरडस मावळातील शेतकऱ्यांची , कष्टकारयांची फौज घेऊन सुद्धी जौहर च्या पन्हाळ्याच्या वेढ्यातील फौजेला गुंगारा देऊन निघाले . स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर , सरनोबत ,शिलेदार , हजारो स्वराज्याचे सैन्य सुद्धा हा वेढा फोडू शकले नव्हते पण फक्त बांदलाच्या ६०० शिबंदीच्या जोरावर राज्यांनी हि धाडसी मोहीम आखली आणि फत्तेही केली .त्यामुळे या मोहिमेसाठी निवड झाली ती बांदल सेनेची . हि फौज सैह्याद्री च्या वाघाला मगर मिठीतून सोडवणार होती .
काळ सर्पाच्या विळख्यातून स्वराज्य सोडवनार होती , हि निघणार होती गजापुरची खिंड पावन करायला .त्या फौजेत हिरडस मावळातील दोन पाणीदार मोती बांदलांच्या तुरयात चमकत होते बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे .बरोबर होत्या ६०० नाग्या तलवारी ,ढाली धारण केलेले वीर शंभूसिंग जाधवराव, खाटपे , विचारे , चोर , गव्हाणे , कोंढालकर , शिरवले , पोल , पारठे , शिंदे , महाले समस्त मावळातील १२ बलुतेदार . बांदलाच्या या रणबहाद्धारणी खिंडीत गनीम थोपवले . तब्बल ४००० फौजे विरुद्ध बाजी बांदल यांनी ३०० शिबंदी सह खिंडीत आणि वर जसवन्तरावाचा वेढा फोडायला आणि त्या च्या विरुद्ध झुन्झायला रायाजी बांदल ,तसेच शिवरायांना गडावर सुखरूप पोहोचवायची कामगिरी बांदलाच्या पिता पुत्रांच्या खांद्यावार आणि तमाम हिरडस मावळच्या शिबंदी वर होती . या दोन्ही तुकड्यांनी दोन्ही कामगिऱ्या चोख बजावल्या.
खिंडीतील बांदलांच्या तुकडीवर हल्यावर हल्ले होत होते .मसूदने सपाटा लावला होता खिंडीत मावले अड्सारासारखे उभे राहिले रात्रभर झुंज चालली . बांदलांची निम्मी तुकडी गारद झाली होती बाजी , फुलाजी , आणि बरेचशे वीर गारद झाले पण तरीही खिंड अभेद्यच राहिली होती . सर्वांचे कान इशारतींच्या तोफेकडे लागले होते आणि इकडे मसुदचे सगळे सैन्य गारद व्हायला आले होते हजारोंची फौज अवघ्या शेकड्यात उरली होती . आणि इतक्यात तोफ धाडाडली बांदल सेनेने सुटकेचा निश्वास सोडला कारण स्वराज्याचा प्राण सुखरूप होता आणि विशेष म्हणजे सिद्धी मसूदने देखील निश्वास टाकला तो त्याच्या चरित्रात लिहितो आहे......
"........जर गडावरून तोफ उडाली नसती तर आमचे काहीच खरे नव्हते कारण त्या सरदारांच्या तलवारी जणू लाव्हारसच आमच्यावर ओतत होत्या आमची फौज होत्याची नव्हती झाली, आता माझी स्वताची पाळी होती तोफ उडाली आणि ते लोक गडाच्या दिशेने जंगलात पसार झाले म्हणून आम्ही वाचलो नाही तर अल्लाह ची मर्जी .............."
तीच हि पावन खिंड बांदलांच्या रक्ताने पावन झालेली दाट झाडीत , हिरव्यागार गवती गालिच्यात , निर्जन , एकांतात , सह्याद्रीच्या कुशीत अन विशाळगडाच्या मुशीत . महावीरांच्या पवित्र रक्ताने पावन झालेली , मराठ्यांच्या माने प्रमाणेच ताठ , उंच आणि अभेद्य पन्हाळ्यापासून १८ कोसांच्या अंतरावर उंच खाच खळग्यानी आणि कट्याकुट्यानि सजलेली . एका अजगराच्या विळख्यातून हिरडस मावळच्या वतनदार सरदारांनी स्वराज्या चे प्राण वाचवले ते याच खिंडीत . त्या मातीला सुगंध आहे बांदलांच्या रक्ताचा तेथील कातीव दगडांना कान लावा मग ऐकू येतील शूरवीर ३०० रण मर्दांच्या डरकाळ्या आणि दिसतील त्यांच्या शौर्यगाथा .
स्वराज्यासाठी अनेक मराठ्यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या महाराजांनी प्रत्येकाला त्याचा उचित मान पान केला . या भीमपराक्रम नंतर जेधे घराण्याशी मसलत करून स्वराज्याचा सर्वात मोठा मान " धारेच्या पानाच्या पहिल्या समशेरीचा " रायाजी नाईक बांदल यांना देण्यात आला
शिवाजी राजे दक्षिण दिग्विजायावर गेले सोबतीला रायाजी नाईक बांदल होते आणि तेवड्यात मोगलांनी शिरूर - शिक्रापूर वर तळ ठोकला स्वारी अर्धवट सोडायची वेळ आली होती पण रायाजी नाईक बांदल यांनी तो विडा उचलला आणि मोहीमेवर निघाले आणि त्या लढाईत रायाजी धारातीर्थी पडले पुन्हा त्यांच्या मुलाला सुभानजी नाईक बांदल यांना मानाची पहिली तलवार देण्यात आली व सरनोबत यादीत नाव घेण्यात आले.स्वराज्याचा इतिहास अशाच नरसिंहांनी घडवला त्यापैकीच एक बाजी कृष्णाजी नाईक बांदल आणि त्यांचे पुत्र रायाजी बाजी नाईक बांदल , पण इतिहासाला त्यांची नवे कधी कळलीच नाहीत हे बांदल घराण्याचे दुर्भाग्याच अनेक रण संग्रमानाध्ये बांदल वीरांनी कोणी पट्टे , कोणी भाले , कोणी बर्चे , कोणी कमान , कोणी निमचा असे लागेल ते शास्त्र चालवले . कोणी आपल्या हुनराने राजीयास वाचवले , कोणी पराक्रमे साथ करून खस्त झाले . अशाच मुळे स्वराज्य अभेद्य राहिले . त्यामध्ये बाजी कृष्णाजी नाईक बांदल आणि त्यांचे पुत्र रायाजी बाजी नाईक बांदल हे राज्यांच्या कार्यावर हुन्नर करून गेले . बांदल घराण्याचा एवडा देदीप्यमान इतिहास दडवण्यात आला हि मोठी शोकांतिका....
तमाम दक्षिण भारतातील सर्वात मोठी वीर गळ सुद्धा बांदल घराण्याचीच आहे . तसेच ती चारी बाजूंनी कोरलेली एकमेव वीरगळ आहे . बांदल घराण्याची वीर भूमी पिसावारे या गावी आहे श्रीमंत कृष्णाजी बांदल यांची समाधी सुधा तेथेच आहे त्याप्रमाणे कृष्णाजीराजेंनी युद्धात वापरलेल्या अश्व शंभू प्रसाद या घोड्याची समाधी सुधा बांदल वीर भूमी ची शोभा वाढवत आहे .
सौजन्य :- करण राजेबांदल
No comments:
Post a Comment