विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 5 September 2020

छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाईसाहेब यांच्या कन्या भवानीबाई



छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाईसाहेब यांच्या कन्या भवानीबाई 
 
 लेखन : डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे..
 
भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर इ.स १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या “शृंगारपूर” येथील वाड्यात झाला..येसूबाई राणीसाहेब मांसाहेब झाल्या.. छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले.. राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले.. भवानीबाई या छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांच्या नात व छत्रपतीं संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या..
छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाईराणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांचे बरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांचे लग्न औरंगजेबाच्या छावणीतच शंकराजी महाडिक यांचेशी म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होतेअंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या..
महाड बंदराची वतन व देशमुखी खेड बंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव प्राप्त झाले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडीक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ आंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरीक केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर, जाधव राव, राजेशिर्के, मोहिते या लोकांशी भोसल्यांच्या घराण्याशी शरीरसंबंध आले त्याचप्रमाणेच महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातुन आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत..
शंकराजी महाडिक हे औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना औरंगजेबाच्या कैदेतून येसूबाई राणीसाहेब व शाहूराजांच्या सुटकेसाठी त्यांनी खुप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हरजी महाडीक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्याला आले मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची (जिल्हा सातारा) झालेली वाताहात व विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत सुरू करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहास प्रेमी लोक आजही आवर्जुन भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व नात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत..
आजही राजे महाडिक यांचे वंशजाचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळे गाव सातारा पासुन ३० किलोमीटर अंतरावर आहे..

➖➖➖➖➖➖➖

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...