विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

सेनापती संताजी उर्फ सुजनसिंग जाधवराव

 


सेनापती संताजी उर्फ सुजनसिंग जाधवराव मांडवे येथील सेनापती संताजी उर्फ सुजनसिंग जाधव यांच्या समाधीची दुरवस्था सातारा जिल्हा शूर- वीरांची वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. शिवकालीन राज्यात अनेक धुरंधर योद्धे या जिल्यात होऊन गेले हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी ते मोगलाबरोबर लढले व आपल्या प्राणांची आहुती दिली अशा या शूर सरसेनापती धनाजी जाधव यांचे सुपुत्र सेनापती संताजी जाधव ही शूरवीर होते मात्र आज त्यांच्या मांडवे ( ता. सातारा ) येथील समाधीची दुरावस्था झाली असून काळाच्या ओघात ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संताजी जाधव यांची समाधी मांडवे या त्याच्या जन्मगावी आजही अस्तित्वात आहे. गावच्या पूर्वेस समाधी असून समाधीवर घुमट असून त्याची पडझड झाली आहे. चौथऱ्यावर शंकराची पिंड आहे सध्या समाधी भोवती वेलीचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र खूप लोकांना समाधीबाबत माहिती नाही.येथे शंकराचे पडके मंदीर आहे असे येथील ग्रामस्थ समजतात. सातारा गझेटीअरमध्ये या समाधी व वाड़या बाबत थोडक्यातच माहिती आहे। माहिती साभार संदीप देशमुख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...