सांभार :शेखर शिंदे सरकार
सांगली मार्गावरुन प्रवास करताना,#कवठेमहांकाळ तालुक्यातील #कुची गावाजवळ आल्यानंतर #तिसंगीमागे , #कुंडलापूरला जाताना, कुंडलापूरच्या हद्दीत थोडा घाट चढून जाताना , आपल्या डाव्या हाताला मोकळ्या माळरानावर , पूर्वाभिमुख असलेली , गोलघुमटाधारी इमारत दिसते,
ती ग्लाल्हेर घराण्यातील #सरदार_शहाजी_राणोजी_शिंदे यांची समाधी होय . तिथे जाऊन पाहिल्यावर दक्षिणेकडून उत्तरेकडे एका ओळीत , थोड्या अंतरावर तीन समाधी दिसतात,दक्षिणेकडून पहिली सरदार शहाजी राणोजी शिंदे , दुसरी त्यांच्या #सौभाग्यवतींची आणि तिसरी त्यांच्या प्रामाणिक #घोड्याची समाधी असे सांगतात,
आज ( २५ ऑक्टोबर २०१८ शुक्रवार ) या तिन्ही वास्तू विनाशाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसते , सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी १८ . ८ ×१८ . ८ अशा जमिनीपासून साधारण २.८ उंचीच्या काळ्या घडविलेल्या दगडाने बांधलेल्या चौथऱ्यावर एका घुमटाकार शिखराखाली उभी आहे. इमारत पूर्ण काळ्या दगडात असून घुमटावरचे प्लॅस्टर पूर्ण निघून गेले असुन दगड विटा दिसतात या इमारतीची
पू .प लांबी रुदी अशा चौकोनी पध्दतीत आहे कमान द्वाराची रुंदी २.५ आहे,आत तीन भितींवर कमान कोरलेले असून , पश्चिम, बाजूच्या भीतींच्या तळाशी लागून समाधीचे बांधकाम असलेले दिसते,हीच सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी . आता इमारत विस्कळीत होऊ लागलेली दिसते,
तेथून दुसरी समाधी १८ बाय १८ अशा जमिनीपासून साधारण ४ उंचीवरच्या काळ्या दगडात बांधलेल्या चौथाऱ्यावर आहे . चौथाऱ्याला कसलेही बांधकाम नसून फक्त मधोमध समाधी आहे . ही सरदार शहाजी राणोजी शिंदे यांच्या सौभाग्यवतींची समाधी असल्याचे सांगतात, तिसरी समाधी त्यांच्या प्राणणिक अश्वाची असल्याचे सांगतात .जमिनीपासून २ उंचीवर १२बाय १२ अशी दगडी बांधकामात बांधलेल्या चौथाऱ्यावर ही समाधी आहे . आज तीन्ही समाधी कालौघात आपले अस्तित्व हरवून चाललेल्या आहेत,
कुंडलापूरचे ग्रामस्थ आणि अभ्यासक यांच्याकडून समजले की कुडलापूर येथील ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज , सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची ही समाधी आहे, #वाघोली,#गर्जेवाडी,#ढालगांव,#तिसंगी आणि #कुंडलापूर या पाच गावांची जहागिरी शिंदे घराण्याकडे होती.त्यावेळी विजापूरच्या अदिल शाहाची सत्ता होती . विजापूर #गुहागर या मार्गावरील खानापूर येथे रसद ठेवण्याचा ठिया होता,#आदिलशाहाची रसद तोडण्यासाठी एके दिवशी बाहेर पडलेल्या सरदार शहाजी शिंदे यांचा झालेल्या लढाईत मृत्यू झाला. त्यांना वीरमरण लाभले,त्यानंतर त्यांच्या पत्नीनी धाडस करुन शहाजींची मृतदेह ताब्यात घेऊन, कुडलापूर येथील समाधी वास्तूच्या जागी अंत्यसंस्कार केले.
त्याचवेळी त्यांच्या पत्नी सती गेल्या, सैनिकांनी त्या जागेवर तीन समाधी उभारल्या पुढे त्याची नासधुस आदिलशहाच्या सैन्यानी केली,आज देखील या वास्तू उपेक्षित , दुर्लक्षित राहिलेल्या दिसतात,कुंडलापूर ( जि . सांगली ) येथून जवळच असलेल्या तिसंगी असेलेल्या पोळांच्या वाड्यात त्याकाळी #गुंडो_रामचंद्र_दिवाण म्हणून असलेली व्यक्ती खाजगी दप्तर सांभाळणे,चिटणीस काम करीत. त्यांच्या आजच्या वंशजाकडून तोंडी मिळालेल्या माहितीवरुन काही कागदपत्रे मोडीत असल्याची शक्यता वर्तविली गेली . या आधारे सरदार शहाजी राणोजी शिंदे यांचा शोध घेता येईल असे वाटते,प्र.अ.कुलकर्णी
No comments:
Post a Comment