शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
नमस्कार! मी आज आली आहे आपल्यासाठी आणखी एका नवीन अपरिचित अशा ठिकाणांची माहिती घेऊन
स्वातंत्र्य देवतेला स्वतःची भगवती देवता मानून ज्यांनी तिची आराधना केली;
वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर ज्यांचे प्रभुत्व असे ते; मराठी भाषेच्या
पुनरुज्जीवनासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि मराठी भाषेला एक नवीन ओळख
निर्माण करून दिली आहे ; कित्येक नवीन शब्द ज्यांनी मराठी भाषेला नव्याने
दिले असे ते व्यक्तिमत्व; चाफेकरबंधूंना फाशीची शिक्षा दिली हे वृत्त ऐकल्यानंतरआपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे #देशाच्या_स्वातंत्र्यासाठी_सशस्त्र_क्रांतीचा_केतू_उभारून_मारिता_मारिता_मरेतो_झुंजेन
अशी शपथ घेणारे. ब्रिटिशांनी अटक करून समुद्रमार्गाने भारतात आणत असताना,
फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत फ्रान्सचा
किनारा गाठला, दोन जन्मठेपांची शिक्षा अंदमानच्या काळकोठडीत ज्यांनी भोगली
आणि याच काळ कोठडीत जन्म झाला स्वातंत्र्यदेवतेच्या एका नवीन पर्वाचा,
काव्यरचना जिथे कारागृहाच्या भिंतींवर उमटली असं ते व्यक्तिमत्व म्हणजेच
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
विनायक दमोदर सावरकर यांचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे भगूर नाशिक जिल्हा या ठिकाणाविषयी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे.
समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.
गोसावीवाडा, हाच तो वाडा जिथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं या वाड्याच आता स्मारक बनवलेल आहे.
या वाड्यात एक गुप्त खोली आहे माळ्यावर चढून गेल्यानंतर खिडकी सारखा
वाटणाऱ्या एका झरोक्यातून आपण एका गुप्त खोलीमध्ये प्रवेश करतो. या गुप्त
खोली मध्ये अभिनव भारतच्या अनेक मसलती घडल्या होत्या दहा बाय बारा अशा
क्षेत्रफळाची ती खोली संपूर्णपणे बंदिस्त फक्त मागच्या आवारातील दिशेला एक
छोटी खिडकी झरोका त्याच्यातून हवा येण्यासाठी आणि उजेड येण्यासाठी जागा
असेल
याच गूप्त खोलीतून एक गूप्तमार्ग ही आहे ज्या मार्गाने वाड्यातून
बाहेर निघता येत असे आणि जर.... जर अचानक ब्रिटिशांनी धाड टाकली तर अशा
वेळेला पहिल्यांदा हा झरोका बंद केला जात असे जेणेकरून त्या गुप्त खोली चा
थांगपत्ता लागु शकत नसे त्याहूनही अधिक तिथून मागच्या दरवाज्यातून
वाड्याबाहेर पडण्याचा दुसरा मार्ग होता. त्याचा वापर केला जात असे एका
क्रांतिकारकाचा घर कसा असावा हे जर खरोखर बघायचं असेल जगायचं असेल त्या
ठिकाणाला तर या ठिकाणाला भेट अवश्य द्या...!!!
✍️भारती धोंडे पाटील
#अपरिचित_ऐतिहासिक_ठिकाणे
#अपरिचित_इतिहास
#जिजाऊंचं_स्वराज्य
No comments:
Post a Comment