मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 30 September 2020
कृष्णाजी कंक
कृष्णाजी कंक
शंभू राजांचा गोव्याच्या पोरर्तुगीजशी तह पूर्ण
झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत
त्यांच्या कड़े रवाना केला. औरंगजेबाने
गोवेकराना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले
करण्याची सुचना केली.
गोव्याच्या फिरंग्याना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते,
त्यात त्यांना कुडाळच्या सावंताची आणि वाडी,
वेंगुर्ल्याच्या देसायांची फूस होतीच. म्हणुनच
राजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत
करण्याचे ठरविले.
फिरंग्यांनी दक्षिण कोकणातल्या फोंडा किल्ल्यावर
इतका हल्ला भयानक चडविला की,
त्यांच्या तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्यांस भगदाड पडिले
पण पाऊसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते.
त्यात किल्ल्यातील मराठे सुद्धा तडफेने प्रतिकार करीत
होते.
हा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी होती ती येसाजी कंक
आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर. किल्ल्यात
जेमतेम ८०० मराठे होते आणि ते बाहेरील फिरंग्याना जोराने
झुंज देत होते.
एके दिवशी पोरर्तुगीज सैनिक किल्ला चडून वर आले
आणि तोफांच्या सरबत्तीमुळे पडलेल्या भगदाडातुन आत
घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी येसाजी,
कृष्णाजी कंक आणि उरलेल्या मराठ्यानी असे
काही रणकंदन माजविले की आत घुस्लेले फिरंगी तर मलेच
पण ताटाला झोंबलेले फिरंगी सुद्धा माघार घेऊ लागले.
एकांस चार असे शत्रु मराठे अंगावर घेऊ लागले.
कृष्णाजी कंकने तर असे काही शौर्य दाखविले की शत्रु
सैनिक आवाक झाले. किल्ल्यावरील मराठे पडू लागले
आणि पोरर्तुगीज किल्ला घेणार इतक्यात १००० घोड़दल
आणि तितकेच पायदल घेउन शंभू राजे फोंड्याच्या मदतिंस
आले. राजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांना सुद्धा चेव
आला. आता मात्र गोवेकरांची अवस्था बिकट
झाली आणि त्यांनी पळ काडण्यास सुरुवात केली.
या युद्धात येसाजी कंक कायमचे जयबंदी झाले तर
कृष्णाजी कंक यांना वीर मरण आले.
या युद्धाचे दाखले आपल्याला पोरर्तुगीज पत्र,
रियासतकार, डॉ. पिर्सुलेकर आदि देतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment