विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 September 2020

“इंदुरीचा किल्ला सरसेनापतींची गढी”

 




 “इंदुरीचा किल्ला सरसेनापतींची गढी”...🚩

तळेगाव चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते....

शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता त्यांची समाधी तळेगाव शहरातील पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत....

शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते इ.स १७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली....
सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले इ.स १७२०-२१ मध्ये खंडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली त्याला....,
“इंदुरीचा किल्ला सरसेनापतींची गढी” या नावानेही ओळखले जाते....
खंडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले त्यांची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे....

सरसेनापती खंडेराव दाभाडे ह्यांचा २९१ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन....🙏💐🚩


फोटोग्राफी : Snehal Prasade...♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...