विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

मराठा सरदार त्रिंबकजी इंगळे


 मराठा सरदार त्रिंबकजी इंगळे

१ नोव्हेंबर १६९२ ला पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला.
हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे
मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१
रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने
मोघलांना शरण गेला.
या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.
बादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान,लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह,मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातीलकुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही.
या लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला.
इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या बाबतीत
इतिहासाची पुनरावृत्ति झाली होती, इंग्रज वकील विलियम
नॉरिस इंग्रज बनावटीच्या तोफा घेउन मोघलांनच्या छावणित
सामिल झाला. मोघली तोफांच्या माऱ्यामुळे
किल्ल्याच्या तटा बुरुजांना खिंडारे पडली होती पण त्यात
सुद्धा, मराठे पुन्हा ह्या तटा बुरुजांची दुरुस्ती करुन लढायांस
सिद्ध राहित.
हा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे
सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच
होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे
मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून
जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत.
मराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा भडिमार करीत होतेच.
एकदा तर मराठ्यांनी केलेल्या मारात, खुद्द
बेदारबख्ताचा घोड़ा जाया झाला. मराठे रात्रीचे तर
अति आक्रामक बनत असत, अशाच एका रात्री मराठे
कोंकणी दरवाजातुन बाहेर पडून मंसूरखानच्या छावणीवर
एल्गार केला.
त्याच्या काही तोफा निकामी केल्या आणि अनेक
मोघली सैनिकांस मारून ते गडावर पसार झाले.
१२ एप्रिल १७०१ रोजी,गडावरील मराठ्यांनी थेट
तरबियतखानाच्या तोफखान्यावर झेप घेतली. तरबियतखान
पान्हाळा व पवनगडच्या बेचक्यात उभा होता, या छाप्यात
मराठ्यांनी मोघलांनचा दारुगोळा उडवून दिला आणि त्यांचे
काही सैनिक कापून, पुन्हा गडावर पसार झाले.
अखेर दाणागोटा संपल्यामुळे
पन्हाळा मुघलांच्या हवाली केला गेला.
पन्हाळा किल्ल्यावरील त्र्यंबकजी इंगळे, बाळोजी इंगळे,
कान्होजी इंगळे, पवनगडाचे विठोजी केसरकर,
आणि त्यांची ८००-९०० ची शिबंदी तब्बल ८ वर्षे
बादशहाच्या थोडीथोडकी नव्हे तर ३० हुन अधिक
मनसबदारांना भारी पडले.
पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्याचा संदर्भ
बादशाहच्या दरबारातील बातमीपत्रात मिळतो. पण दुर्दैवाने
आपल्याकडे याचा काहीच उलेख नाही. म्हणुनच या पत्रात
मोघलांच्या पन्हाल्याच्या रंगवलेल्या बातम्या मिळतात
आणि मराठ्यांना त्यांनी कसे हरवले हे सापडते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...